गोविंद
पानसरे ह्यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
कॉम्ऱेड गोविंद
पानसरे ह्या अजातशत्रू माणसावर हल्ला व्हावा ह्याहून दु:खद गोष्ट ती काय ? पानसरे आणि मी एकाच
गल्लीतील रहिवासी . मी लहानपणापासून त्यांना पाहतोय . माणुसकीचा निखळ झरा
आहे हा माणूस ! त्याच्यावर हल्ला ? कुणाची डोकी अशी फिरलेत आणि कोणी ती फिरवलेत ?हिंसक विरोध करून विचार
संपवता येतात अशी महामूर्ख गैरसमजूत कुणाची झालीये ? मी ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि
त्यांच्या विरोधकांना लवकरात लवकर सद्बुद्धी सुचेल अशी अशा करतो .
श्रीधर तिळवे
No comments:
Post a Comment