Sunday, May 10, 2015

त्यांनाही माहित नाही / श्रीधर तिळवे 

२३
माझ्या जीन्सचे हे natural  कलेक्शन 
रिअल पव्हिलिअनचे फोटोस्टील वाजवतंय 
फुलांनी तोंड बंद केलेल्या म्युझिकल नोटस अवगत करत 

कृष्णवर्णीय त्रीमितीयता डिझाईनमधून प्रकट करतीये 
सूर्यातही अस्तित्वात असलेली वजनदार स्पेस 
क्लास्सिकल मिनीएचर्सही समकालीन होतायत 
फोटोशोप्पिकल टाटूइफेक्ट्समध्ये 

माझे पोर्ट्रेट माझ्यापासून सुरु होते 
पण माझ्यापाशी संपत नाही 
डीजीटूल्स त्याला वाढीव सोंदर्य पुरवून 
डीस्पोज करतायत प्रतिसेकंद साठच्या स्पीडने 

रोमांटिक स्वभावाची झाडे 
शुभ्र शंखातून सौष्ठव फुन्क्तायात 
मात्र ते त्यांच्या भावनांचे आत्मचरित्र असेलच असे नाही 

एक इन्स्टालेश्नर आपल्या आईला 
installation म्हणून सादर करतोय 

माझ्या कार्सची चाकं रस्त्यावरून कविता लिहित धावतायत 
माझ्या स्वीम्मिंग tank मध्ये माझी गर्लफ्रेंड प्रत्यक्ष पोहतीये 
कि पोहण्याचा अभिनय करतीये 
हे सांगणे कठीण आहे 

हवेने कंट्रोल केलेला माझा श्वास 
माझ्या फुफ्फुसाचे डीजीशिल्प बनवतोय 

एक सब्लाइम grand सौंदर्य 
डोळ्यातून विजा कडाडवत 
शांतीचे बनावट मूग गिळत गप्प बसतय 

मी ह्या जगण्यात आनंदी आहे कि दु;खी 
हे मला ठरवता येत नाहीये  

मी उत्सव साजरा करायला सर्वांनाच बोलवलय 
आणि प्रत्येकजण डिझायनर्स कपडे घालण्यासाठी 
शहरातल्या डिझायनर्सना कॉल करतोय 

त्यांनाही माहित नाही 
उत्सव साजरा करताना 
ते आनंदी असणार आहेत कि दु : खी ?

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही  २ ह्या  अप्रकाशित  कविता संग्रहातून )

No comments: