पंचांग श्रीधर तिळवे
१
काल अकस्मातपणे शैव पुरोहितांच्या प्रतिनिधींचा फोन आला गेली कित्येक दशके मी शैव कॅलेंडरची व पंचांगाची संकल्पना मांडतोय आणि मान्सून गेल्या काही वर्षात केरळात १० ते १५ जून व महाराष्ट्रात १५ जून ते २१ जून ह्या दरम्यान येतोय हे सांगतोय व शेतकऱ्यांनी आपले हिशेब ह्या अंगाने करावेत असं सांगतोय किमान ह्या दिशेने विचार व्हावा अशी मांडणी करतोय
पूर्वी वळवाचा पाऊस १५ मेच्या आसपास यायचा तो आता २८ मे ते ६ जून दरम्यान येतोय आणि त्यालाच मान्सून समजण्याची चूक होतीये त्या अंगाने गेली दोन वर्षे निरीक्षणे करून झाल्यावर आता तुमच्या संकल्पनेवर काम करूया अशी सूचना आलीये जर ह्या अंगाने वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांग तयार झाले तर ते हवे आहे मी श बा दीक्षितापासून लोकमान्य टिळकांच्या पर्यंत अनेकांचे संदर्भ देऊन ह्याबाबत आर्यांच्या नेमक्या कुठे चुका झाल्यात त्या पाहून व दुरुस्त करून त्या अंगाने काम करूया अशी सूचना दिलीये जी आता स्वीकारण्यात आलीये मीच बरोबर अशी माझी भूमिका नाही पुनर्विचार व्हावा अशी विनंती आहे
भारतीय शैव हे कायमच पंचांगाचे मास्टर लोक होते पण आठव्या शतकात शैवांची मागपडणी (पीछेहाट) सुरु झाली आणि त्याचा भारतावर विपरीत परिणाम झाला पंचांग हा शहरवासीयांना फक्त मुहूर्ताचा विषय असतो पण गावात शेतीविषयीची कामे त्यावर अवलंबून असतात असो
आर्य पुरोहितांना जे करायचंय ते करू द्या पण शैव पुरोहितांनी व शैवांनी मोक्ष , विज्ञान, चिन्हविज्ञान तंत्रज्ञान व चिन्हतंत्रज्ञान ह्या अंगानेच पुढे गेले पाहिजे हे मी ठामपणे मांडतो आहेच हळूहळू का होईना पण ह्याबाबत जागृती होते आहे हे चांगले लक्षण आहे शैवांच्याकडे विज्ञान तंत्रज्ञानातले तीन चार नोबल लॉरेंट निर्माण होत नाहीत तोवर काही खरं नाही मोक्षदर्शन हा आरंभ असू शकतो पण मुख्य काम विज्ञान चिन्हविज्ञान तंत्रज्ञान चिन्हतंत्रज्ञान ह्याच क्षेत्रात होत असते
श्रीधर तिळवे नाईक
तू भेटलास तेव्हा स्थिती थोडी गंभीर होती शैलेन्द्रांच्यामुळे डॉक्टरांकडे गेलो पल्स प्रचंड झाल्याने हे झालंय असं त्यांचं म्हणणं आहे आता थोडा बरा आहे बोलतांना कमी वेदना होतायत
शैवांची कामं मुख्यतः मौखिक असल्यानेच गप्प आहोत आर्यभट वैग्रे शैवच होते व त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत फलज्योतिषशास्त्रात महेश्वर , काशिनाथ ,वराहमिहीर अशांची मते मिळतात ती पंचांगाशिवाय अस्तित्वात आली असतील काय ? तुला असं म्हणायचंय का गावातला गुरव किंवा जंगम किंवा शैव ब्राम्हण पूर्वी अंदाजपंचे पेरण्याचे मुहूर्त सांगायचे ? माझ्या आजोबांनाच मी हे मुहूर्त काढताना बघितले आहे . ज्योतिष आणि फलज्योतिष हे अनेकदा पूर्वी एकच मानले जायचे अगदी न्यूटनसुद्धा फलज्योतिष अभ्यासायचा हे तुला माहीत नाही का ? ह्या देशात जसे बौद्धांचे ग्रंथ जाळले गेले तसे शैवांचेही ! श्रीलंका ,चीन , तिबेट मध्ये बौद्ध धर्मग्रंथ मिळाले नसते तर भारतात बौद्धांकडे काय घंटा पुरावे होते ? आता आता व्हिएतनाममध्ये शैव राजवट असल्याचे आणि तिला नंतर बौद्ध व वैष्णवांनी रिप्लेस केल्याचे पुढे येते आहे . हळूहळू पुरावे पुढे येतीलच पण पुराव्याची वाट पहात आम्ही आता काम करू नये असं तुला म्हणायचंय का ?
ज्याला आसुरी बरं वाटून घ्यायचे असते तो आसुरी बरं वाटून घेतो
जिथे गोतम बुद्धच कपिल ह्या शैवाच्या खांद्यावर बसलेला आहे तिथे बौद्ध ज्ञानाविषयी काय बोलावे ? ज्याला बौद्ध ज्ञान म्हंटले जाते तिथे तेच मुळी शैवांच्यापासून सुरु होते सूर आर्यांचे ओरिजनल दर्शन एकच मीमांसा बाकी सगळी शैवांची उसनवारी ! चायनीज प्रवासी बौद्ध धर्म स्वीकारूनच आले होते ते बौद्ध धर्माविषयीच आणि बौद्ध धर्माच्या बाजूने बोलणार व बौद्ध ग्रंथ न्हेणार जे नैसर्गिकच आहे . शैव प्रवासी आले असते तर त्यांनी शैव ग्रंथ न्हेले असते बाकी पुराव्याची गोष्ट तर त्यासाठी शैव ग्रंथ वाचायला हवेत
देशीवादाचा आरोप विनोदी आहे मुळात शंकरानी सांगितलेला शैव असो कि बुद्धाचा बौद्ध हे धम्मच मुळात मार्गी आहेत पंचाग ही गोष्टच मुळात मार्गी आहे जे जे समस्त मानवजातीसाठी सांगितले जाते ते ते मार्गीच असते शंकराच्या काळात समुद्र पर्यटन करतील अशी जहाजे न्हवती त्यामुळे शंकर कधीही जहाजात बसलेला दिसत नाही त्यामुळे भारतीय उपखंड हेच जग होते आणि त्या प्रदेशात शैव धम्म पसरवण्याचा आदेश दिला गेला गौतम बुद्धाच्या काळात आशिया खंड हा जग होता म्हणून आशियाभर बौद्ध धर्म पसरवण्याचा त्याने आदेश दिला ख्रिश्चन व इस्लामच्या काळात आफ्रिका आशिया युरोप माहीत झाले होते म्हणून ह्यांनी त्रिखंड व्यापले पुढे दोन्ही अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंड माहिती झाले म्हणून हेही जगात आले आठव्या शतकानंतर शैव देशीवादी झाले आणि प्रत्याभिज्ञा स्पंद दर्शन काश्मिरी शैवागम झाले सिद्धांत दर्शन तामिळ सिद्ध दर्शन झाले ह्याउलट ह्या काळात शंकराचार्यांनी मार्गी होत वेदांत भारतभर न्हेला देशीवादाने भारताचे विशेषतः बहुजन समाजाचे कायमच नुकसान केले आहे
थोडक्यात कपिलच्या खांद्यावर गौतम बुद्ध असतो आणि आंबेडकरांनीच हे मांडलेलं असतं मग बुद्ध मूर्तिपूजेच्या विरुद्ध असल्याने शैव उत्पादक वर्गाने बनवलेल्या शंकराच्या मूर्त्यांना बुद्धाच्या मुर्त्या म्हणायचे असते आणि शैवांच्या शिवभक्तीनुसार बुद्धाची भक्ती सुरु करून महायान पसरावयाचे असते शैवांच्या तंत्राला आत्मसात करून पुढचे वज्रयान रचायचे असते शैवांच्यावर टीका करणाऱ्यांना शैव ग्रंथ वा दर्शने वाचण्याची तसदी घ्यायची नसते शैव मंदिरांची आर्किटेक्ट्स ही जिवंत पुरावे असतानाही शैवांना अक्कल नाही असे भासवायचे असते मूळ मुद्द्यावर(इथे मान्सूनच्या तारखा का चुकतायत हा मुद्दा आहे ) भाष्य न करता कुठलेतरी तळातले वाक्य उचलून वादविवादाची लांबड लावायची असते
आणि मूळ पोस्टमध्ये उद्युक्त केलेले लेखक चर्चेत न आणता कॉमेंट्स पास करायच्या असतात
एक बौद्ध पंडित सिद्धाला म्हणाला ,"मी तुझ्यापेक्षा जास्त जाणतो "
सिद्ध म्हणाला ,"हो "
प्रकृती बिघडलीये प्रज्ञा ठणठणीत आहे मानसिक ताण इमॅजिनेशन्स असतात ते अस्तित्वात नाहीत आपुलकीबद्दल धन्यवाद मित्रवर्य
सर , पंचांग म्हणजे पाच अंगे ती पुढीलप्रमाणे
१ ग्रहगती व ग्रहस्थिती
२ अवकाशबिंदू जसा अयनबिंदू
३ नक्षत्रस्थिती (ग्रीक लोकांच्यात राशी )
४ तिथी , पक्ष व वार
५ वर्ष
पंचांग ऍस्ट्रॉनॉमी ज्याला भारतात ज्योतिष म्हणतात त्याचा भाग आहे ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे फलज्योतिष हे पूर्ण वेगळे आहे व मी मागेच इथे म्हंटल्याप्रमाणे त्याला करमणूक म्हणूनच स्थान द्यावे पाश्चात्य देशात भविष्याचा तार्किक अभ्यास करण्याच्या शाखेला फ्यूचरॉलॉजी म्हणतात त्याला विज्ञान म्हणावे कि नाही किंवा त्याला विज्ञानाचे स्वरूप कसे द्यावे त्यात पूर्वसूचनचा समावेश करावा कि नाही हा वाद सतत चालत असतो पण त्याचा फायदा असा असतो कि माणसे भविष्यकेंद्री विचार करतात केवळ इतिहासात गोते खात बसत नाहीत मला ह्याच शाखेत बॅचलर व मास्टर डिग्री मिळवायची होती पण भारतात त्यावेळी कुठल्याच विद्यापीठात ही शाखा शिकवली जात न्हवती आणि युरोप अमेरिकेत जाण्यासाठी लागणारा पैसा माझ्या बापाकडे वा माझ्याकडे न्हवता पुढे १९९० साली तामिळनाडू मध्ये ह्या शाखेचा विचार सुरु झाला मात्र मी स्वतःच्या जीवावर ह्या शाखेचा स्वतःच्या अल्पमतीप्रमाणे अभ्यास करत राहिलो कम्युनिझमच्या इतिहासात फक्त चायनाने ह्या शाखेचा वापर १९७२ पासून करायला सुरवात केली आहे बाकी देशांनी तो केला असता तर कदाचित तिथला कम्युनिझम वाचला असता बाकी मार्क्सने दिलेल्या प्रेडीक्शन्सचा विचार आम्ही आर्थिक फ्यूचरॉलॉजीत अधूनमधून करत असतो
राहता राहिली गोष्ट जगबुडीची ! तर जगबुडीचा मला अनुभव नाही मी जगबुडीविषयी फक्त कथा , दंतकथा , कादंबऱ्यांतून सिनेमातून ऐकून व पाहून आहे त्यामुळे जगबुडी होणार कि नाही मला माहित नाही किंवा होणार असेल तर कधी होणार ह्याविषयी मी काहीच सांगू शकणार नाही मला वाटतं तुम्ही हा प्रश्न जगबुडीतज्ञानां विचारावा
तूर्तास शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या वाया जाताहेत तर त्याला आत्ताचे पंचांग किंवा हवामानशास्त्र जबाबदार आहे का हा माझ्या कन्सर्नचा विषय आहे आणि विज्ञानांत वैयक्तिक मतांना काहीच किंमत नसते त्यामुळे वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांगाचा पुनर्विचार करावा का इतकाच प्रश्न मी चर्चेला घेतला आहे एक पेरणी वाया जाणे म्हणजे शेतकऱ्याचे किती श्रम व धन वाया हे आपण कम्युनिस्ट असल्याने सांगण्याची गरज नाही .
पंचांग म्हणजे कुणी मुहूर्त सांगणारा किंवा जगबुडी सांगणारा ब्राम्हण असा गैरसमज होऊ नये म्हणून हे सांगतो आहे सद्या आपण ख्रिश्चन पंचांग आणि ह्या पंचांगानुसार तयार झालेले कॅलेंडर वापरतो आणि आपल्या ते गावीही नाही . अपवाद काही इस्लामिक देश ते मात्र इस्लामिक पंचांग वापरतात नासाने स्वतःचे पंचांग डिक्लेअर केलेले आहे पण अजून तरी कुठल्या देशाने ते शास्त्रशुद्ध असूनही स्वीकारलेले नाही असो इथे पंचांग म्हणजे काय ते सांगतो आहे
ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केलेलं लिखाण )
No comments:
Post a Comment