चौथी नवता आणि मराठी भाषा /श्रीधर तिळवे- नाईक
प्रथम प्रश्न मराठी भाषा म्हणजे काय ?
महाराष्ट्री ह्या प्राकृत भाषेपासून तयार झालेली आणि सातवाहनांच्या काळापासून लिखित सातत्य राखलेली भाषा जी सातवाहनाच्या आधी किमान तीन हजार वर्षे मराठी बोलली जात होती .
आता दुसरा प्रश्न चौथी नवता म्हणजे काय
चौथी नवता म्हणजे १९९० नंतर अवतरलेल्या आणि अस्तित्वात असलेल्या चिन्हमानव , विविध जाले ,महाजाले, नेटवर्क्स , चिन्ह्वस्तु , बाजार , पणनता , प्रतिसृष्टी , जगे , असता , निसर्ग , कृषी , शेती , निसर्गवस्तू , संस्कृत्या , सभ्यता , राष्ट्रे , क्रयवस्तू , शास्त्रज्ञ , तंत्रवैज्ञानिक व वैज्ञानिकांनी लावलेले शोध , तंत्रशोध , मानवनिर्मित वस्तू , मानवनिर्मित पवित्र वस्तू , उत्पादनयंत्रणा व उत्पादनतंत्रणा , तंत्रनेटवर्क्स , आणि त्यांचे चिन्हजैविक , तांत्रिक , शास्त्रीय , वैज्ञानिक , तर्कशास्त्रीक , कलिक , दार्शनिक , विचारप्रणालीय , आस्थापानीय , व्यवस्थापनीय चिन्हजैविक क्रिया -नाती -जोडण्या -संबंध -सांधण्या -चौकश्या -तपासण्या -सलग्नता ह्यांचा परस्परांशी व इ-मिडिया , मिडिया , चिन्हसृष्टी-आधारित , प्रतिसृष्टी -आधारित सृष्टी -आधारित तर्क -आधारित कायद्याशी आणि उत्पादनचीन्ह्ना , अध्यात्म , अध्यात्ममानव , निसर्गमानव , आन्वीक्षिकी , तर्कशास्त्र , गणित , भूमिती ,धर्म , विचारप्रणाली , व्यवस्थापन , आस्थापने , प्रेषित , बुद्ध , बोधिसत्व , कला , ह्या सर्वांच्या अभिव्यक्तीशी आणि आशयाशी असलेल्या संबंधांचे चिन्हजैविक महानेटाम्ब्लाज .
ह्या दोघांचे संबंध तपासणे हा ह्या लेखाचा उद्देश आहे
मराठी हालाच्या सतसई (गाथासप्तशती काळ इसपुर्व २०० ते इसोत्तर १०० )पासून सतत उत्क्रांत होते आहे आणि त्याचे सर्वात महत्वाचे कारण ती नेहमीच स्वतःला अपडेट करत आलेली आहे प्रत्येक नवी नवता अपनवत आलेली आहे मराठीने आत्तापर्यंत किमान वीस नवता पचवल्या आहेत आणि हि चीन्ह्सृष्टीय चौथी नवताही ती आत्मसात करून पुन्हा ताजीतवानी होईल ह्याची मला खात्री आहे ह्या एकवीस नवतापैकी शेवटच्या चार विसाव्या शतकातील आहेत त्यातील पहिली १ आधुनिक केशवसूती दुसरी आधुनिकतावादी मर्ढेकरी तिसरी देशी नेमाडी ढसाळी आणि चौथी फेब्रु ९२ च्या सौष्ठव च्या अंकात घोषित झालेली म्हणून चौथी नवता ! वर उल्लेख केलेले महानेटाम्ब्लाज सादर करणे हे तिचे उद्दिष्ट आहे आणि ह्यामुळे पुन्हा एकदा मराठी कला अपडेट होईल अशी तिला खात्री आहे
ह्या चवथ्या नवतेतील भाषेचे असे काय बदलले कि तिला नवता म्हणण्याची वेळ आली ?
