दहा चिन्हछन्दी गझला /च्यानेल : वर्डस मधून श्रीधर तिळवे
गझल १
गालिब कुणी पाहिला सुरेश भट देशी
मी गझलेचा software मुळापासून बदलला १
सारेच expert आहेत एकमेकान्च्या तपशिलांचे
मी एकटाच वेडा जाळ्यात एकसंध २
मिलीयन डॉलर बेबी चायनामध्ये पळाली
हा माझा इंडिअन रुपी मेड इन इंडिया आहे ३
आईच्या दुधाच्या वासाची सवय होती
पुन्हा जन्मताना ही डेयरी निकामी ४
साऱ्या अवयवांचे माझ्या क्लोन्निंग झाले
प्रत्येक क्लोनड अवयव कविताच लिहतो आहे ५
प्रत्येक औषधात एक छुपे रूस्तम विष
उपचार करतांनाही आजार गृहीत धरावा ६
गझल २
काय रे बॉम्बब्लास्टात कितीजण मेले
किती घरी आले आयुष्य ताजे कमवून १
पानगळीचेही काळजात saturation झाले
शस्त्रक्रिया करून सही वसंत प्लांट करा २
फुलपाखरांनी चुकून नदी चाटली
रंग उडालेली शवे किनाऱ्यावरती ३
personality स माझ्या मी फोन केला
उत्तर मिळाले हा राँग नंबर आहे ४
श्वासांनीच फुफ्फुसावरती हल्ला माझ्या चढवला
जगण्यासाठी आता मी कोठे निघून जावे ? ५
आरश्यात चेहरा वारला चेहऱ्यात दोन डोळे
संगीत कम्पोज करतोय हा मेंदू जिवंत जारात ६
सगळेच प्रोग्राम आता एकमेकास सामील
हा हार्डवेअर शाबूत तोवर ओळख काबूत ७
मी वॉल स्ट्रीट वरचा सेकंडरी सिटीझन
माझी प्रत्येक नोट तो प्रायमरी प्रोग्राम करतोय ८
गझल ३
कपडे आज फाटले ती उद्याची fashion झाली
काळीज फाटले ते भूतकालीन झाले १
मी ज्योक केले तेव्हा त्यांनी आईस्क्रीम खाल्ले
अश्रू मात्र माझे बिसलरी झाले नाहीत २
फेक होण्याचे लायसन सर्वांना मिळाले
मी ओरीजनल माझा काळाबाजार झाला ३
मेंदूत ज्याच्या त्याच्या निगोशियेशन्स चाललेल्या
जो तो बाजारात फुलटाईम सेल्समन ४
हा laptop न्हवे हा तर नव्या युगाचा पोपट
हा तेच बोलतो आहे जो डाटा कोंबलेला ५
आजचे म्येनिपुलेशन उद्याचे आर्थिक धोरण
जे साधे सरळ आहेत त्यांची नोट फाटकी ६
गझल ४
जो थुंकला रस्त्यावरती तो वेगळा दिसला
पिंकदाणीत थुंकणारे सभ्य पण एकसारखे १
प्रेमाचा बहाना करून माझी फ्रेम लावली
फोटोत कैद माझा संसार फोटोजनिक २
घावात सूरा न्हवता घावात हात होते
ते नातेवाइकांचे हा आघात होता ३
गरज नसतांनाही मी fatty च खात राहिलो
कळले नाही चव कधी बनली रोग माझा ४
एसीखाली असूनही संताप इतका तीव्र
मी गरम डोक्याने माझ्या काळीज माझे चावले ५
हवे हवे ची हांव इतकी बोकाळली कि
तृष्णेच्या ताटाखालचे मी मांजर झालो ६
गझल ५
मुद्दल फिटले तरी व्याजात चालतो आहे
हे बँकेबल आयुष्य मला अद्दल घडवते आहे १
सुक्ष्माणु किटाणू विषाणू सर्वत्र पसरलेले
भिंत समोरच आहे पण तुला दिसत नाही २
आईला त्वचेत गुंडाळून ही मुलगी कुठे निघाली?
बापाची जीन्स pant झीप चघळते आहे ३
सुईच्या टोकावरती शांतता वसलेली
छातीत ज्याच्या त्याच्या आवाज खुपसलेला ४
जसे वाटत होते तसेच पुढे प्रकटलेले
शक्यतांच्या आसपास का इतकी नाकाबंदी ? ५
चिमटीत शब्द पकडून आमटीत कुणी ढवळला
हा रस्सा कोल्हापुरी तांबडा पण फेक झाला ६
No comments:
Post a Comment