निगमी , नास्तिक , निरीश्वरवादी आणि नि:मुस्लीम / श्रीधर तिळवे -नाईक
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सऊदी अरेबियाने निरीश्वरवादी लोकांना दहशतवाद्यांचा दर्जा दिला आहे. हे सत्य आहे की अफवा हे कळणे कठीण आहे. मात्र ह्या निमित्ताने ईश्वरवादी विरुद्ध निरीश्वरवादी हा वाद उफाळून येणे अपरिहार्य आहे .
भारतात सिंधू संस्कृतीच्या आधीच शैव आगम आणि जैन आगम मौखिक माध्यमात स्थिर झाले होते . भारतात जेव्हा वैदिकांचा उदय झाला तेव्हा त्यांचा आगमान्च्यावर विश्वास न्हवता तेव्हा आगमान्च्यावर विश्वास नसलेले ते निगमी अशी संज्ञा देण्यात आली
पुढे भारतात वैदिकही स्थिर झाले पण त्यांनी वेदांच्यावर विश्वास न ठेवणारे ते नास्तिक अशी व्याख्या केली
आणि जैन , बौद्ध , लोकायत ह्यांना नास्तिक दर्शने म्हणायला सुरवात केली
ह्यानंतर भारतात वैदिकांच्यातून असुर फुटून निघाले व त्यांनी व दक्षिण भारतातून (ह्यात श्रीलंकाही येते )निघालेल्या अब्राहमने अत्यंत शास्त्रशुध्द पद्धतीने एकेश्वरवाद विकसित केला त्यातून झेंद अवेस्ता आणि पारशी धर्म आणि ज्यू धर्म विकसित झाला . हे असुर पुढे अफगाणीस्तान . इराण , इराक , सौदी अरेबिया , सिरीया असे सर्वत्र पसरले आणि त्यांनी ह्या प्रदेशात एकेश्वरवाद पसरवला . पुढे ख्रिश्चन आणि इस्लाम ह्यांनी तो आणखी पसरवला . ह्यांनी ईश्वरावर विश्वास न ठेवणाऱ्यांना ''निरीश्वरवादी '' म्हणायला सुरवात केली .
इस्लामने वैदिकांचे अनुकरण करून वैदिकांनी जसे आपले धर्मग्रंथच सर्वस्व मानून आस्तिक आणि नास्तिक अशी विभागणी केली तशीच कुराणाला सर्वस्व मानून मुस्लिम आणि नि :मुस्लिम (गैर मुसलमान ) अशी जगाची फाळणी केली आणि त्यातूनच क्रुसेडस निर्माण झाली
निगमी , नास्तिक , निरीश्वरवादी आणि नि : मुस्लिम (गैरमुसलमान )ह्या चारही शब्दांची पार्श्वभूमी अशी आहे .
आगमी , आस्तिक (म्हणजे वेदावर विश्वास ठेवणारे ), ईश्वरवादी , मुस्लीम जेव्हा कट्टर होतात तेव्हा रक्ताचे पाट वाहू शकतात . सुदैवाने आगमी अहिंसक आहेत मात्र दक्षिण भारतात आगमी ब्राह्मण वैदिक ब्राह्मणांना हीन समजतात आणि श्राद्ध , बार्श्यासारखे विधी करणारे बडबडे म्हणतात . ईश्वरवादी मात्र रक्ताचे पाट वाहवण्यात निपुण आहेत . किंबहुना ज्यू , ख्रिश्चन आणि मुस्लिम ह्यांच्यातील क्रुसेडसनी जेवढे मानवजातीचे रक्त वहावले आहे तेवढे दोन महायुद्धानीही वाहवलेले नाही .
अशा पार्श्वभूमीवर असा काही कायदा येणार असेल तर हे सारे वाद पुन्हा नव्याने उफाळून येणे अटळ ! शैव , जैन आणि बौद्ध हे निरीश्वरवादी असल्याने ह्या कायद्यानुसार हे सर्वच दहशतवादी होतात . जागतिक शांतता आणि सहिष्णुता ह्यांच्यासाठी हे चांगले लक्षण न्हवे .
No comments:
Post a Comment