ह्यापूर्वी भाषेची चार युगे झाली निसर्गीय युग विश्वीय युग सृष्टीय युग प्रतीसृष्टीय युग ह्या प्रत्येक युगात भाषेने एक अवतार धारण केला निसर्गीय युगात मौखिक विश्वीय युगात लिखित सृष्टीय युगात छापील प्रतीसृष्टीय युगात मुद्रित म्हणजे ध्वनीदृश्यमुद्रित भाषा होती
१९९० नंतर तिने पुन्हा नवा अवतार धारण केला चिन्हसृष्टीय युगात ती स्पन्दीय झालीये स्पन्दाचे पहिले रूप बाईट आहे ह्या युगात भाषेला सर्वाधिक वेग प्राप्त झाला आणि तिने फक्त स्वतःचा वेग वाढवला नाही तर माणसाच्या जीवनाचा वेगही वाढवला इतकेच न्हवे तर भाषा प्रचंड लवचिक झाली आणि कलरफुल झाली किंबहुना black and white सिनेमाचा रंगीत सिनेमा व्हावा तसाच काहीसा प्रकार वर्तमानपत्रातील छापील भाषेचा झाला ती अचानक स्पन्दीय होऊन कलरफुल झाली ती इंटरनेटद्वारा रोजच्या व्यवहारात आली ह्या स्पन्दीय भाषेमुळे ह्या युगात चिन्हे केंद्रस्थानी आली आणि बघता बघता टीव्ही , संगणक , laptop , मोबाईल , tablets ह्या चीन्ह्वस्तुनी भारली गेलेली नवी चिन्ह संस्कृती निर्माण झाली ह्या चिन्ह संस्कृतीला साजरी करणारी स्थिती म्हणजे चौथी नवता! डीजीटल हे तिचे पहिले व्यक्त आहे उद्या आणखी काही ब्रेकथ्रू मिळू शकतात चौथी नवता ही तीन अवस्थेतून गेलीये
१ प्रिडिजिटल १९८० ते १९९०
२ डिजिटल १९९१ ते २०००
३ पोस्टडिजिटल २००१ ते आज
तिन्हे पुन्हा एकदा नवे जागतिकीकरण घडवून आणले . जागतिकीकरण ही चिन्हसृष्टीकरणाची अभिव्यक्ती आहे जशी कि साम्राज्यवाद ही ओंद्योगीकीकरणाची होती दुर्देवाने आपण सर्वच अभिव्यक्तीवर चर्चा करतोय आशयावर नाही . चीन्हसृष्टीकरण हा आशय आहे त्यावर आधिक चर्चा व्हायला हवी स्पन्दियतेने भाषेचा वेग असाधारण केलाय तो वाढतच जाणार मात्र अजूनही जागा आहेच टीव्ही , संगणक , laptop , मोबाईल , tablets ह्या चीन्ह्वस्तुनी सध्या धुमाकूळ घातलाय त्या हळूहळू जीवनावश्यक वस्तू बनत चाललेत त्यांच्यामुळे मी माझ्या एका कवितेत म्हंटल्याप्रमाणे
भाषा प्रचंड झालीये
आणि तिच्याकडे सांगण्यासारखं
काहीही उरलेलं नाहीये
असं कधीकधी वाटत अर्थात ते टिकत नाही कारण ही स्पन्दीय भाषा कधी झोपत नाही तिला जागवायला
चिन्ह्वस्तु ऑन आहेत त्यामुळे माहितीची सैतानी गरज निर्माण झालीये माहितीचे कारखाने सुरु झालेत ते चोवीस तास ऑन ठेवणे गरजेचं झालय आणि माहितीचा आणि अनुभवांचा वेग इतका वाढलाय कि
मला आत्ताच काय झालय ते आठवत नाही
आणि तुम्ही काल काय झालं म्हणून काय विचारताय
अश्या विचारणा करणाऱ्या माहितीच्या माहितीचीन्ता निर्माण झालेत
ह्या नवतेत भाषांचे दोन प्रकार झालेत
१चिन्हिकरणीय :ज्यांचे चिन्हिकरण झाले आहेत अश्या
२ अचिन्हिकरणीय : ज्यांचे चिन्हिकरण झालेले नाही अश्या
ह्यातून एलिट आणि डिलीट असा संघर्ष निर्माण झाला आहे
चौथी नवता हा संघर्षही मांडते आहे
निओन चोमस्की ह्या अमेरिकन भाषाशास्त्रज्ञाने युनिव्हर्सल ग्रामर मांडले होते ते आता वेगळ्याच रूपाने साकार होते आहे ज्याची खुद्द त्यानेही कल्पना केली न्हवती . ओल्विन टोफलरच्या भाषेत सांगायचे तर हा चौथा वेव आहे आणि मराठी संस्कृती त्याने आता भारावली जात आहे . जगात वेळोवेळी लागलेले चिन्ह्शोध आत्मसात करत मराठीची चीन्ह्सन्स्कृती घौडदौड करते आहे . टीव्ही , मोबाईल , कॉम्पुटर , laptop , tablets , mp३ ह्यांना वापरात आणत ती वेगवेगळे भाषिक प्रयोग करते आहे हे करताना सर्व भाषेतून नवीन शब्द बिनधास्त घ्यायचे सोवळेपणा पाळायचा नाही असा तिचा अजेंडा आहे हे ती सहा प्रकारे करत आहे तिने केले आहे .
हे तिने कसे केले
१ प्रतन करून म्हणजे कॉपी करून जसा मी इथे कॉपी हा शब्द जसाच्या तसा घेतला टीव्ही , मोबाईल , कॉम्पुटर , laptop ,
tablets , mp३ही आणखी काही उदाहरणे
२ अनुप्रतन करून म्हणजे थोडा बदल करून उदाहरणार्थ अपनवणे खुद्द हिंदीत हा शब्द नाही पण आपण तो अपनवला आता ह्यातून कशी टिन्ज निर्माण होते ते पहा आत्मसात करणे म्हणजे मास्टर करणे पण अपनवने म्हणजे स्वीकार करणे मात्र प्रेमाने म्हणजे हे आत्मसात करणे आणि स्वीकार करणे ह्यांच्या दरम्यानचे प्रेमजन्य आहे जे मराठीत न्हवते ते ह्या शब्दाने आले हे अनुप्रतन
३ स्थानप्रतन म्हणजे मराठी पुरता स्थानिक लोकांनी स्वतःपुरता केलेला नवीन शब्द उदाहरणार्थ झेरॉक्स मारणे आता मूळ शब्द photocopy पण झेरॉक्स कंपनीने photocopy पसरवली आणि कोल्हापुरात प्रथम झेरॉक्स मारणे हा शब्द आला आणि तो पसरला . कोल्हापुरात मारण्याचा शौक जास्त त्यामुळे कोल्हापुरी लोक काहीही मारतात त्यामुळे त्यांनी झेरॉक्स काढण्याऐवजी मारली
४ विप्रतन म्हणजे मूळ शब्दाचा विपरीत वा उलट अर्थ होणे म्हणजे एकेकाळी आयटम ह्या शब्दाचा अर्थ बाजारू चीप स्वस्त असा होता आणि मुलींना आयटम म्हंटल कि राग यायचा पण ह्या सहा वर्षात ह्या शब्दाचा अर्थ सेक्सी आणि आकर्षक असा झाला आणि भल्या भल्या हिरॉइन आयटम सॉंग करायला लागल्या अगदी सोनाक्षी सिन्हाही खामोशला न जुमानता आयटम करती झाली
५ अनुसृजन म्हणजे नवीन शब्द तयार करणे १९९२ साली मी चिन्हसृष्टी असा एक शब्द कॉईन केला तो पसरला प्रभाकर पाध्येनी आपणाला नेत्रदिपक दिला म्हणजे हा शब्द दिला तो ताबडतोब रूढ झाला ह्यात अनेकदा दोन शब्द जोडून नवा शब्द तयार केला जातो परवाच मी मोरोपंत वाचत होतो तर दारूच्या व्यसनाला त्यांनी दिलेला पानव्यसन असा मस्त शब्द दिसला .
६ सृजन करणे म्हणजे नवा शब्द तयार करणे हे फार अपवादाने घडते ज्यावेळी भाषा अनुसृजन करण्यात कमी पडते तेव्हा असा शब्द तयार करावा लागतो वा होतो म्हणजे नेटवर्क अचानक स्लो होण्याला माझा शब्द उस्फुर्त आला ''कुंबळल '' म्हणजे मी रागाने,'' कुंबळल सालं !'' म्हणालो आणि माझ्या एडीने तो पिक केला . तो माझ्या gang मध्ये रुजायला लागलाय ह्या शब्दाला अनिल कुंबळे जबाबदार असावा बहुदा !
आता पारंपारिक लोक ह्याला नाकं मुरडणार आणि नवी पिढी हे बदल ताबडवणार हे उघडच आहे . दृष्टीकोन एकच आहे '' पूर्वी फार्शी खाल्ली आता इंग्लिश खाऊ एखादी गोष्ट बूटेबल कशी बनवायची ते आम्हाला चांगलं कळत ''
ह्याचा अर्थ आम्ही सिरिअस नाही असा नाही . वर दिलेली चौथ्या नवतेची व्याख्या किती जड आहे ना ?
मी ती इंग्लिश मध्ये एका अध्यात्मिक चर्चेत सहज दोन मिनटात दिली होती पण आत्ता मराठी भाषेत तिचा अनुवाद करताना मला तब्बल अर्धा तास लागला आहे कारण मराठीत अचूक शब्द शोधणे हे एक जिकरीचे काम आहे . पण हे आम्हाला करावे लागणार ह्याची आम्हाला जाणीव आहे
अश्या कठीण भाषेची टवाळी होणार आणि मराठीत वैज्ञानिक तयार होत नाहीत म्हणून बोंब पण मारली जाणार हे उघड आहे कारण नवीन गोष्टीची टर उडवणे हा मराठी लोकांचा काहीसा आवडता सांस्कृतिक उपद्वाप आहे आणि आपण तो कायमच करत असतो . क्वान्टम फिजिक्स शिकताना अवजड इंग्रजीत शिकणारे मराठीत आले कि मराठी किती कठीण म्हणून बेंबटायला लागतात.हे असे का होते कारण इंग्लिशमध्ये कठीण भाषा शब्दकोश लावून शिकणारे लोक मराठीत आले कि साहित्यिक होतात त्यांना असे वाटते कि माझी मायबोली आहे मला लगेच कळायला हवी आत्ता जो नियम इंग्लिशला लागू आहे तोच मराठीला लागू आहे इंग्लिश मध्येही अशा भाषेची टवाळी होतेच पण म्हणून कोणी दुसऱ्या माध्यमाकडे जात नाही ह्या सर्वाना आता हे सांगायची वेळ आली आहे की साहित्य भाषेचा दुय्यम रोल आहे . मूळ रोल विज्ञान , तंत्रज्ञान आणि चिन्हतन्त्र्ज्ञान आहे आणि तो पार पडायचा असेल तर कठीण भाषा झेलायची तयारी ठेवा अन्यथा इंग्लिशधार्जीनेपणा चालू ठेवा आणि तो ठेवला कि तुमची भाषा फार काळ टिकणे शक्य नाही कला ही समाजाची साय आहे दूध न्हवे . भाषे विषयी बोलताना ही मुलभूत गोष्टच आपण लक्ष्यात घ्यायला हवी भाषा जगायला उपयोगी पडत असेल तर टिकते अन्यथा नाहीशी होते त्यामुळे छोट्या छोट्या भाषा नाहीश्या होणे अटळ त्यांच्या विषयीचा सांस्कृतिक जिव्हाळा तुम्हाला टाळ्या मिळवून देईल भाकरी नाही त्यामुळे काय टिकवायचे ह्या बाबत ''प्रमाण मराठी भाषा टिकवायची '' हेच चौथ्या नवतेचे उत्तर आहे बाकी सगळ्या दोन तीन शतकाच्या गमज्या आहेत मी अनेकदा म्हटलय कि जोवर आइनस्टाईन अहिराणी किंवा मालवणी भाषेत शिकवण्याच्या शक्यता निर्माण होत नाहीत तोवर ह्या भाषा टीकायच्या नाहीत अन्यथा एकीकडे आपली पोर इंग्लिश माध्यमात टाकायची आणि दुसरीकडे लोकांना मराठी टिकवा अहिराणी टिकवा म्हणून सांगायचे ह्याला काही अर्थ नाही . भाषेबाबत एक पोचलेला ढोंगीपणा आपणा सर्वांच्या ठायी निर्माण झाला आहे तो जोवर नाहीसा होत नाही तोवर पोचेपणा जाणार नाही . तर भाषा टिकवायची आणि विज्ञान , तंत्रज्ञान आणि चिन्हतन्त्र्ज्ञान ह्यासाठी टिकवायची हे पक्के आहे
सध्या मराठी तरुण भावनिक मुद्द्यावर डोकी फोडतोय स्वतःची किंवा इतरांची असा प्रवाद आहे चौथ्या नवतेचे म्हणणे असे आहे की विधायक काम महत्वाचे त्यासाठी भाषेचा खरा इतिहास तपासणे महत्वाचे पूर्वी जी नेटवर्क्स संशोधनाला उपलब्ध न्हवती ती आता आहेत सगळा डाटा गोळा करून त्याचे संगणकीय विश्लेषण करणे सहज शक्य झाले आहे उदाहरणार्थ हे आता स्पष्ट होते आहे कि इसापूर्व ते इसोत्तर ६०० पर्यंत नाणेघाट शिलालेख वगळता संस्कृत कुठेच नाही. गोळा केलेला data असं सांगतो कि हजारो नाण्यावर फक्त प्राकृत आहे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे संस्कृत ही प्राचीन भाषाच न्हवती आता ह्यामुळे मराठी भाषा हीं संस्कृतपासून तयार झाली हा भाषेविषयीचा सनातन सिद्धांत कोसळून पडणे अटळ आणि हे सर्व चौथ्या नवतेची मशिनरी वापरल्याने शक्य झाले आहे पण ह्यामुळे हेही स्पष्ट होते कि प्राकृत भाषा भारतभर प्रचलित होत्या आणि त्यांची नाणीही ! मराठी प्राकृतही पांच हजार वर्षे प्रचलित होती ह्या नाण्यावरून हेही स्पष्ट होते कि भगवान शिव हाच भारताचा आद्य देव होता आणि आहे कारण परकीय पर्शियन राजवटीच्या नाण्यावरसुद्धा तो आहे आणि सिंधू संस्कृतीच्या सिल्सवरही !
चौथ्या नवतेच्या भाषिक व चिन्हिक डाटाने मोडीत
काढलेला आणखी एक सिद्धांत म्हणजे आर्यांच्या तथाकथित आक्रमणाची थेरी! संपूर्ण
भारतीयांचे जनेटिक कोड नमुने घेवून उलगडल्यावर हे स्पष्ट झालय कि साडेतीन हजार
वर्षात भारतात कोणीही बाहेरून आलेले नाही त्यामुळे मूळनिवासी विरुद्ध
बाहेरील आर्य ह्या सिद्धांताला काहीही अर्थ उरत नाही ह्याचा अर्थ ब्राह्मण
बाहेरून आले वगैरे सर्व बकवास आहे ह्याचा अर्थ हाही होतो कि भारतीय मुसलमान हा
प्रथम भारतीय होता मग मुसलमान झाला म्हणजेच ह्या देशावर इथल्या मुसलमानांचा
हिंदूंच्याइतकाच हक्क आहे . जातीभेद भंपक आहे कारण अस्पृश्य आणि मराठा
ह्यांच्या जनेटिक कोडमध्ये फरक नाही जो आहे तो व्यक्तिगत आहे त्यामुळे ह्या
देशातल्या ह्या समृद्ध हिंदू अडगळी आपण इतिहासजमा कराव्यात हे उत्तम !
तर चौथ्या नवतेच्या इतिहास जाणू इच्छीणाऱ्या लोकांना त्यामुळेच इतिहासात डोकावून नवीन मशिनरी वापरून नवे शोधायला भरपूर वाव आहे
डोकी फोडण्यापेक्षा डोकी संशोधनासाठी पणास लावणे केव्हाही बरे
कुठल्याही भाषेचा फक्त वर्तमान आणि इतिहास महत्वाचा नसतो भाषेचे भविष्यही महत्वाचे असते सध्या मराठी संस्कृतीत मराठी भाषेविषयी ती भविष्यात टिकणार का अशी वारंवार काळजी व्यक्त केली जातीये हा प्रश्न इतका निकरावर आलाय कि भालचंद्र नेमाडेंनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करा असे सांगितले . ह्या बाबतीत मराठी संस्कृती दुभंगलेली दिसते . आपल्याला एकीकडे मराठी भाषा टिकवायची पण आहे आणि आपल्या पोरांना इंग्लिश माध्यमातही शिकवायचे आहे ह्या दोन्ही टोकांना सांधायचे कसे कारण इतिहास सांगतो कि एखादी संस्कृती स्वतःच्या भाषेत शिकायची बंद झाली कि आपोआप नाहीशी होते उदाहरणार्थ गोव्यात पोर्तुगीज माध्यमाच्या शाळा बंद पडल्यावर गोव्यातून पोर्तुगीज नाहीशी झाली संस्कृतची विदयापीठे
होती म्हणून संस्कृत जनसामान्याची भाषा नसूनही टिकली आत्ताही तिची departments आहेत म्हणून कशीबशी जिवंत आहे ह्या पार्श्वभूमीवर मराठीचे काय ?हा एक असा प्रश्न आहे कि ज्याला विचारवंतानी कायम बगल दिलेली आहे नेमाडेंनी प्रथमच एक ठाम विधान केले आहे पण ते अंमलात आणायला लागणारी इच्छाशक्ती आपल्या राजकीय संस्कृतीत आहे काय ? मराठीला राज्यभाषेचा दर्जा मराठी राज्यकर्त्यांनी कधीही दिला नाही त्यासाठी इंग्रज यावे लागले इंग्रजांनी फारशी हट्वून मराठी राज्यभाषा केली इतके आपले राज्यकर्ते पहिल्यापासून पोंचे आहेत जेव्हा राजा निर्णय घेत नाही तेव्हा प्रजा निर्णय घेते आणि प्रजा गोंधळलीये एकीकडे तिला वाटतय कि मराठी माध्यमात मुलांना टाकले तर इंग्रजीविना त्यांची करिअर्स होणार नाहीत आणि इंग्रजीत टाकली तर मराठीत ती किंवा त्यांची मुलबाळ बोलणार नाहीत अशावेळी करायचे काय ? शिवाय भाषेविषयी सर्वाधिक अभिमान ज्या साहित्यिकांनी बाळगायला हवा त्यांनी आपली मुलं इंग्रजीत टाकलेली त्यामुळे अशा पोच्या आणि दुटप्पी साहित्यिकांचा काय सल्ला घ्यायचा ? मग करायचे तरी काय ? त्यामुळे मराठीचा कट्टर अभिमान बाळगणारे लोक वगळता सगळेजण ट्रेंड फॉलो करतायत. ब्राह्मणांनी संस्कृत दिली नाही मराठी ज्ञानभाषा झाली नाही आणि इंग्लिश ज्ञानभाषा म्हणून निवडण्याचा पर्याय धडाधड पुढे येतोय वेगवेगळ्या पॅकेजसह ! त्यामुळे
चल चल मुरारी हिरो बनने
इंग्लिश स्कुलमे मराठी पढने ॥ ध्रुपद ॥
चल चल चल तू भर ले बैग
टिफिनके साथ कर कल्चर पैक
इंग्लिशमे सीखके काम करेगा
पापा कहते हैं नाम करेगा
बचपनमें तेरे बाल हैं झड़ने
इंग्लिश स्कुलमे मराठी पढने
चल चल मुरारी हिरो बनने॥ १ ॥
क्या हुआ गर भुला तू माँ
माँभी खुश जब कहेगा ममा
बाप कोभी बोल हैलो डैड
वहभी होगा वर्ना सैड
चल चल चल तू जीते जी मरने
इंग्लिश स्कुलमे मराठी पढने
चल चल मुरारी हिरो बनने।। ॥ १ ॥
काहेकि हिंदी काहेकि मराठी
इंग्लिशके हाथमे सबकी लाठी
इंग्लिशमे लिखा गया संविधान
भारतीय भाषाओंका तभी गया प्राण
अभी नहीं समझेगा लग जा बढ़ने
चल चल मुरारी हिरो बनने
इंग्लिश स्कुलमे मराठी पढने।।॥ ३ ॥
मराठीके बिना सबकुछ चलेगा
मराठी मानुसभी इंग्लिश बोलेगा
टूटीफुटी इंग्लिश चलेगी चलना
सबकुछ बोलना मराठी न बोलना
मराठी न बोलना मराठी न बोलना
मराठी न बोलना मराठी न बोलना
तूभी सीखेगा इंग्लिशमे लड़ने
इंग्लिश स्कूलमे मराठी पढ़ने
चल चल मुरारी हिरो बनने॥ ४ ॥
असं म्हणत आपल्या पोरांना इंग्लिश माध्यमात टाकतोय
( गाणं माझ्या अर्थ ह्या अप्रकाशित कादंबरीतील आहे गाणं मुद्दामच हिंदीत आहे कारण निवेदकालाही मराठीत बोलायचं नाही )
अश्या ह्या पार्श्वभूमीवर
करायचे काय ? वैज्ञानिक पुरावे पुरेसे ठोस नाहीत अश्यावेळी एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे आत्ता आहे त्या स्थितीत इंग्लिश माध्यमात काही बदल घडवणे
इंग्लिश मराठी संस्कृती खायाला पाहतीये ना मग आपण तिला इंग्लिशमधून मराठी संस्कृती खायाला घालायची मराठी भाषिक कपडे जाणार असतील तर कपडे जाऊ द्यायचे आणि इंग्लिश भाषी कपड्यांना मराठी सांस्कृतिक शरीर घालण्यास भाग पाडायचे म्हणजे नेमाडे कसे इंग्लिश कपडे घालून देशीवाद सांगतात तसेच करायचे म्हणजे काय तर
बारावीपर्यंत फक्त मराठी साहित्य साहित्य म्हणून शिकवायचं . मराठी माणसाचा इतिहास शिकवायचा मराठी भूगोल शिकवायचा उगाच हिंदी किंवा इंग्लिश साहित्य नाही . इंग्लिश शाळेतही अनुवाद केलेले फक्त मराठी साहित्य शिकवायचं शेक्सपिअर गेला गाच्या गात राष्ट्रीय साहित्य राष्ट्रीय इतिहास भूगोल बारावीनंतर मग माध्यम कुठलही निवडा हिंदी निवडलात तरी ज्ञानेश्वर तुकाराम नेमाडे चित्रे ढसाळच वाचावे लागतील . त्यामुळे आपल्या साहित्याचे अनुवादक मिळतील . बारावीला अर्थशास्त्र समाजशास्त्र वगैर ला मराठी अर्थशास्त्रज्ञ , समाजशास्त्रज्ञ वगैरे अभ्यासक्रमाला लावायचे . पोरांना आंबेडकर , इरावती कर्वे ह्याचं काम माहित नसण हे लाजिरवाणे आहे . चिन्हतंत्रज्ञान , विज्ञान आणि तंत्रज्ञान मात्र जगभरचे शिकवावं फिजिक्स शिकवताना भारतीय फिजिक्सचा इतिहास शिकवावा तसच रसायनशास्त्राच करावं
इतके बेसिक बदल तरी घडवू शकतो आपण ! आत्ता हेही जमणार नसेल तर आपण
सर्वांनी भाषिक आत्महत्या कराव्या .
श्रीधर नलिनी शांताराम तिळवे नाईक
No comments:
Post a Comment