Saturday, August 29, 2015

५१ वटवण श्रीधर तिळवे 

मी माझ्या आत्मचरित्राचे तुकडे मांडत चाललोय 
मात्र ते तुम्हाला जसे हवे आहेत तसे नाहीत 
जसे असायला हवे आहेत तसे आहेत 

तुम्हाला चिंता पडलीये त्यांच्या सत्य-असत्याची 
आणि मला चिंता 
ग्वाही देणाऱ्या काल्पनिक मनाला 
संपूर्ण कसे नाहीसे करता येईल ह्याची 

तुम्ही मला फ़ेकॉलजिचा मास्टर समजताय 
आणि माझा गुन्हा हाच 
कि मी कुणाचा शिष्य झालो नाही 

तुम्हाला पूज्य तुमचे इझम्स , धर्म , अजेंडे , त्यांचे प्रवर्तक 
आणि मला पूज्य म्हणजे शून्य कसे ते जाणायची उत्सुकता 

मी असा मूर्तीभंजक आहे 
ज्याने फक्त मूर्त्या नाही फोडल्या 
प्रेषित फोडले ईश्वर फोडले 
स्वतःच्या घरातील देव्हारे फोडले 

तुम्हाला हवा आहे तुमच्या वाकवळणाप्रमाणे सही करणारा कवी 
आणि मी अवघ्या जगाचा राजीनामा देवून 
मूळ सोर्स वटवत चाललोय . 

(क व्ही २ ह्या काव्यफायलीतून )