Tuesday, November 17, 2015

नकुलीश /श्रीधर तिळवे - नाईक 

तूच दिलेस अधिकृत  दर्शन
त्यानेच सुरु झाले घर्षण

पतंजलीला योगानुशासन
लकुलीशाला पाशुपतदर्शन

जरी पुढे झाले वैदिक
जिथे बसायची तिथे बसली किक

वैदिक ब्राह्मण हेलपाटले
यज्ञ त्यागून पूजेस लागले

फेकून दिले हवन होम
तेही सुरवातीस म्हणतात ओम

पूजा झाली प्रायमरी
यज्ञ झाले सेकंडरी

आणि आत्ता पुन्हा जागे
खेचावयास शिवत्व मागे

सुरु झाले ह्यांचे संघ
प्राचीन डाव नवे रंग

कट्टर मुस्लिम देतायत ओपनिंग
मुस्लिमधार्जिणे देतायत रनिंग

पुरोगामी बनतायत मूर्ख
त्यागून डोक्यातला तर्क

शैवांनी आता जावे कोठे
फक्त फुगेच झालेले मोठे

निर्वाण बघू कि बघू समाज
माझ्याच लोकांनी आणली लाज

तुझ्या दारात श्रीधर थांबला
त्याच्या काळजाचा आंबा आम्बला
श्रीधर तिळवे -नाईक
 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )


No comments: