व्हॅलेंटाईन डे नंतर श्रीधर तिळवे नाईक
भावकेन्द्री कविता लिहिणे म्हणजे फक्त रोमँटिक कविता लिहिणे न्हवे प्रबोधनकाळातील भावकेन्द्री कविता रोमँटिसिझमच्या रूपाने अवतरली पण त्याच्याही आधी भावकेन्द्री कविता लिहिली जात होतीच गाथासप्तशतीत कित्येक गाथा ह्या भावकेन्द्री आहेत पण मराठी अभिरुचीला हे समजवणार कोण परिणामी व्हॅलेंटाईन डे ला रोमँटिक कवितेचा महापूर ! वास्तविक आधुनिक भावकेन्द्री कविता कशी लिहायची ह्याचे प्रात्यक्षिक चार्ल्स बोदलेयरने आणि उत्तराधुनिक भावकविता कशी लिहायची हे ऑकटोविया पाझने दाखवून दिल्यावर (पाझच्या प्रभावाखाली येऊनच दिलीप चित्रे वेगळे लिहतात ) किमान मराठी कवींनी तिथपर्यंत तरी यायला हवं होतं पण हे झालं नाही बायका अजूनही रोमँटिसिझमला भुलतात म्हणून हे होतं का ? (पुरुषांचं मला माहीत नाही ते बायकाच सांगू शकतील ) वास्तविक स्वतःच्या प्रेमसंबंधाकडे आणि त्यातील गुंतागुंतीकडे नीट पाहिलं तरी गोष्टी साफ व्हाव्यात इमोशनल होण्याचा अर्थ रोमँटिक होणेच असतो असं नाही अनेकदा रोमँटिक पिंडाचे लोक डॅम्बीस असतात हा माझा अनुभव आहे भावनांच्या आधारे इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि आणि त्याही पुढे जाऊन इमोशनल अत्याचार असंही घडलेलं दिसतं अनेकदा रोमॅंटिसिझमला बळी पडणारे इमोशनल फूल्सही खूप असतात
भावकेन्द्री असण्याचा खरा अर्थ प्रेम आणि करुणा केंद्रवर्ती ठेवून दुसऱ्याला सेन्सिटिव्हली समजून घेणे , शृंगारिक प्रेमात पडल्यावर स्वातंत्र्याचा एक हिस्सा गमवावा लागतो तो गमावण्याची तयारी ठेवणे , एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे वेळप्रसंगी त्यासाठी कठोर होणे (विशेषतः ह्यात आहार येतो मेडीकॅलिटी येते ) असा आहे डायबेटीस झालेल्या पार्टनरला प्रेमाने साखरी केक खायला घालणे हे प्रेम न्हवे तर पार्टनरबद्दल निष्काळजीपणा दर्शवतं आणि निष्काळजीपणा करुणेच्या अभावातून येतो
बाकी मोठमोठ्या गप्पा हाणून चंद्र तारे वैग्रे तोडायची कल्पनाशक्ती अभिव्यक्त करण्याला प्रेम म्हणण्याचे स्वातंत्र्य आहेच लगे रहो रोमँटिक भाई और बहनो
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment