पंकज भोंसले धन्यवाद !
प्रिय पंकज भोंसले ,
सुनील तांबे , प्रणव सुखदेव , गणेश मतकरी ह्यांनी सुरु केलेल्या चर्चेत अचानक तुमचा लोकप्रभेतील (१३ ज्यून २०१४ ) '' टीकायन : झापड बंद समीक्षेने मारलेले नवे साहित्य '' हा लेख वाचण्यात
आला आणि त्यात ''अ डॉ हॉ कॉ बा ना सु ना'' ह्या माझ्या साहित्य कृतीचा उल्लेख आढळला (मी तिला कादम्बरी म्हणत नाही कारण कादम्बरी हा फॉर्म आऊटडेटेड झालाय असे माझे मत आहे ) आणि मी दचकलोच . ह्या साहित्यकृतीची दखल घेतली गेली नाही ह्याची तुम्ही दिलेली कारणे सत्य असावीत पण आपण काय करू शकतो ? मी माझी धर्मावरची साहित्यकृती पुरी केली . ''अ डॉ हॉ कॉ बा ना सु ना'' ही मारली गेल्याने ''अ डॉ हॉ कॉ बा ना सु ना'' चा प्रकाशक सतीश पाध्ये ही नवी साहित्यकृती प्रकाशित करण्यास असमर्थ ठरला आता आपण लिहलेली साहित्यकृती प्रकाशितही होणार नाही हे स्पष्ट झाले तर आपण काय करायचे ? तर पुन्हा नवी साहित्यकृती लिहायला घ्यायची . मी आता अर्थावरची साहित्यकृती लिहतोय . जर तुमची साहित्यसंस्कृती तुम्हाला वाळीत टाकत असेल तर आपण गाव्कुसातून लिहावे नाहीतरी माझ्या आजोबाला आपल्या मुलीचे लग्न जातीबाहेर केले म्हणून गावाने वाळीत टाकले होतेच . माझा आजोबा जंगलाच्या आधारे जगला पण झुकला नाही . तो जगण्या साठी झुकला नाही तर मी मान्यतेसाठी काय झुकणार ? मराठी साहित्यसंस्कृती गेली तेल लावत !
तुमचे मात्र आभार ! असा लेख लिहायला निर्भयता लागते . तुमच्या निर्भयतेला सलाम !
श्रीधर तिळवे

No comments:
Post a Comment