आपले काम करत रहावे लागेल .
जेव्हा कुठलेही नवे युग येते तेव्हा ते सोबत नवा मिडिया घेवून येते आणि त्या मिडीयाचा सुरवातीच्या काळात सर्वाधिक वापर पारंपारिक लोक करतात म्हणजे मौखिक निसर्गीय युगानंतर जेव्हा लिखीत विश्वीय युग आले तेव्हा ते सोबत लिखित मिडिया घेवून आले आणि सर्वात प्रथम त्याचा प्रचंड वापर पारंपारिक वैदिक ,ब्राह्मणी , , वैष्णव लोकांनी केला आणि पुराणे आणि महाकाव्ये ह्यांचा प्रचंड गलबलाट करून सोडला इतका कि शैव जैन आणि बौद्ध संहिता दिसेण्याश्या झाल्या हेच सृष्टीय युगाच्या छापील माध्यमात झाले . बायबलचा प्रचंड गाजावाजा झाला त्याच्या करोडो प्रती गेल्या आपल्याकडे रामायण वेद उपनिषदे महाभारत वेगवेगळ्या स्वरुपात अवतरली सृष्टीयतेचे एक प्रभावी अंग हे धार्मिक नाटके प्रचंड प्रमाणात सादर करू लागले पुढे प्रतीसृष्टीय मुद्रीय माध्यम आले तेव्हा सुरवातीचे चित्रपट धार्मिकच होते आणि सीता अभिनित करणाऱ्या शोभना समर्थ सुपरस्टार होत्या उत्तरमुद्रित टीव्ही आला तेव्हाही सर्वाधिक लोकप्रिय रामायण आणि महाभारत होते परंपरेची आरंभीची भरमार अनेकांची डोकी फिरवते ह्यात नवतावादी लोकांची सुरवातीला फार कुचम्बना होते पण नवतावादी लोकांनी घाबरून जायाचे नसते हा एक सनातन लोट असतो परंपरेचा धुरळा असतो अनेकदा ब्राह्मण्यवादी शक्ती जिंकतात जेव्हापासून चीन्ह्सृष्टीय युग आणि बीटल माध्यम आले आहे तेव्हापासून ब्राह्मण्य आणि भाजप वाढत गेलेले दिसतात अशावेळी डोके शांत ठेवणे गरजेचे आहे . हळूहळू हा धार्मिक उन्माद ओसरून जाईल परंपरेची भोकं लोकांना दिसायला लागतील सारे दहशतवादी सारासार विचार करायला लागतील आणि परंपरेच्या ताब्यात गेलेली चिन्हसृष्टी नवतेकडे सरकत राहील तोवर आपणाला महात्मा फुलेंच्याप्रमाणे आपले काम करत रहावे लागेल .

No comments:
Post a Comment