आउटडेटेड नेमाडे आणि प्रतीसृष्टीय कादंबरीचा
मृत्यू
श्रीधर तिळवे
1
कलाकृतीचे वर्गीकरण
हे समीक्षेतील एक आवश्यक पाप आहे . सर्व साधारण पणे आकारानुसार (sizeनुसार ) कलाकृतींचे चार प्रकार होतात.
१ महाकृती
२ बृहदकृती
३ दीर्घकृती
४ लघुकृती
विश्वीय कालखंडात महाकाव्य, बृहद्काव्य, दीर्घकाव्य, लघुकाव्य असे
चार प्रकार उदयास आले .महाकाव्य हा महाकृतीचा विश्वीय आकार होता
रामायण आणि महाभारत ही जगातील दोन श्रेष्ठ महाकाव्ये इंडियiने दिली
सृष्टीयतेत scientific revolution नंतर गद्याचा व वास्तव आकलनाचा प्रभाव वाढत गेला. गटेनबर्गने चायनीज तंत्र अधिक विकसित करून छापील
संस्कृती आणली आणि महाकृतीत पद्याचा वापर करण्याची गरज संपली त्यातून आधुनिक
कादंबरी स्थिरावली सौंदर्य वाद आणि वास्तववाद ही तिची साहित्यिक ideology होती
ह्या आधुनिक कादंबरी विरुद्ध उभी टाकली ती
प्रतिसृष्टीय आधुनिकतावादी कादंबरी !
नवकादंबरी आणि प्रतिकादम्बरी हे त्यांचे स्वरूप होते . रणांगण ह्या विश्रiम बेडेकर ह्यांच्या कादम्बरीने नवकादंबरीची सुरवात केली असली
तरी ती परिपूर्ण नवकादंबरी नव्हती . नेमाडे ह्यांचे योगदान इथून सुरु होते . ''कोसला'' ही मराठीतील पहिली परिपूर्ण
नवकादंबरी आहे परिपूर्ण नवकादंबरी ही आधुनिक विरुद्ध उभी ठाकते. कोसला
ही
१ पुणे हे आधुनिक शहर
२ इतिहास हा ideology चा कणा
३ आधुनिक शिक्षण
४ आधुनिकतील ठोंबेपणा
५ पोलिस ही आधुनिक राज्याची
सत्ता दर्शवणारी संस्था
६ पैसे व पैसेवाला शेतकरी बाप
ह्या सर्वाविरुद्ध उभी ठाकते . scientific
rationalism ने बधीर
केलेली भावनिक संवेदनशीलता नाकारून अत्यंत उत्कट संवेदन शीलता अपनवते . पांडुरंग
बहीणीच्या मृत्यूने पिसाटून जातो कारण घरच्या लोकांची बधीरता त्याला सहन होत नाही
. हा romanticism नाही ही sensibility आहे .
पण
हा पण महत्वाचा आहे . pandurang त्या प्रश्नांचा सामना करत नाही
तो चक्क पळून गावात येतो . कृषीय आधुनिक स्वीकारतो खुंट्या वर बसतो पांडुरंग
औध्यो गिक होत
नाही . प्रतिसृष्टिय औध्योगिकतेला नाकारत तो परंपरेत दाखल होतो . घरी रग्गड पैसा असल्याने हा
देशीवाद त्याला परवडतो किंबुहना परंपरा वैगरे टिकवणे ह्या चैनी गरीबाला कुठे
परवडायच्या ?
ह्याचा जो परिणाम होण्याची
शक्यता होती तीच झाली . नेमाडे कायमचे मागे परतले . ज्या आधुनिक शिक्षण संस्थेविरुद्ध ते कोसलात
उभे ठाकले तिथेच शिकवू लागले. मात्र इथेही नेमाडे अस्सलच राहिले . ते जिथे होते ती एक आधुनिक संस्था
होती तिचे ते चाकर होते ते प्रामाणिकपणे शिकवू लागले नेमाडे ह्यांचा हा अस्सल
प्रामाणिकपणा हा त्यांच्या केवळ व्यक्तिमत्वाचाच नव्हे तर त्यांच्या साहित्याचाच
विशेष आहे. त्यांनी ओळखले कि आपण कोसलात घेतलेली उडी इथे
कामाची नाही ज्या सृष्टीय वास्तववादाविरुद्ध त्यानी स्वःता बंड केले त्या
वास्तववादाला ते जाऊन मिळाले. हे पलायन नव्हते हे भारतीय वास्तवाचे नागडे आकलन
होते . मुख्य सेनापतीनेच मशीनगन टाकून तलवार उचलल्यावर जी अवस्था होते तीच मराठी
साहित्यीकाची झाली . जो तो तलवारीने वास्तव लिहू लागला ह्याचा एक फायदा असा
झाला की मराठी साहित्यातील भुरटा वास्तववाद ,शब्दबंबाळ प्रतीमावाद आणि फोफ्सा सौंदर्य वाद जाऊन त्या जागी अस्सल
वास्तव आले . ह्या परिवर्तनात दलित साहित्याचा
वाटा अधिक असला तरी बिढार जरीला झूल ह्या तिन्ही
कादंबऱ्याचा ह्यात मोलाचा हातभार होता .
पण ह्याचा एक दुष्परिणाम असा
झाला की साहित्यात ideology महत्वाची ठरू लागली . कोण कुठल्या ideology
चा समर्थक आहे ते महत्वाचे झाले आणि लेखनाची गुणवत्ता पाहणे दुय्यम
महत्वाचे झाले ह्याचा एक दुष्परीणाम असा झाला कि मराठीत वास्तववादाचे दळण सुरु
झाले ह्या दळणाने प्रतीसृष्टीयकादम्बरीचा प्राण काढून घेतला आणि मराठी साहित्यात प्रतीसृष्टीय कादम्बरी मृत्यू पावली .
2
नेमाडे ह्यांनी
वास्तववादी कादम्बऱ्या लिहल्या खऱ्या पण त्या लिह्ण्यामागील साहित्यबाह्य कारण तेही वास्तववादाच्या
पलीकडील देणे त्यांना गरजेचे होते कारण त्यांच्या वास्तववादापेक्षा सशक्त
वास्तववाद आंबेडकरी विचारप्रणाली मधून आलेले बाबुराव बागुल आणि इतर दलित साहित्यिक सादर करत
होते . दया पवार
ह्यांच्या '' बलुत '' ह्या आत्मकथनाने तर नेमाडे
ह्यांचा वास्तववादही किती पातळ आहे ते दाखवून दिले नंतरच्या दलित आत्मकथनानी
भारतीय साहित्याचा चेहरामोहराच बदलून टाकला .
ह्या पार्श्वभूमीवर नेमाडे ह्यांना स्वत:च्या वास्तववादाची नवी ओळख निर्माण करणे गरजेचे बनले.अशावेळी आंबेडकरांच्या विचारप्रणालीला शह देणारा एकच विचारवंत नेमाडेच्या कामाला येवू शकत होता तो म्हणजे महात्मा गांधी ! देशिवादाची पहिली अस्सल मांडणी ही गांधीनी केली होती विदेशी संस्कृतीचा व वसाहतवादाचा प्रभाव रोखणे हे गांधी ह्यांचे सांस्कृतिक धोरण होते पुढे लोहिया ह्यांनी हा देशीवाद समाजवादाच्या अंगाने पुढे न्हेला जयप्रकाश नारायण ह्यांनी तो इंदिरा गांधी ह्यांना नामोहरण करण्यासाठी वापरला राजकीय पातळीवर यशस्वी झालेला हा समाजवादी देशीवाद एकाच वेळी आंबेडकरवादाला शह देत होता आणि वसाहतवादाला विरोधही करत होता. ह्यातूनच कोकाकोलाला हाकलून देणे वगैरे प्रकार झाले . त्यातूनच ब्राह्मणेतरांना देशीवाद देत देत दलितांना वेगळ्या पद्धतीने गोन्जारण्याचे धोरण अवलंबले गेले. सृष्टीयतेला आवश्यक अशी विचारप्रणाली देशीवादाच्या रूपाने नेमाडे ह्यांना मिळाली आणि १९८३-४ साली ती अधिकृतरीत्या सादर करण्यात आली . तिने आंबेडकरवादाला शह आणि मात दिलीच पण नेमाडे ह्यांचे कोसलाने निर्माण केलेले नायकत्व अबाधित राखले . माघार घेवूनही कशी सत्ता सोडायची नाही आणि नायकत्वही कसे अबाधित राखायचे हे कॉंग्रेसने समस्त क्षत्रियांना शिकवले होतेच नेमाडे ह्यांनी ही शिकवणी कला क्षेत्रात गिरवली . आश्चर्यकारक रीतीने खुद्द दलित साहित्यिक नेमाडे ह्यांची भलावण करू लागले आणि त्यांनीही साहित्यात कॉंग्रेसला सहकार्य करण्याऱ्या रिपब्लिक पार्टीचे धोरण स्वीकारले . ही irony होती पण तिने देशीवादाचा विजयरथ दलित वस्तीतही फिरवला आणि मंगेश बनसोड सारखे आमचे मित्रही नेमाडे ह्यांचे fan म्हणून मिरवू लागले. पुढे ह्या देशिवादाला हिंदू फोडणीही मिळाली. नेमाडे ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्व वाद्यांना मदत करणार हे लक्ष्यात येताच मी नेमाडे ह्यांच्यावर वैचारिक हल्ले करायला सुरवात केली. भा . ज . प . मधील वाजपायी आणि देशिवादातील नेमाडे ह्यांची व्यक्तिमत्वे अत्यंत उमदी आणि कारीश्मातिक असली तरी ती अंतिमतः हानिकारक आहेत . दोघेही सज्जन आहेत पण दोघेही अंतिमतः डायबेटीस देणारे आहेत साहजिकच नेमाडे ह्यांना प्रखर विरोध करणारे लेख मी १९९०- ९१ साली लिहिले आणि अभिधा सौष्ठव आणि इतरत्र ते छापूनही आले. माझे साठोत्तरीविरोधातील बंड ह्या लेखांनी अधोरेखित केले .

ह्याचा अर्थ नेमाडे हे ह्या
सन्मानाला अपात्र आहेत असा नाही आणि त्यामुळे कुणाला पोटदुखी व्हायची गरजही नाही. नेमाडे
ह्यांच्यामुळे देशी वास्तववादी परंपरा अधिक सशक्त झाली आणि त्यांनी पहिली परिपूर्ण
नवकादंबरी लिहली हे त्यांचे योगदान कोण नाकारणार ? ते ज्ञानपीठाला सर्वाधिक पात्र होते
ह्याबददल माझ्या
मनात कसलीही शंका नाही पण
त्यांनी घेतलेल्या माघारीमुळे देशी जादुई वास्तववादाची शक्यता कायमची गाडली
गेली हेही खरेच ! वास्तविक भारतीय परंपरा ही वास्तववादी जितकी आहे
तितकी अतिवास्तववादीही आहे पण नेमाडे ह्यांच्या वास्तववादाने कल्पनाशक्तीच मारून
टाकली आणि चक्क मराठी कविताही वास्तववादी झाली जगात वास्तववादाचे कवितेत celebration करणारी
मराठी कविता ही एक अनोखी कवितासंस्कृती आहे . आक्षेप त्यालाही नाही पण त्यामुळे
कवितेत गद्य साजरे करणारे लेखक कवी म्हणून मिरवू लागले आणि त्याने मराठी कविताही
बिघडवली त्याचे काय ? हे एक
बरेच आहे की नेमाडे हे ह्यापुढे फक्त कविताच लिहणार आहेत कदाचित त्यामुळे त्यांनी
सुरु केलेला कवितेतील पद्याचा कर्करोग बरा होईल
3
ज्यावेळी मराठीत
वास्तववादाचा गवगवा सुरु झाला होता त्यावेळी विज्ञानात मात्र वास्तव धोक्यात आले
होते सापेक्षतावादाने माणसाला दिसणारे वास्तव हे तो कोठे आहे आणि त्याची काय
गती आहे त्यावर अवलंबून आहे असे सिद्ध करून माणसाच्या इंद्रियशक्तीची हवाच काढून
घेतली डोळ्यांनी दिसणारा वेग शून्य असेल पण तो प्रत्यक्षात
लाखो मैल असू शकतो हे कळल्यावर कुठला शहाणा माणूस डोळ्यांनी दिसण्याऱ्या वास्तवावर विश्वास
ठेवेल ? नेमाड्यांनी
मुळांचा सिद्धांत मांडून भल्याभल्यांना मूर्ख बनवले आणि १९६० नंतर सापेक्ष
वास्तववादा ऐवजी निरपेक्ष वास्तववादाचा पारंपारिक पाढा सर्वांनी वाचायला सुरवात
केली आणि मग लिहायलाही ! कादंबरी हि मुळात निरपेक्ष वां आत्मकेंद्री
वास्तव सांगायलाच जन्माला आली होती त्यामुळे एकतर पारंपारिक कादंबरी स्वीकारा वा
कादंबरीला बदला असे दोनच पर्याय लेखकाकडे उरले . नेमाडेंनी संपूर्ण मराठी
साहित्याला पहिल्या पर्यायात ढकलून दिले आणि प्रतीकादम्बरीचा पर्याय रोखून धरला .
स्वामी लिह्ण्याऱ्या रणजीत देसाई ह्यांनी हेच केले होते . त्यामुळे मराठीत पारंपारिक कादंबरीचा मृत्यू झालाच नाही आणि प्रतीकादम्बरीची वाट रोखली गेली सात सक्क
त्रेचाळीस ह्या महाकृतीने प्रतीकादम्बरीची वाट शोधली होती पण त्या वाटेने फार लोक
गेलेच नाही आणि विसाव्या शतकात प्रतीकादम्बरीचा वाढ होण्याआधीच मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment