Friday, February 20, 2015

शेवटी पानसरे गेले

शेवटी पानसरे गेले. दुसऱ्याच्या मूर्खतेने त्यांना मृत्यू दिला . विचारप्रणालीचा अस्त होत असताना ज्यांना विचारप्रणाली नष्ट होणार नाही असे भय वाटते आणि ज्यांना अजूनही विचारप्रणाली लोकांचे लढे लढवू शकते ह्याचे भय वाटते अश्या भ्याड लोकांचा हा हल्ला असेल तर त्याहून लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी नाही .
मी स्वतः कम्युनिझमच्या विरोधात होतो आणि आहे पण कॉम्रेड स विषयी मला प्रेम आहे . परिवर्तनाची लढाई पारंपारिक मार्गांनी लढायचे दिवस इतिहासजमा झालेत आणि कम्युनिझम हा ऑ उट डेटेड झालाय हे मला मान्यच आहे पण हे मतभेद अहिंसक मार्गांनी टेबलावर बसून सोडवता येतात त्यासाठी हत्या करणे हे अक्कल रसातळाला गेल्याचे लक्षण आहे . समजा तुमच्या हितसंबंधाच्या आड एखादा   माणूस येत असेल तर निवडणुकीत त्याला हरवा वा त्याच्याशी वाद घाला . आणि हे न  करता तुम्ही एका चांगल्या माणसाची हत्या करत असाल तर तुम्ही हलकट व नीच प्रवृतीचे आहात असेच म्हंटले पाहिजे . ह्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत सर्व निर्णय अहिंसात्मक मार्गानेच घेतले गेले पाहिजेत . टेबलावर प्रश्न सुटत नसेल तर कोर्ट आहेच . तिथे अपील  करू शकता . आणि परिवर्तनवा द्यांच्यात दहशत पसरवणे हा तुमचा हेतू असेल तर तो सा ध्य
होणे कठीण आहे . उलट आता तो जोमाने फैलावेल . रक्त फक्त दहशत पसरवत नाही ते त्या मृत माणसाचा विचारही पसरवते .
तेव्हा हे हल्ले थांबवा , हा मूर्खपणा आहे
पानसरे सर , तुम्ही आता नाही आहात हि गोष्ट व्याकुळ करणारी आहे,शरद पाटील आणि तुम्ही खरा शिवाजी लोकापर्यंत आणलात . कोल्हापूरचे तुमचे आकलन हे द्रष्टेपणाचे होते . तुम्ही गेलात तरी तुमच्या लढवय्ये पणाच्या कथा आणि वारसा सोबत राहीलच .
श्रीधर तिळवे 

No comments: