दहा चिन्हछन्दी गझला /च्यानेल
: वर्डस
मधून श्रीधर
तिळवे
भाग २
गझल ६
माझ्या त्वचेपासून गर्भाशय तयार होईल
जनुकावरती माझा क्रियेटीव विश्वास आहे १
धुमकेतुसारखा मी कधीही उगवतो
धूळ आणि बर्फ माझा स्वभाव आहे २
ही ABNORMAL वाद्ये गर्भपेशीत वाजणारी
जन्मणारा बहुधा रिंगटोन वाजवत येणार ३
संगणकाशी एक माकड खेळते आहे
हा माकडचाळा म्हणू कि माणूसचाळा म्हणू ? ४
प्लास्टिक सर्जरीतही कपडे सेमच ठेवलेत
पेशंट आतील बहुधा FASHION DESIGNER असावा ५
पैसे वाढत गेले आरोग्य घटत गेले
आसपास त्याच्या डॉक्टर घुटमळतायत ५
मी पिझ्झा खावून खावून बेजार झालो आहे
चपातीलाही वाव आणि सराव असावा ६
गझल ७
मोबाईलवरती त्यांनी MISCALL दिले
त्यांना माहित नाही मोबाईल मिसिंग आहे १
चुकीचे कोड्स टाकून त्यांनी टिकवले लॉक
जात टिकवली म्हणून फुशारक्या मारू नका २
वाळवंटे व्हीज्युअली मोस्ट ब्यूटीफुल झाली
ज्यांनी शूट केली ते बिस्लरीत उभे होते ३
त्वचा मऊ होती चिमटेही मऊ होते
अत्यंत काठीण्यात संसार माझा टिकला ४
प्रत्येक घटना आता मल्टीकॅमेरल झाली
पाह्ण्याऱ्यानां मात्र डोळे दोनच होते ५
वेश्यालये उजाडली रेडलाईट भकास झाले
बघता बघता सेक्स होम डिलिवरी झाला ६
गझल ८
बर्फ वितळताना आवाज होत नाहीये
निसर्गाला इच्छा स्फोटण्याची असावी १
अधिकाधिक मी अमेरिकन होत चाललो
ही मालट्रीटमेंट आहे कि मॉलट्रीटमेंट आहे ? २
माणसांचा ढिगारा रोज वाढतो आहे
पृथ्वीही हळूहळू गार्बेजसारखी दिसतीये ३
कुठेच पोहचत नाहीत ते अमेरिकेत पोहचतात
अमेरिका जिथे पोहचते तिथे खाऊन टाकते ४
यू एस ए एम्बसीपुढे उभा तो कबुतरासारखा
कावळण्याची लाज वा गरुडण्य़ाची भीती असावी ५
ग्रहण ज्यांनी पाहिले ते सूर्यवीर होते
ग्रहण ज्यांनी टाळले ते सूर्य टाळणारे होते ६
गझल ९
NAIL POLISH लावून गळ्याला नख लावले
पॉलीशड खूनाचा हा नवा प्रकार असावा १
कुठलाच ए सी ह्या हवेला सूट नाही
तात्कालिक कुलसाठी श्वास बळी चालला २
नव्या गाड्यांसाठी पार्किंग लॉट हवा
नव्या झोपड्यांनी जागा कुठे शोधावी ? ३
जे लढण्यासाठी जन्मले ते प्लास्टिक ब्येगेत बंद
ना कळेना हा कचरा डम्प कुठे करावा ४
अंडरगारमेंटखाली सारेच झाकले गेले
जे सिक्स PACK दिसले ते देखावा होते ५
माझ्या एकांताशी रोजच लढत होतो
बालपण निरागस माझे एक युद्धभूमी होती ६
गझल १०
चेहऱ्याचे अस्सल पुस्तक त्याला वाचक नाही
हे फेसबुक म्हणजे CONTACT चा नवा बहाना १
शांतता उरात भरा वा श्यून्यता श्वासात जगवा
बुद्धता जागी व्हावी इतका ना झोपेचा कंटाळा २
बेकायदेशीर बांधा मग कायदेशीर करा
कायदा हिंदुस्तानचा मस्त टाईमपास ३
शिष्टाचार अवगत नाही रक्तास माझ्या जंगली
माझा ब्लडग्रुप बहुधा पाशवी असावा ४
आयुष्य चार्जिंगला लावून ठेवले आहे
माझ्याचवेळी नेमके भारनियमन लागू ५
No comments:
Post a Comment