Monday, May 4, 2015

प्रत्येक बुद्ध /श्रीधर तिळवे 

प्रत्येक बुद्ध प्रथम 
माझ्यासारखाच होता 

प्रत्येकजण माझ्यासारखा 
शेवटी बुद्धच होणार आहे 

मलाही बुद्धाप्रमाणे 
हे खोलवर कळायला हवे 

जेणेकरून 
मी जाणार नाही पळून 
बुद्ध होण्यापासून 

खरा मर्द /श्रीधर तिळवे 

आत्मचिंतेत जळण्यापेक्षा 
आत्मचितेत जळ 


स्वताची राख फासून जगशील 
तर खरा जगशील 

खरा मर्द 
आत मरतो 

चालण /श्रीधर तिळवे 

प्रथम नदीतून चालत गेला 
नदी उरली 

मग नदी चालत गेली 
पाणी उरलं 

मग पाणी चालत गेलं 
मी उरलो 

मग मी चालत गेलो 
चालण उरलं 

चालतोय 

श्रीधर तिळवे -नाईक 

(डेकॅथ्लोन ट्रान्सरिअल (इन्फिनीट ) ह्या प्रकाशित काव्यसंग्रहातुन )


No comments: