Friday, May 8, 2015

२१ नव्या संस्कृतीनिर्मिकाचे स्वगत /श्रीधर तिळवे
अज्ञानापेक्षा गुंतागुंतीचे ज्ञान कधीही बरे 

थेरीज तेरा वेळा वाचूनही कळत नाहीयेत 
मात्र चौदाव्या वेळी त्यांचा चेहरा मला ओळखीचा वाटतो 

management हीच बनत चाललीये रिस्क 
आणि तज्ञ पुरवतायत 
फ्रेश करणाऱ्या चहासारखे ज्ञानाचे कप 

मुर्खपणा धिप्पाड बनत चाललाय वशिल्याने भर्ती झालेल्या प्रोफेसर्सचा 
आणि भविष्य पाहणारा जेन्युइन मेंदू 
स्वताची चड्डी मर्यादेने ओली करतोय कि काय अशी शंका येतीये 

प्रोफेसर्स 
युद्ध करतायत बुद्ध मांडतायत 
प्रोफेसर्स 
पोर्नो पाहतायत एडस वाढवतायत आणि प्रबोधनही करतायत 
प्रोफेसर्स 
भयाचे बॉम्ब देहात बांधून घेतायत आणि शोधून नष्टही करतायत 
प्रोफेसर्स 
गोंधळ वाढवतायत गोंधळावर संशोधनही करतायत 

अंगावर ज्ञानाची उष्मता बांधतिये पलायनवादी भावनांच्या काट्यांचे घड्याळ 
आणि लोक घामट हातांनी उडवतायत मुमेटरी इमोशनल पतंग 

वैज्ञानिकांना SARS लाईटवेगाने किती टांगा फाक्तायत 
ते मोजायचे आहे 
आणि त्यांच्या कॉलेजला U G C ची ग्रांटच आलेली नाहीये 
त्यांना सरकारी ग्रांटचा वेगच मोजता येत नाहीये 

त्यांची आशा करतीये आयटम डान्स 
आणि त्यांच्या करुणेने बॉलीवूड डान्सचे क्लासेस अटेंड करायला सुरवात केलीये 

मी T V समोर  ब्रान्डसच्या धबधब्याखाली आंघोळ करतोय
गेस्ट लेक्चरर म्हणून परतल्यावर 
RATIONAL कन्झुमर बनण्याचा प्रयत्न करत 
ह्या उदास एकांतात एकटा 
कोसळलेल्या शिक्षणाचा मळ साफ करत उभा 

नव्या युगाचे वाढते गुरुत्व 
अवघ्या पृथ्वीच्या रिकाम्या जागा भरून काढत 
माझ्या खांध्यावर 
तिला नखाएवढ करत

 मी NONACADEMIC ALONE
गोळा  करतोय आत्मविश्वास 
MATTER च MATTER डार्कमध्ये ताणवत 
उर्जेचे APPLICATION जमवून आणत 

मी सब सिस्टिम्स ADD करतोय अहोरात्र 
इंटर्नल लिंक्सची डिलक्स जाळी खोलत 
सिम्पल नेटवर्क्सच्या ADDITIONAL नोडमधून स्वताचे मायनस पाय चालवत 


ट्रान्सफरमेशनचे औटोमेशन ग्रेटर गतीत जोपासता येईल का ?
ह्या मटेरियलची अमाउंट मला सह्याद्री मौउंण्ट्णवर मोजता येइल का ?

गुंतागुंत गाढ होतीये 
पेसमध्ये वाढ 
कनेक्टीविटी प्रगाढ होतीये 
स्कोप कोओपरेटीव 

BLOCKAGE वितळवणारे पाणी तळमळतय माझ्या गरम रक्तात 

माझ्या शरीराचे तापमान ठीक करू पाहतय कार्बन डाय ऑक्सोइड 
प्रोजेक्टचे अक्ष -पाडतायत नाणी -छापतायत नोटा 
मेंदूची सप्लाय चेन टवटवीत होत चाललीये चेकगणिक 
मी मार्केट विकत घेवून ओल्ड संस्कृती काढतोय लिलावाला 

मला खात्री आहे मी हातभार लावतोय 
एका नव्या संस्कृतीच्या निर्माणाला 
आणि मराठी माणूस मला वडापाव खायाला घालून 
पाठींबा देतोय 

मला हे महत्वाचे नाही कि तो काय देतोय
त्याने दिलेला वडापाव मराठी समीक्षेपेक्षा जेन्युईन आहे 
इतका दिलासा मला पुरेसा आहे 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही २ ह्या अप्रकाशित आगामी काव्यसन्ग्रहातून )



  






No comments: