सेट /श्रीधर तिळवे
१९
प्रोप्स जांभया देतायत
शरीराच्या प्रत्येक modelled कॉर्नरवर
चान्स मोल्ड होतायत
कल्पनेचा त्याग केला तरी
fashion प्रोजेक्शन काल्पनिक
मी ramps चा मांजरात लिलाव करतोय
कुणीतरी कॅटवॉक करत येईलच येईल .
श्रीधर तिळवे -नाईक
(क. व्ही . २ ह्या आगामी काव्यसंग्रहातून )
No comments:
Post a Comment