Thursday, August 16, 2018

अटलजी गेले हिंदुत्ववादाचा विवेक गेला कट्टरतेची सारासारबुद्धी गेली वैदिक संस्कृतीचा उदारमतवाद गेला यज्ञ संस्कृतीतील दुर्मिळ ऋजुता गेली

ते जिथे उभे होते ती जागा निंदेने भरलेली जागा होती ही सारी निंदा त्यांनी आयुष्यभर वैभवासारखी मिरवली तुम्ही चुकीच्या पार्टीत आहात असे लोक म्हणू लागल्यावर तुमचा चष्मा चुकीचा आहे हे सांगायला त्यांनी कमी केले नाही ते मवाळ पाण्यासारखे होते पण भली भली धरणं फोडायची ताकत त्यांच्यात होती आणि शेवटी त्यांनी काँग्रेसचे धरणही फोडले . हिंदुत्ववादावर त्यांची अविचल निष्ठा होती ह्या निष्ठेनेच शेवटी त्यांना पंतप्रधान पदापर्यंत पोहचवले ते उत्तम आणि शालीन वक्ते होते त्यांचे भाषणातील दीर्घ विराम त्यांच्या व्यक्तिमत्वातील ठहराव अधोरेखित करत होते हा माणूस अभिजात संस्कृतीला दरवळ पुरवतो ह्याची त्यांना पाहिले तरी खात्री पटत असे .

त्यांना माझी मनापासून आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 

No comments: