प्रसन्नजी , कोसला आवश्यकच होती तिने मराठी कादम्बरीला मौजेच्या आणि सत्यकथेच्या दालनातून बाहेर काढली त्यामुळे मी त्यानंतर देशीवाद निर्माण झाला नसता तर परंपरेचा पुरस्कार करणाऱ्या वास्तववादाची लाट १९८० नंतर निर्माण झाली नसती . देशिवादाने परंपरेला खोटी प्रतिष्ठा
दिली . वास्तविक देशिवादाआधी तुकाराम मर्ढेकर करंदीकरही परंपरेवर हल्ला करत परंपरेचे भान राखत लिहीतच होते की ! पण परंपरा म्हणजे लय भारी असे वाटायला लागले ते नेमाडेन्च्यामुळे !आणि दलित साहित्य म्हणजे परंपरेच्या विरोधातला सर्वात मोठा उठाव ! भक्तीची पिपाणी वाजवण्याऱ्याना बुद्ध धम्म स्वीकारून जरा ज्ञानाचे तबलाबोल पण ऐका की म्हणणारा , वर्णजाती विरुद्ध निर्भीड पणे उभा ठाकणारा , सकाळ संध्याकाळ विठ्ठ लाचे नाव घेण्याऱ्याना riddles ऑफ रामकृष्ण लिहून देवांचीच उलट सुलट तपासणी करायला भाग पाडणारा असा हा उठाव होता त्यामुळे भक्तीत झोपलेली मराठी संस्कृती जागी व्हायला लागली होती तोवर नेमाडेंनी ही परंपरेची अफू आणली . तिचा प्रसार असा काही झाला की साठोत्तरी नंतरचे साहित्य भक्ती आणि आस्था चानेल बनते कि काय अशी शंका निर्माण झाली . नेमाडेंचा महिमा असा कि दिलीप चित्रे सारखा लेखक जो फक्त देशी होता पुढे देशीवादी झाला . ह्या'' परंपरा परंपरा नेमाड पंथी नायक परंपरा ''वातावरणात दलित उठाव विरून गेला आणि नव्या दलित नायकाची वाट अडवली गेली .
No comments:
Post a Comment