अपेक्षा /श्रीधर तिळवे
लोक अतिस्वतंत्र झाले कि
वाद म्हणून भांडायला लागतात
लोक अतिगुलाम झाले कि
वाद म्हणून बंड उभारतात
मी ना अतिस्वतंत्र ना अतिगुलाम
विविधतेचा मला सराव आहे
आणि ते जे आहे
त्याला ठाव आहे
जे ठाऊक ते घाऊक
जे ठाऊक नाही ते किरकोळीला MALL काढून देत
मला मेमरीचा एनसायक्लोपीडीया फ्री करायचा नाहीये
फक्त कवितेसाठी अवेलेबल होणारे SOFT पेज
निर्विकार कोरे असावे
एवढीच अपेक्षा
ह्या गुरुत्वमध्यात आहे
श्रीधर तिळवे -नाईक
(क व्ही २ ह्या आगामी अप्रकाशित काव्यसंग्रहातून )
No comments:
Post a Comment