मुक्त गझला / डेकॅथलोन : एलसेट्रा ह्या अप्रकाशित काव्यसंग्रहामधून
१ विवाहित प्रेमिकेसाठी मुक्त गझल /श्रीधर तिळवे
हे प्रेम आहे कि व्यभिचार आहेतुझे विवाहित असणे अत्याचार आहे १
त्वचा मांडून मांडून विकून संपून गेले
हे काळीज उरलेले चमत्कार आहे २
वॉश घेऊन घेऊन डोळे पॉश झाले
तुझे रडणे स्टाईल अश्रू शैलीदार आहे ३
माझी भटकंतीही तुझ्यात भरकटत गेली
मी दिशाहीन योगी तुला भ्रतार आहे ४
बिनधास्त होण्याचीही आता धास्ती वाटते
माझा कलंदरपणा तुझे हत्यार आहे ५
२ जगभर हिंडून
जगभर हिंडून घरी परतावे
अन घरात साऱ्या जग मांडावे १
मेंदू करू दे हजारो तुकडे
काळजात सर्व कनेक्टेड व्हावे २
कितीकाळ फोनवर हाय अन हलो
माणसाने कधीतरी भेटून बोलावे ३
झेरॉक्स असल्यासारखा नको वागू
ओरीजनल आहेस ओरीजनल रहावे ४
सरडाच का व्हावे रंग अनुभवण्यास
फुलपाखरू होऊन काम भागवावे ५
३ कोल्हापूरी
सुरवातीला फक्त अडचण असते
मग नेहमीचीच तणतण असते १
गर्भाशयापासून वनवे सुरु होतो
मग कुठेही जा फक्त वणवण असते २
माझ्या अस्तित्वाची मी घंटा वाजवत नाही
कवितेत मात्र माझी घणघण असते ३
हे खरे कि तुझा मला ताप चढत नाही
तुझ्या अभावाची कधीकधी फणफण असते ४
मी कोल्हापुरी थोडा झणझणीत आहे
काळजात गोडवा बोलण्यात झणझण असते ५
४ दे यार और
दे यारा और भी दे गम मुझे सहनेकेलिये
काफी नहीं हैं लहू दिलका गममे तेरे बहनेकेलिये १
दिल वो मुकाम हैं जहाँ हर कोई भटका अटका
बादमें मिलते हैं बहोत मकान रह्नेकेलिये २
बहोत कुछ गिराना होगा श्रीधर मोहब्बतकेलिये
सिर्फ दिमाग काफी नहीं तेरा ढहनेकेलिये ३
बहोत कुछ भेंज दिया ताकि वो इश्कको समझे
लाशतक बची नहीं हैं उन्हें कुछ कहनेकेलिये ४
इश्क़ मेरा समझ न आया न आया ना सही
जुनूनमें दिया डायमंड तेरे काम आया गह्नेकेलिये ५
श्रीधर तिळवे -नाईक
श्रीधर तिळवे -नाईक
No comments:
Post a Comment