Tuesday, December 29, 2015

मंगेश पाडगावकर :लोकप्रिय रोमांटीसिझमचा अस्त -श्रीधर तिळवे -नाईक 

पाडगावकर गेले . मी आयुष्यभर पाडगावकरावर कडक टीका केली वेळप्रसंगी पाडबानां (पाडगावकर आणि बापट) मराठी कवितेचे खलनायक म्हंटले . तरीही त्यांच्या जाण्याने एक पॉज आलाच . ज्या काळात बेसूर असण्याऱ्या काव्यगायनाचा सुळसुळाट निर्माण झाला होता तेव्हा प्रबोधनवादी नवतेचे वसंत बापट , रोमांटिक नवतेचे मंगेश पाडगावकर आणि आधुनिकतावादी नवतेचे विंदा करंदीकर असे तीन कवी काव्यवाचनाची संकल्पना घेवून उतरले तिघांनीही कविता कशी वाचायची ह्याचा वस्तुपाठ घालून दिला . आणि त्याचबरोबर पाडगावकर आणि बापट ह्या दोघांनी मंचीय कवितेचे कुळही सुरु केले . मराठीतील हे कुळ बघता बघता मुख्य प्रवाह बनले आणि गल्लोगल्ली बापट आणि पाडगावकर निर्माण झाले . त्यांनी गंभीर कविता संपवली . मात्र तरीही पाडगावकर काय करतायत ह्याविषयी कायमच उत्सुकता असायची . पाडगावकर कविता मस्त वाचायचे . जे लिखित आहे ते मौखिक करून पोचवायचे कसे ह्याविषयीची त्यांची जाण विलक्षण तल्लख होती . आमच्या पिढीत ही जाण किशोर कदम  सौमित्र  , दासू वैद्य , प्रकाश होळकर , अरुण म्हात्रे , अशोक नायगावकर ह्यांनी पुढे न्हेली .
पाडगावकरांची मला भावलेली दुसरी गोष्ट म्हणजे  रोमांटीसिझमवरची त्यांची अविचल निष्ठा ! ह्या माणसाने आपल्या कवितेचा पिंड कधीही सोडला  नाही . प्रेमावर त्यांचे प्रेम होते आणि वैयक्तिक संबंधातही त्यांनी ते जोपासले .
आणि त्यांनी लिहिलेली गाणी !ती केवळ अफलातून !त्यांच्या कविता उरोत न उरोत पण त्यांनी लिहिलेली गाणी अजरामर आहेत . ''भातुकलीच्या खेळामधली  '' ''अखेरचे येतील  '' ''भेट तुझी माझी स्मरते '' '' असा  बेभान हा वारा '' '' सांग सांग भोलानाथ '' '' दिवस तुझे हे फुलायचे ''अभूतपूर्व ! दिवसातून  किमान एकदा तरी त्यांचे एक तरी गाणे ओठावर यायचेच ! त्यांना गीतकार म्हणून आधिक वापरायला हवे होते पण चित्रपटात अकलेचा ह्याबाबत दुष्काळच . हिंदी वाल्यांनी जसे साहीर शकील कैफी जांनिसार अख्तर मजरूह ह्यांना नीट वापरले तसे मराठी वाल्यांनी पाडगावकर ,  भट , महानोर ह्यांना वापरले असते तर बहार आली असती .
पाडगावकरांच्या जाण्याने लोकप्रिय रोमांटीसिझमचा शेवटचा सत्यकथावादी तारा निखळला . त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली . ईश्वर यदाकदाचित असलाच तर मला खात्री आहे पाडगावकर त्याला तुमचे आणि आमचे सेम असते हेच सांगत असतील .

श्रीधर तिळवे -नाईक  

Saturday, December 19, 2015

संन्यासी म्हणून माझ्या आयुष्यात मी जे काही नियम घालून घेतलेत त्यातील एक म्हणजे यदाकदाचित काही वैयक्तिक  दु: खद असेल तर त्याच्याविषयी काही वेळ गेल्यानंतर बोलणे त्यामुळे माझ्या कवितावरून कृपया कुणी माझ्या आत्ताच्या स्थितीची  काही कल्पना करू नका .


Thursday, December 17, 2015

समझ नहीं पा रहा था मेरी सांसे अटक अटकके क्यूँ चल रही हैं ?
अब पता चला कि मेरे हक़की  हवा बाजारमें चली गयी हैं
श्रीधर तिळवे 

Monday, December 14, 2015





सुरवात माहित नाहीय
शेवट सापडत नाहीये 
तुला आवडो अगर न आवडो 
 पण जे आहे ते ''मधे '' आहे 

विलास सारंगांचा चौथा  व्यक्तिवाद 

श्रीधर तिळवे 
विलास सारंग गेले . त्यांची तब्येत तशी काही वर्षे खराब होती आणि त्यांच्या मृत्यूची कुणकुण तशी लागलेली होती त्यामुळे धक्का न्हवता पण उदासी आलीच . 

विलास सारंग माझ्यासाठी नेहमीच '' सत्यकथेच्या पलीकडे गेलेले सत्यकथावादी कवी '' राहिले आणि त्यांच्या समीक्षेवर मी ''अभिधानन्तर''मध्ये ''अक्षरांचा श्रम केला :सत्यकथेचा आधुनिकवाद ''  असा एक प्रदीर्घ लेख लिहला होता आणि त्यांची मते खोडून काढण्याचा माझ्या परीने त्यात प्रयत्न केला होता. मराठीत साठोत्तरीतील  ज्यांच्याशी वाद घालावा असे वाटणारे जे काही मोजके प्रज्ञावंत लोक झाले त्यात विलास सारंग हे फार महत्वाचे प्रज्ञावंत लेखक होते . 

विलास सारंग मराठीत नेमका कोणता रोल पार पाडत होते ?

जगात विश्वीय युगात धर्माला आव्हान देणारे जे साहित्य जन्मले  त्यातून जगातला पहिला व्यक्तिवाद जन्मला . त्याचे स्वरूप हे प्रामुख्याने अध्यात्मिक होते.  एका अर्थाने हा अध्यात्मिक व्यक्तिवाद होता . त्याने प्रस्थापित धर्माला गदागदा हलवले . मराठीत ह्या व्यक्तिवादाची स्थापना ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीने  केली .  ह्यातील ज्ञानेश्वरांना मराठी संस्कृतीने  बहिष्कृत केले होते  आणि पुढे त्यांना समाधी  घ्यायला लावली . चक्रधरांचा बहुधा दाभोळकर-पान्सरेन्च्याप्रमाणे खून झाला आणि नामदेवांना त्यांच्या घराण्याचा विठ्ठल मंदिरावरचा हक्क सोडायला लावून  शेवटी घुमान मध्ये सेटल  व्हायला भाग पाडले . ह्या व्यक्तिवादाचा कळस होता तुकाराम ! हा एक अफलातून कवी होता आणि त्याच्या हयातीत मराठी लोकांनी  त्याला जितका त्रास देता येईल तितका दिला . मराठी हि प्रतिगामी संस्कृती असल्यानेच मराठीत कायमच विचार करण्याऱ्या प्रतिभावंत माणसाला तो हयात असताना दाबायचे ,त्याच्या आसपासच्या  मिडीओकर लोकांना प्रोत्साहन द्यायचे मग तो मेल्यानंतर त्याच्या नावाने गळा काढून त्याला डोक्यावर घेवून नाचायचे आणि आमची मराठी संस्कृती कशी पुरोगामी आहे ते गळा फाडून सांगायचे अशी एक  मेल्यानंतर मानसन्मान देण्याची मर्तीकी परंपरा आहे .  ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत  ती मराठीने पार पाडली आणि ह्यातील प्रत्येक लेखक मेल्यानंतर मराठी लोकांनी त्यांला मराठी संस्कृतीत  सेटल करून घेतले . 

पुढे इंग्रज लोकांच्या राज्यात सृष्टीय युग पुन्हा आले.  त्यातून ज्योतिबा फुलेंनी समाजप्रधान  प्रबोधनवाद आणि वास्तववादाची पायाभरणी केली . मराठीत त्यानंतर  दुसरा व्यक्तिवाद जन्मला तो सौंदर्यवादाच्या रूपाने . केशवसुतांच्यात प्रथम त्याचे पडसाद उमटले पण त्याची पायाभरणी बालकवींनी केली . ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत जे केले तेच मराठी संस्कृतीने केशवसुत व बालकवींच्या बाबत केले.  हे लेखक मेल्यानंतर मराठी संस्कृतीत मराठी लोकांनी त्यांना सेटल करून घेतले .ह्या सेटलमेन्टचे सर्वात प्रतिमा वादी उथळ रूप  होते  सत्य कथेचा  रोमांटिक  प्रतीमावाद ! पुढे  हा दुसरा व्यक्तिवाद -सौंदर्यवाद चांगल्या अर्थाने कळसाला पोहचला तो पु शी रेगे , ग्रेस आणि ना धो महानोर ह्यांच्या कवितेत !

१९४० नंतर भारतात प्रतीसृष्टीयता स्थिरावली . मर्ढेकर आणि विंदा करंदीकर ह्यांनी तिसरा व्यक्तिवाद आणला तो आधुनिक व्यक्तिवादाच्या रूपाने . ह्या व्यक्तीवादाला छेद देणारा चौथा  व्यक्तिवाद जन्मला तो अस्तित्व वादाच्या रूपाने . मराठीत ह्या अस्तित्व वादी व्यक्तिवादाची अत्यंत सखोल पायाभरणी केली चार  लेखकांनी दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे , भाऊ पाध्ये  आणि विलास सारंग ह्यांनी ! ह्यातील दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे हे दोघेही देशी वादाच्या अंगाने  अस्तित्व वादी व्यक्तिवादाची वाट त्यागून गेले तर भाऊ पाध्ये वास्तव वादाला जाऊन मिळाले परिणामी  अस्तित्व वादी व्यक्तिवादाला एकमेव साठोत्तरी समर्थक उरला तो म्हणजे विलास सारंग . स्वतः च्या  ह्या एकटे पडण्याला विलास सारंग कधीच घाबरले नाहीत उलट यु टर्न घेण्याऱ्या नेमाडेशी व त्यांच्या देशीवादाशी ते तात्त्विक पातळी वर लढत राहिले.  विलास सारंगाना पुढे घेवून जाणारे सतीश तांबे , मेघनाद कुलकर्णी असे काही मराठी कथाकार झाले पण त्यांच्याकडे जितके लक्ष्य द्यायला हवे होते तितके मराठीने दिले नाही . त्यामुळे सारंगांच्या वाटेने जाऊन उपेक्षित राहण्यापेक्षा लवकरच प्रस्थापित करायला सोपी अशी देशीवादी किंवा दलित साहित्याची वाट पकडणे हे अनेक करीअरीस्ट लेखकांना आकर्षक वाटू लागले . शिवाय कल्पनाशक्तीला ताण द्यायला भाग पाडणारी प्रतिभा असणे हे थोडे अवघडच बांधकाम होते . परिणामी कल्पनाशक्ती आणि अस्तित्वाचे प्रश्न ह्यांची सांगड घालून अस्तित्वाचा पाठलाग करणारा हा लेखक पुढेही मराठीने कायमच परीघावर ठेवला . त्याला न्याय द्यायला शेवटी मंगेश काळेला खेळचा एक विशेषांक काढावा लागला . 



वास्तविक सारंगाचा अस्तित्ववादी व्यक्तिवाद हा फक्त कविता आणि कथेत दिसतो . त्यांच्या कादम्बरीत मात्र व्यक्तिवाद आणि समष्टीवाद ह्यांच्यातील द्वंद पकडणारा द्वन्दवाद दिसतो आणि त्यातून कादंबरी हा फॉर्म व्यक्तिवादी होऊच शकत नाही कि काय अशी शंका येवू लागते . मात्र तरीही जो प्रभाव  कोसलाचा पडला तो एन्कीच्या  राज्याचा पडला नाही ह्याचे काय कारण असावे. वस्तुस्थिती अशी आहे कि कोसला ही एक आधुनिक प्रतिगामी कादंबरी आहे आणि मराठी संस्कृती ही प्रतिगामी असल्याने आधुनिकतेची कोसलात उडवली गेलेली टवाळी मराठी माणसाला भावली. मृत्युंजय स्वामी  आणि कोसला ह्या तीनही कादंबऱयाना दाद देणारी मानसिकता एकच आहे.शिवाय मराठी वाचक कॉलेजनंतर काही वाचत नाही त्यामुळे मराठी बहुतांशी वाचकाचे वय कायमच २१ असते त्यामुळे कॉलेजवयात वाचलेल्या कॉलेजच्या भावविश्वाशी निगडीत कोसला दुनियादारी ह्या कादंबऱ्या (ज्याला सारंग  नोस्तालजीयाचा रोग म्हणतात )त्याला आयुष्यभर आवडत राहतात. ह्या वयाच्या पुढील विकास दर्शवणाऱ्याएन्कीच्या  राज्यासारख्या कादंबऱ्या त्याला भावत नाहीत त्यात  एन्कीच्या  राज्यात परदेश आहे जन्मता देशी बनलेल्या मराठी वाचकांना हे विश्व काय भावणार ? ह्या कारणानं सारंग कायम परदेशी लेखक राहिले. 
         खुद्द सारंगाना हे जाणवले असावे आणि त्यातूनच भारतीय वास्तवाकडे ते परतले . हि पीछेहाट होती . दलित विचारवंतांनी आधीच मांडलेले मॉडेल त्यांनी आधिक चकाचक भाषेत मांडून आपण काहीतरी नवे मांडतोय असा आव आणला . पण अनुष्टुभमधल्या त्यांच्या ह्या लेखांनी दलित साहित्य शास्त्राने पुढे आणलेला साहित्यातील जातीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला  मात्र त्याचे स्वरूप देशीवादी न्हवते तर अस्तित्व प्रमाण मानून जगण्याऱ्या व्यक्तीला जातींचा होणारा त्रास असे होते . हा खरेतर जातिव्यवस्थेविरुद्धचा अस्तित्ववादी त्रागा होता आणि त्यानी तो नोंदवला ते बरेच झाले . 

सारंगांचे खरे योगदान काय  आहे ?  त्यांनी अस्तित्ववादी व्यक्तिवादाचा झेंडा फडकावत ठेवला . जेव्हा वास्तव वादाच्या नावाखाली कल्पनाशक्तीची कोंडी केली जात होती तेव्हा त्यांनी ही कोंडी फोडण्याची अथक कोशिश केली आणि कल्पनाशक्तीचे जागरण जिवंत ठेवले . ते एक हाडाचे प्रतिभावंत लेखक होते . सत्यकथा ही त्यांच्या पायातील बेडी होती कि त्यांनी प्रकाशनासाठी वापरलेला तो एक अस्तित्ववादी टेकू होता हे एक कोडे होते आणि ते आता सुटेल असे वाटत नाही .नेहमी प्रमाणे आता मेल्यानंतर विलास सारंगानाही मानसन्मान देण्याची आणि त्यांना मराठी संस्कृतीत सेटल करून घेण्याची मर्तीकी परंपरा मराठी संस्कृती पार पाडेलच . 

साठोत्तरी हि आमची बाप पिढी ! त्यांच्या अंगाखान्द्यावर आम्ही खेळलो आणि बाप फारच कर्मठ आहे हे लक्षात येताच त्यांचे साठोत्तरी साहित्याचे घर सोडून नवे चौथ्या नवतेचे घर आम्ही बांधले पण तरीही बाप कायमचा दूर गेल्यावर दु :ख होतेच. कोल्हटकर ग्रेस ,चित्रे ढसाळ आणि  आता विलास सारंग ! अस्तित्व संपल्यावर उठण्याऱ्या अस्तित्वाच्या आठवणींचे काय करायचे ?

७ मला काय ठाऊक ? श्रीधर तिळवे

कवी आर्कुटच्या फुटपाथवर झोपी गेलेत
कायमचे कि तात्पुरते
नारायण सुर्वेना ठाऊक

शक्तीपुंज माझी प्रेयसी मला रिप्लेस करून
अमेरिकेला गेलीये
नवा प्रियकर शक्तिमान कि  superman
दिलीप चित्रेंना ठाऊक

चांगदेव मिनीएचर्समधील सिंहावर आरूढ होऊन
माझ्या कवितेत ज्ञानेश्वरांचा   इमेलआयडी शोधतोय
मिळाला कि नाही
अरुण कोल्हटकरांना ठाऊक

ईश्वर वन नाईट stand साठी
अभिताभ बच्चनच्या बंगल्याबाहेर उभाय
कुणी भेटली कि नाही
वसंत डहाकेंना ठाऊक

गोलपीठा आख्खी मुंबई mallमध्ये शिल्गावतोय
शिलगली कि बिलगली
नामदेव ढसाळांना ठाऊक

श्रीधर तिळवे
आरश्यातला आरश्यात वारला बेवारशी
त्याने मनोहर ओकची परमिशन घेतली होती कि नाही
मनोहर ओकलाच ठाऊक


श्रीधर तिळवे 

प्रसन्नजी , कोसला आवश्यकच होती तिने मराठी कादम्बरीला मौजेच्या आणि सत्यकथेच्या दालनातून बाहेर काढली त्यामुळे मी त्यानंतर देशीवाद निर्माण झाला नसता तर परंपरेचा पुरस्कार करणाऱ्या वास्तववादाची लाट १९८० नंतर निर्माण झाली नसती . देशिवादाने परंपरेला खोटी  प्रतिष्ठा
दिली . वास्तविक देशिवादाआधी तुकाराम मर्ढेकर करंदीकरही परंपरेवर हल्ला करत परंपरेचे भान राखत लिहीतच होते की ! पण परंपरा म्हणजे लय भारी असे वाटायला लागले ते नेमाडेन्च्यामुळे !आणि दलित साहित्य म्हणजे परंपरेच्या विरोधातला सर्वात मोठा उठाव ! भक्तीची पिपाणी वाजवण्याऱ्याना बुद्ध धम्म स्वीकारून जरा ज्ञानाचे तबलाबोल पण ऐका की म्हणणारा , वर्णजाती विरुद्ध निर्भीड पणे उभा ठाकणारा , सकाळ संध्याकाळ विठ्ठ लाचे नाव घेण्याऱ्याना riddles  ऑफ रामकृष्ण लिहून देवांचीच उलट सुलट तपासणी करायला भाग पाडणारा असा हा उठाव होता त्यामुळे भक्तीत झोपलेली  मराठी संस्कृती जागी व्हायला लागली होती तोवर नेमाडेंनी ही परंपरेची अफू आणली . तिचा प्रसार असा काही झाला की साठोत्तरी नंतरचे साहित्य भक्ती आणि आस्था चानेल बनते कि काय अशी शंका निर्माण झाली . नेमाडेंचा महिमा असा कि दिलीप चित्रे सारखा लेखक जो फक्त देशी होता पुढे देशीवादी झाला . ह्या'' परंपरा परंपरा नेमाड पंथी नायक परंपरा ''वातावरणात दलित उठाव विरून गेला आणि नव्या दलित नायकाची वाट अडवली गेली . 
प्रसन्नजी
कोसलाच्या लेखनकाळावेळी बाबासाहेबांच्या निधनानंतर दलित समाजात एक पोकळी निर्माण झाली होती त्यामुळे ताबडतोब कोसलासारखे सत्यकथेला आव्हान देणारे ताबडतोब काही निर्माण झाले असते असे मला वाटत नाही त्याउलट नेमाडेंचा समाज यशवंतराव चव्हाण ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठीत प्रबळ झाला होता एकीकडे पोकळी निर्माण झाली होती तर दुसरीकडे सत्ता प्रस्थापित झाली होती बाबासाहेबानंतर दलितांना दुसरा महानायक imagine करणे कल्पनेतही शक्य न्हवते ह्याउलट यशवंतरावात सर्वांना दुसरे  शिवाजी
महाराज दिसायला लागले होते त्यावेळी कुणालाही  वाटले नसेल कि पांडुरंग सांगवीकर जसा पुणे सोडून सांगवीत येतो तसे यशवंतराव दिल्ली सोडून महाराष्ट्रात येवून बसणार आहेत . सांगवीकरला मेस हाताळता आली नाही आणि यशवंत रावांना दिल्ली ! १९६५ नंतर दलित समाजाला हळू हळू बाबासाहेबांची पोकळी ओलांडून जाणे जमू लागले  नवीन 

Thursday, December 10, 2015

 

चौथी नवता आणि मराठी भाषा /श्रीधर तिळवे- नाईक 

प्रथम प्रश्न  मराठी भाषा म्हणजे काय ?

महाराष्ट्री ह्या प्राकृत भाषेपासून तयार झालेली आणि सातवाहनांच्या काळापासून लिखित सातत्य राखलेली भाषा  जी  सातवाहनाच्या  आधी किमान तीन हजार वर्षे मराठी बोलली जात होती .

आता दुसरा प्रश्न चौथी नवता म्हणजे काय 

चौथी नवता म्हणजे १९९० नंतर अवतरलेल्या आणि अस्तित्वात असलेल्या  चिन्हमानव , विविध जाले ,महाजाले,  नेटवर्क्स , चिन्ह्वस्तु , बाजार , पणनता , प्रतिसृष्टी , जगे , असता , निसर्ग , कृषी , शेती , निसर्गवस्तू , संस्कृत्या , सभ्यता , राष्ट्रे , क्रयवस्तू , शास्त्रज्ञ तंत्रवैज्ञानिक  वैज्ञानिकांनी लावलेले  शोध , तंत्रशोध मानवनिर्मित  वस्तू , मानवनिर्मित पवित्र वस्तू , उत्पादनयंत्रणा  उत्पादनतंत्रणा , तंत्रनेटवर्क्स , आणि त्यांचे चिन्हजैविक , तांत्रिक , शास्त्रीय , वैज्ञानिक , तर्कशास्त्रीक , कलिक , दार्शनिक , विचारप्रणालीय , आस्थापानीय , व्यवस्थापनीय चिन्हजैविक  क्रिया -नाती -जोडण्या -संबंध -सांधण्या -चौकश्या -तपासण्या -सलग्नता ह्यांचा परस्परांशी  -मिडिया , मिडिया , चिन्हसृष्टी-आधारित , प्रतिसृष्टी -आधारित सृष्टी -आधारित तर्क -आधारित कायद्याशी आणि उत्पादनचीन्ह्ना , अध्यात्म , अध्यात्ममानव , निसर्गमानव , आन्वीक्षिकी , तर्कशास्त्र , गणित , भूमिती ,धर्म , विचारप्रणाली , व्यवस्थापन , आस्थापने , प्रेषित , बुद्ध , बोधिसत्व कला  ,  ह्या सर्वांच्या अभिव्यक्तीशी आणि आशयाशी असलेल्या संबंधांचे चिन्हजैविक महानेटाम्ब्लाज .

ह्या दोघांचे संबंध तपासणे हा ह्या लेखाचा उद्देश आहे

मराठी हालाच्या सतसई (गाथासप्तशती  काळ इसपुर्व २०० ते इसोत्तर १०० )पासून सतत उत्क्रांत होते आहे आणि त्याचे सर्वात महत्वाचे कारण ती नेहमीच स्वतःला अपडेट करत आलेली आहे प्रत्येक  नवी नवता अपनवत आलेली आहे मराठीने आत्तापर्यंत किमान वीस नवता पचवल्या आहेत आणि हि चीन्ह्सृष्टीय चौथी नवताही ती आत्मसात करून पुन्हा ताजीतवानी होईल ह्याची मला खात्री आहे ह्या एकवीस नवतापैकी शेवटच्या चार विसाव्या शतकातील आहेत त्यातील पहिली  आधुनिक केशवसूती दुसरी आधुनिकतावादी मर्ढेकरी तिसरी देशी नेमाडी ढसाळी आणि चौथी फेब्रु ९२ च्या सौष्ठव च्या अंकात घोषित झालेली म्हणून चौथी नवता ! वर उल्लेख केलेले महानेटाम्ब्लाज सादर करणे हे तिचे उद्दिष्ट आहे आणि ह्यामुळे पुन्हा एकदा मराठी कला अपडेट होईल अशी तिला खात्री आहे

ह्या चवथ्या नवतेतील भाषेचे असे काय बदलले कि तिला नवता म्हणण्याची वेळ आली 
ह्यापूर्वी भाषेची चार युगे झाली निसर्गीय युग विश्वीय युग सृष्टीय  युग प्रतीसृष्टीय  युग ह्या प्रत्येक युगात भाषेने एक अवतार धारण केला निसर्गीय युगात मौखिक विश्वीय युगात लिखित सृष्टीय युगात छापील प्रतीसृष्टीय युगात मुद्रित म्हणजे ध्वनीदृश्यमुद्रित भाषा होती  

१९९० नंतर तिने पुन्हा नवा अवतार धारण केला चिन्हसृष्टीय युगात ती स्पन्दीय           झालीये स्पन्दाचे पहिले रूप बाईट आहे ह्या युगात भाषेला सर्वाधिक वेग प्राप्त झाला आणि तिने फक्त स्वतःचा वेग वाढवला नाही तर माणसाच्या जीवनाचा वेगही वाढवला इतकेच न्हवे तर भाषा प्रचंड लवचिक झाली आणि कलरफुल झाली किंबहुना black and white सिनेमाचा रंगीत सिनेमा व्हावा तसाच काहीसा प्रकार वर्तमानपत्रातील छापील भाषेचा झाला ती अचानक स्पन्दीय होऊन कलरफुल झाली ती इंटरनेटद्वारा रोजच्या व्यवहारात आली ह्या स्पन्दीय भाषेमुळे ह्या युगात चिन्हे केंद्रस्थानी आली आणि बघता बघता टीव्ही , संगणक , laptop , मोबाईल , tablets ह्या  चीन्ह्वस्तुनी भारली गेलेली नवी चिन्ह संस्कृती निर्माण झाली ह्या चिन्ह  संस्कृतीला साजरी करणारी स्थिती म्हणजे चौथी नवताडीजीटल  हे तिचे पहिले व्यक्त आहे उद्या आणखी काही ब्रेकथ्रू मिळू शकतात             चौथी  नवता ही तीन अवस्थेतून गेलीये 
 प्रिडिजिटल १९८० ते १९९० 
 डिजिटल १९९१ ते २००० 
 पोस्टडिजिटल २००१  ते आज 
तिन्हे पुन्हा  एकदा नवे जागतिकीकरण घडवून आणले  . जागतिकीकरण ही चिन्हसृष्टीकरणाची अभिव्यक्ती आहे जशी कि साम्राज्यवाद ही ओंद्योगीकीकरणाची होती दुर्देवाने आपण सर्वच अभिव्यक्तीवर चर्चा करतोय आशयावर नाही . चीन्हसृष्टीकरण हा आशय आहे त्यावर आधिक चर्चा व्हायला हवी स्पन्दियतेने भाषेचा वेग असाधारण केलाय तो वाढतच जाणार मात्र अजूनही जागा आहेच टीव्ही , संगणक , laptop , मोबाईल , tablets ह्या  चीन्ह्वस्तुनी सध्या धुमाकूळ घातलाय त्या हळूहळू जीवनावश्यक वस्तू बनत चाललेत त्यांच्यामुळे मी माझ्या एका कवितेत म्हंटल्याप्रमाणे                                                        भाषा प्रचंड झालीये 
                                                       आणि तिच्याकडे सांगण्यासारखं 
                                                       काहीही उरलेलं नाहीये 
असं कधीकधी वाटत अर्थात ते टिकत नाही कारण ही स्पन्दीय भाषा कधी झोपत नाही तिला जागवायला 
चिन्ह्वस्तु ऑन आहेत त्यामुळे माहितीची सैतानी  गरज निर्माण झालीये  माहितीचे कारखाने सुरु झालेत ते  चोवीस तास ऑन ठेवणे गरजेचं झालय आणि माहितीचा आणि अनुभवांचा वेग इतका वाढलाय कि 
                                           मला आत्ताच काय झालय ते आठवत नाही 
                                           आणि तुम्ही काल काय झालं म्हणून काय विचारताय 
अश्या विचारणा करणाऱ्या माहितीच्या माहितीचीन्ता निर्माण झालेत 
ह्या नवतेत  भाषांचे दोन प्रकार झालेत 
१चिन्हिकरणीय :ज्यांचे चिन्हिकरण झाले आहेत अश्या 
 अचिन्हिकरणीय : ज्यांचे चिन्हिकरण झालेले  नाही  अश्या 
ह्यातून एलिट आणि डिलीट असा संघर्ष निर्माण झाला आहे 
चौथी नवता हा संघर्षही मांडते आहे 

निओन चोमस्की ह्या अमेरिकन भाषाशास्त्रज्ञाने  युनिव्हर्सल ग्रामर मांडले होते ते आता वेगळ्याच रूपाने साकार होते आहे ज्याची खुद्द त्यानेही कल्पना केली न्हवती . ओल्विन टोफलरच्या भाषेत सांगायचे तर हा चौथा वेव आहे आणि मराठी संस्कृती त्याने आता भारावली जात आहे . जगात वेळोवेळी लागलेले चिन्ह्शोध आत्मसात करत मराठीची चीन्ह्सन्स्कृती घौडदौड करते आहे . टीव्ही , मोबाईल , कॉम्पुटर , laptop , tablets , mp ह्यांना वापरात आणत ती वेगवेगळे भाषिक प्रयोग करते आहे हे करताना सर्व भाषेतून नवीन शब्द बिनधास्त घ्यायचे सोवळेपणा पाळायचा नाही असा तिचा अजेंडा आहे हे ती सहा प्रकारे करत आहे तिने  केले आहे .

 हे  तिने कसे  केले

 प्रतन करून म्हणजे कॉपी करून जसा मी इथे कॉपी हा शब्द जसाच्या तसा घेतला टीव्ही , मोबाईल , कॉम्पुटर , laptop , tablets , mp३ही आणखी काही उदाहरणे
 अनुप्रतन करून म्हणजे थोडा बदल  करून उदाहरणार्थ अपनवणे खुद्द हिंदीत हा शब्द नाही पण आपण तो अपनवला आता ह्यातून कशी टिन्ज निर्माण होते ते पहा आत्मसात करणे म्हणजे मास्टर करणे पण अपनवने  म्हणजे स्वीकार करणे मात्र प्रेमाने  म्हणजे हे आत्मसात करणे आणि स्वीकार करणे ह्यांच्या दरम्यानचे प्रेमजन्य आहे जे मराठीत न्हवते ते ह्या शब्दाने आले हे अनुप्रतन
 स्थानप्रतन म्हणजे मराठी पुरता स्थानिक लोकांनी स्वतःपुरता केलेला नवीन शब्द उदाहरणार्थ झेरॉक्स मारणे आता मूळ शब्द photocopy पण झेरॉक्स कंपनीने photocopy पसरवली आणि कोल्हापुरात प्रथम झेरॉक्स मारणे हा शब्द आला आणि तो पसरला . कोल्हापुरात मारण्याचा शौक जास्त त्यामुळे कोल्हापुरी लोक काहीही मारतात त्यामुळे त्यांनी झेरॉक्स काढण्याऐवजी मारली
 विप्रतन म्हणजे मूळ शब्दाचा विपरीत वा उलट अर्थ होणे म्हणजे एकेकाळी आयटम ह्या शब्दाचा अर्थ बाजारू चीप स्वस्त असा होता आणि मुलींना आयटम म्हंटल कि राग यायचा पण ह्या सहा  वर्षात ह्या शब्दाचा अर्थ सेक्सी आणि आकर्षक असा झाला आणि  भल्या भल्या हिरॉइन आयटम सॉंग करायला लागल्या अगदी सोनाक्षी सिन्हाही खामोशला  जुमानता आयटम करती झाली
 अनुसृजन म्हणजे नवीन शब्द तयार करणे १९९२ साली मी चिन्हसृष्टी असा एक शब्द कॉईन केला तो पसरला प्रभाकर पाध्येनी आपणाला नेत्रदिपक दिला म्हणजे हा शब्द दिला तो ताबडतोब रूढ झाला ह्यात अनेकदा दोन शब्द जोडून नवा शब्द तयार केला जातो परवाच मी मोरोपंत वाचत होतो तर दारूच्या व्यसनाला त्यांनी दिलेला पानव्यसन असा मस्त शब्द दिसला .
 सृजन करणे म्हणजे नवा शब्द तयार करणे हे फार अपवादाने घडते ज्यावेळी भाषा अनुसृजन करण्यात कमी पडते तेव्हा असा शब्द तयार करावा लागतो वा होतो म्हणजे नेटवर्क अचानक स्लो होण्याला माझा शब्द उस्फुर्त आला ''कुंबळल '' म्हणजे मी रागाने,'' कुंबळल  सालं !'' म्हणालो आणि माझ्या एडीने तो पिक केला . तो माझ्या gang मध्ये रुजायला लागलाय ह्या शब्दाला अनिल कुंबळे जबाबदार असावा बहुदा !

आता पारंपारिक लोक ह्याला नाकं मुरडणार आणि नवी पिढी हे बदल ताबडवणार हे उघडच आहे . दृष्टीकोन एकच आहे '' पूर्वी फार्शी खाल्ली आता इंग्लिश खाऊ एखादी  गोष्ट बूटेबल कशी बनवायची ते आम्हाला चांगलं कळत  ''

ह्याचा अर्थ आम्ही सिरिअस नाही असा नाही . वर दिलेली चौथ्या नवतेची  व्याख्या किती जड आहे ना ?

मी ती इंग्लिश मध्ये एका अध्यात्मिक चर्चेत सहज दोन मिनटात दिली होती पण आत्ता मराठी भाषेत तिचा अनुवाद करताना मला तब्बल अर्धा तास लागला आहे कारण मराठीत अचूक शब्द शोधणे हे एक जिकरीचे काम आहे . पण हे आम्हाला करावे लागणार ह्याची आम्हाला जाणीव आहे

अश्या कठीण भाषेची टवाळी होणार  आणि मराठीत वैज्ञानिक तयार होत नाहीत म्हणून बोंब पण  मारली  जाणार हे उघड आहे कारण नवीन गोष्टीची टर उडवणे  हा मराठी लोकांचा  काहीसा आवडता सांस्कृतिक उपद्वाप आहे आणि आपण तो कायमच करत असतो . क्वान्टम फिजिक्स शिकताना अवजड इंग्रजीत शिकणारे मराठीत आले कि मराठी किती कठीण म्हणून बेंबटायला लागतात.हे असे का होते कारण इंग्लिशमध्ये कठीण भाषा शब्दकोश लावून शिकणारे लोक मराठीत आले कि साहित्यिक होतात  त्यांना असे वाटते कि माझी मायबोली आहे मला लगेच कळायला हवी आत्ता जो नियम इंग्लिशला लागू आहे तोच मराठीला लागू आहे इंग्लिश मध्येही अशा भाषेची टवाळी होतेच पण म्हणून कोणी दुसऱ्या माध्यमाकडे  जात नाही  ह्या सर्वाना आता हे सांगायची वेळ आली आहे की साहित्य भाषेचा दुय्यम रोल आहे . मूळ रोल विज्ञान , तंत्रज्ञान आणि चिन्हतन्त्र्ज्ञान आहे आणि तो पार पडायचा असेल तर कठीण भाषा झेलायची तयारी ठेवा अन्यथा इंग्लिशधार्जीनेपणा चालू  ठेवा  आणि तो ठेवला कि तुमची भाषा फार काळ टिकणे शक्य नाही कला ही समाजाची साय आहे दूध न्हवे . भाषे विषयी बोलताना ही मुलभूत गोष्टच आपण लक्ष्यात घ्यायला हवी भाषा जगायला उपयोगी पडत असेल तर टिकते अन्यथा नाहीशी होते त्यामुळे छोट्या छोट्या भाषा नाहीश्या होणे अटळ त्यांच्या विषयीचा सांस्कृतिक जिव्हाळा तुम्हाला टाळ्या मिळवून देईल भाकरी नाही त्यामुळे काय टिकवायचे ह्या बाबत ''प्रमाण मराठी भाषा टिकवायची  '' हेच चौथ्या नवतेचे उत्तर आहे बाकी सगळ्या दोन तीन शतकाच्या गमज्या आहेत मी अनेकदा म्हटलय कि जोवर आइनस्टाईन अहिराणी किंवा मालवणी भाषेत शिकवण्याच्या शक्यता निर्माण होत नाहीत तोवर ह्या भाषा टीकायच्या  नाहीत अन्यथा एकीकडे आपली पोर इंग्लिश माध्यमात टाकायची आणि दुसरीकडे लोकांना मराठी टिकवा  अहिराणी टिकवा म्हणून सांगायचे ह्याला काही अर्थ नाही . भाषेबाबत एक पोचलेला ढोंगीपणा आपणा सर्वांच्या ठायी निर्माण झाला आहे तो जोवर नाहीसा होत नाही तोवर पोचेपणा जाणार  नाही . तर भाषा टिकवायची आणि विज्ञान , तंत्रज्ञान आणि चिन्हतन्त्र्ज्ञान ह्यासाठी टिकवायची हे पक्के आहे

सध्या मराठी तरुण भावनिक मुद्द्यावर डोकी फोडतोय स्वतःची किंवा इतरांची असा प्रवाद आहे चौथ्या नवतेचे म्हणणे असे आहे की विधायक काम महत्वाचे त्यासाठी भाषेचा खरा इतिहास तपासणे महत्वाचे पूर्वी जी नेटवर्क्स संशोधनाला उपलब्ध न्हवती ती आता आहेत सगळा डाटा गोळा करून त्याचे संगणकीय विश्लेषण करणे सहज शक्य झाले आहे उदाहरणार्थ हे आता स्पष्ट होते आहे कि इसापूर्व ते इसोत्तर ६०० पर्यंत नाणेघाट शिलालेख वगळता संस्कृत कुठेच नाहीगोळा केलेला data असं सांगतो कि  हजारो नाण्यावर फक्त प्राकृत आहे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे संस्कृत ही प्राचीन भाषाच न्हवती आता ह्यामुळे मराठी भाषा हीं संस्कृतपासून तयार झाली हा भाषेविषयीचा सनातन सिद्धांत कोसळून पडणे अटळ आणि हे सर्व चौथ्या नवतेची मशिनरी वापरल्याने शक्य झाले आहे  पण ह्यामुळे हेही स्पष्ट होते कि प्राकृत भाषा भारतभर प्रचलित होत्या आणि त्यांची नाणीही ! मराठी प्राकृतही पांच हजार वर्षे प्रचलित होती ह्या नाण्यावरून हेही स्पष्ट होते कि भगवान शिव हाच भारताचा आद्य देव होता आणि आहे कारण परकीय  पर्शियन राजवटीच्या नाण्यावरसुद्धा तो आहे आणि सिंधू संस्कृतीच्या सिल्सवरही ! 
चौथ्या नवतेच्या भाषिक व चिन्हिक डाटाने मोडीत काढलेला आणखी एक सिद्धांत म्हणजे आर्यांच्या तथाकथित आक्रमणाची थेरी! संपूर्ण भारतीयांचे जनेटिक कोड नमुने घेवून उलगडल्यावर हे स्पष्ट झालय कि साडेतीन हजार वर्षात भारतात कोणीही बाहेरून आलेले नाही त्यामुळे मूळनिवासी विरुद्ध बाहेरील आर्य ह्या सिद्धांताला काहीही अर्थ उरत नाही ह्याचा अर्थ ब्राह्मण बाहेरून आले वगैरे सर्व बकवास आहे ह्याचा अर्थ हाही होतो कि भारतीय मुसलमान हा प्रथम भारतीय होता मग मुसलमान झाला म्हणजेच ह्या देशावर इथल्या मुसलमानांचा हिंदूंच्याइतकाच हक्क आहे . जातीभेद भंपक आहे कारण अस्पृश्य आणि मराठा ह्यांच्या जनेटिक कोडमध्ये फरक नाही जो आहे तो व्यक्तिगत आहे त्यामुळे ह्या देशातल्या ह्या समृद्ध हिंदू अडगळी आपण इतिहासजमा कराव्यात हे उत्तम !

तर चौथ्या नवतेच्या  इतिहास जाणू  इच्छीणाऱ्या  लोकांना त्यामुळेच इतिहासात डोकावून नवीन मशिनरी वापरून नवे शोधायला भरपूर वाव आहे
डोकी फोडण्यापेक्षा डोकी संशोधनासाठी पणास लावणे केव्हाही बरे

कुठल्याही भाषेचा फक्त वर्तमान आणि इतिहास महत्वाचा नसतो  भाषेचे भविष्यही महत्वाचे असते सध्या मराठी संस्कृतीत मराठी भाषेविषयी ती भविष्यात टिकणार का अशी वारंवार काळजी व्यक्त केली जातीये हा प्रश्न इतका निकरावर आलाय कि भालचंद्र नेमाडेंनी इंग्रजी  माध्यमाच्या शाळा बंद करा असे सांगितले . ह्या बाबतीत मराठी संस्कृती दुभंगलेली दिसते . आपल्याला एकीकडे मराठी भाषा टिकवायची पण आहे आणि आपल्या पोरांना इंग्लिश माध्यमातही शिकवायचे आहे ह्या दोन्ही टोकांना सांधायचे कसे कारण इतिहास सांगतो कि एखादी संस्कृती स्वतःच्या भाषेत शिकायची बंद झाली कि आपोआप नाहीशी होते उदाहरणार्थ गोव्यात पोर्तुगीज माध्यमाच्या शाळा बंद पडल्यावर गोव्यातून पोर्तुगीज नाहीशी झाली संस्कृतची विदयापीठे
होती म्हणून संस्कृत जनसामान्याची भाषा नसूनही टिकली आत्ताही तिची departments आहेत म्हणून कशीबशी जिवंत आहे ह्या पार्श्वभूमीवर मराठीचे काय ?हा एक असा प्रश्न आहे कि ज्याला विचारवंतानी कायम बगल दिलेली आहे नेमाडेंनी प्रथमच एक ठाम विधान केले आहे पण ते अंमलात आणायला लागणारी इच्छाशक्ती आपल्या राजकीय संस्कृतीत आहे काय ? मराठीला राज्यभाषेचा दर्जा मराठी राज्यकर्त्यांनी कधीही दिला नाही त्यासाठी इंग्रज यावे लागले इंग्रजांनी फारशी हट्वून मराठी राज्यभाषा केली इतके आपले राज्यकर्ते पहिल्यापासून पोंचे आहेत जेव्हा राजा निर्णय घेत नाही तेव्हा प्रजा निर्णय घेते आणि प्रजा गोंधळलीये एकीकडे तिला वाटतय कि मराठी माध्यमात मुलांना टाकले तर इंग्रजीविना त्यांची करिअर्स होणार नाहीत आणि इंग्रजीत टाकली तर मराठीत ती किंवा त्यांची मुलबाळ बोलणार नाहीत अशावेळी करायचे काय ? शिवाय भाषेविषयी सर्वाधिक अभिमान ज्या साहित्यिकांनी बाळगायला हवा त्यांनी आपली मुलं इंग्रजीत टाकलेली त्यामुळे अशा पोच्या आणि दुटप्पी साहित्यिकांचा  काय सल्ला घ्यायचा ? मग करायचे तरी काय ? त्यामुळे मराठीचा कट्टर अभिमान बाळगणारे लोक वगळता सगळेजण ट्रेंड फॉलो करतायत. ब्राह्मणांनी संस्कृत दिली नाही मराठी ज्ञानभाषा झाली नाही आणि इंग्लिश  ज्ञानभाषा म्हणून निवडण्याचा पर्याय धडाधड पुढे येतोय वेगवेगळ्या पॅकेजसह ! त्यामुळे 

चल चल  मुरारी हिरो बनने
इंग्लिश स्कुलमे मराठी पढने  ध्रुपद   

चल चल चल तू भर ले बैग 
टिफिनके साथ कर कल्चर पैक 
इंग्लिशमे सीखके काम करेगा 
पापा कहते हैं नाम करेगा 

बचपनमें तेरे बाल हैं झड़ने 
इंग्लिश स्कुलमे मराठी पढने 
चल चल  मुरारी हिरो बनने॥   

क्या हुआ गर भुला तू माँ 
माँभी खुश जब कहेगा ममा 
बाप कोभी बोल हैलो डैड 
वहभी होगा वर्ना सैड 
चल चल चल तू जीते जी मरने 
इंग्लिश स्कुलमे मराठी पढने
चल चल मुरारी हिरो बनने।।    

काहेकि हिंदी काहेकि मराठी
इंग्लिशके हाथमे सबकी लाठी 
इंग्लिशमे लिखा गया संविधान 
भारतीय भाषाओंका तभी गया प्राण 

अभी नहीं समझेगा लग जा बढ़ने 
चल चल मुरारी हिरो बनने
इंग्लिश स्कुलमे मराठी पढने।।॥    

मराठीके बिना सबकुछ चलेगा 
मराठी मानुसभी इंग्लिश  बोलेगा
 टूटीफुटी इंग्लिश चलेगी  चलना 
सबकुछ बोलना मराठी  बोलना 
 मराठी  बोलना मराठी  बोलना 
मराठी  बोलना मराठी  बोलना 

तूभी सीखेगा इंग्लिशमे लड़ने  
इंग्लिश स्कूलमे मराठी पढ़ने 
चल चल  मुरारी हिरो बनने॥    

असं म्हणत आपल्या पोरांना इंग्लिश माध्यमात टाकतोय 
 ( गाणं माझ्या  अर्थ  ह्या  अप्रकाशित  कादंबरीतील आहे गाणं  मुद्दामच हिंदीत आहे  कारण  निवेदकालाही  मराठीत  बोलायचं  नाही )

अश्या ह्या पार्श्वभूमीवर करायचे काय ? वैज्ञानिक पुरावे पुरेसे ठोस नाहीत अश्यावेळी एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे आत्ता आहे त्या स्थितीत इंग्लिश माध्यमात काही बदल घडवणे 

इंग्लिश मराठी संस्कृती खायाला पाहतीये ना मग आपण तिला इंग्लिशमधून मराठी संस्कृती खायाला घालायची मराठी भाषिक कपडे जाणार असतील तर कपडे जाऊ द्यायचे आणि इंग्लिश भाषी कपड्यांना मराठी सांस्कृतिक शरीर घालण्यास भाग पाडायचे म्हणजे नेमाडे कसे इंग्लिश कपडे घालून देशीवाद सांगतात तसेच करायचे म्हणजे काय तर

 बारावीपर्यंत फक्त मराठी साहित्य साहित्य म्हणून शिकवायचं . मराठी माणसाचा इतिहास शिकवायचा  मराठी भूगोल शिकवायचा उगाच हिंदी किंवा इंग्लिश साहित्य नाही . इंग्लिश शाळेतही अनुवाद  केलेले फक्त मराठी साहित्य शिकवायचं शेक्सपिअर गेला गाच्या गात राष्ट्रीय साहित्य राष्ट्रीय इतिहास भूगोल बारावीनंतर मग माध्यम कुठलही निवडा हिंदी निवडलात तरी ज्ञानेश्वर तुकाराम नेमाडे चित्रे ढसाळच वाचावे लागतील . त्यामुळे आपल्या साहित्याचे अनुवादक मिळतील . बारावीला अर्थशास्त्र समाजशास्त्र वगैर ला मराठी अर्थशास्त्रज्ञ , समाजशास्त्रज्ञ वगैरे अभ्यासक्रमाला लावायचे  . पोरांना आंबेडकर इरावती कर्वे ह्याचं काम माहित नसण हे लाजिरवाणे आहे . चिन्हतंत्रज्ञान ,  विज्ञान आणि तंत्रज्ञान मात्र जगभरचे शिकवावं फिजिक्स शिकवताना भारतीय फिजिक्सचा इतिहास शिकवावा तसच रसायनशास्त्राच करावं 

इतके  बेसिक बदल तरी घडवू शकतो आपण ! आत्ता हेही जमणार नसेल तर आपण सर्वांनी भाषिक आत्महत्या कराव्या . 


श्रीधर नलिनी शांताराम तिळवे नाईक