पॅशन दाय नेम इज दिलीपकुमार श्रीधर तिळवे नाईक
दिलीपकुमार माझ्या बालपणात मला कधीच आवडले नाहीत माझे वडील त्याचे डायहार्ड फॅन त्यामुळे लहानपणी त्याचे काही चित्रपट मला नाईलाजाने पाहायला लागत वडील दर सोमवारी मला शक्य असेल तर एक चित्रपट दाखवत आणि तो बहुतांशी इंग्लिश असे तरीही काही मॅटिनीज दिलीपकुमारचे होते पण लहानपणी मनोजकुमारने दिग्दर्शित केलेला क्रांती पाहिला आणि मला वाटलं कि हा चांगला अभिनेता आहे मी मग दिलीपकुमार रिटेक सुरु केला आणि केदार शर्माचा जोगन पाहिला मला दिलीपकुमारचा अभिनय मोकाट आवडलेला हा पहिला चित्रपट !
ह्या वेळीच रमेश सिप्पी सलीम जावेदचा शक्ती , यश चोप्राचा मशाल पाहताना वाटलं कि दम आहे त्यानंतर मग बिमल रॉयचा देवदास फिरून पाहिला आणि फिरून फिरून गंगावेश तसा पाहत राहिलो हा एक अद्भुत चित्रपट होता खऱ्याअर्थाने रोमँटिक चित्रपटाचा कळस !देवदासमधली पॅशन हा एक ग्रंथाचा विषय आहे
मात्र त्याला दिलेले वास्तववादी अभिनयाचा टॅग मला कधीच पटला नाही राज कपूर दिलीपकुमार आणि देव आनंद हे तिघेही रोमँटिक अभिनेतेच ! अगदी मुघल ए आझम मधेही दिलीपकुमार मला दिलीपकुमार विथ पॅशनच वाटला . आणि तो तसा होता म्हणूनच पृथ्वीराज कपूरच्या क्लासिकल स्कूलच्या सर्वोच्च अभिनयापुढे व मधुबालाच्या क्लासिकल सौंदर्यापुढे तोडीसतोड पॅशन घेऊन टिकला त्याउलट त्याला समांतर असलेले बलराज साहनी व मोतीलाल हे जास्त व खरे वास्तववादी होते दिलीप कुमारकडे असलेली पॅशन राज व देव दोघांच्यातही मिसिंग होती आणि तिची कसर हे लोक स्टाईलने भरून काढण्याचा हे दोघे केविलवाणा प्रयत्न करत ही पॅशन नेमकी कुठून येत होती हे कोडे खुद्द दिलीपकुमारलाही सुटले असेल कि नाही कुणास ठाऊक ?
मग पुन्हा कधीतरी गंगा जमुना (ह्यावरूनच पुढे सलीम जावेदचा दिवार आला ) पाहिला आणि मग मधुमती दोघेही अभिनयात ढग होते अंदाज न येणारे पण पाऊसगच्च ! नया दौर , राम और श्याम , लीडर ! माझी दिलीपकुमारची यादी इथे संपते बैराग वैग्रे पाहिले पण पॅशन मिसिंग वाटली .
१९९२ ला अडा हॉ का बा ना सु ना लिहिताना कामत्रिकोणासाठी दिलीपकुमार , सायरा व अस्मा हा त्रिकोण निवडला आणि डोकं गरगरवणारे अनेक तपशील उपलब्ध झाले मग मी दिलीपकुमार एक व्यक्ती म्हणून विचार करणे सोडून दिले जो माणूस आपल्या मित्राच्या बायकोशी रोमान्स करतो आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडतो त्याला माझ्या एथिक्समध्ये जागा नाही साहजिकच व्यक्ती म्हणून दिलीपकुमारला जागा मिळणे बंद झाले मात्र एक अभिनेता म्हणून असलेला त्यांच्याविषयीचा आदर कधीच कमी झाला नाही पॅशनेट ऍक्टिंग कशी करायची ह्याची दिलीपकुमार म्हणजे चालतेबोलते विद्यापीठ होते दुर्देवाने ह्या विद्यापीठाचे धर्मेंद्र , राजेंद्रकुमार , मनोजकुमार असे अनेक विद्यार्थी सुपरस्टार झाले तरी दिलीपकुमारची पॅशन ह्या सर्वांच्यात मिसिंग होती आणि नकलेत ती मग कितीही चांगली असो पॅशन ओतता येत नाही हे सिद्ध झाले सुदैवाने ह्यापैकी धर्मेंद्रने आपली अभिनयशैली बदलून हीमॅन केली आणि तो वाचला नाहीतर राजेंद्रकुमारसारखा तोही अशोभनीय झाला असता
पुढे ह्या विद्यापीठाला समांतर रोमँटिक विद्यापीठ राजेश खन्नाने उभे केले आणि दिलीपकुमार स्कूल काही काळ मागे पडले पण पुढे अभिताभ बच्चनच्या रूपाने दिलीपकुमार विथ पॅशन विद्यापीठ पुन्हा नूतनीकरणासकट उगवले आणि त्याने दिलीपकुमारची दुसरी इनिंग प्रमोट केली पुढे शाहरुख खानने दिलीपकुमार विथ राजेश खन्ना ह्यांचा समतोल साधून ऍक्टिंगमधला तिसरा रोमँटिसिझम आणला जो आजच्या पिढीत रणवीरसिंग पुढे न्हेतोय
माझा ना अल्ल्हाहवर विश्वास आहे ना जन्नतवर ! त्यामुळे अलविदा ऍक्टर ऑफ पॅशन ! जहाँ रहो पॅशनमे रहो !
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment