Monday, August 20, 2018

ऐंशोत्तर कालखंड आणि माझी गझल

प्रत्येक कवी त्याच्या कालखंडात आणि अवकाशखंडात लिहीत असतो अपवाद काही अतिशहाणे अतिमहान रोमँटिक कवी ते काहीतरी कालातीत आणि अवकाशातित लिहीत असतात अनेकदा एखादा फॉर्म एखाद्या कालखंडात आपल्याला ग्रासून टाकत असतो आणि नंतर त्याची पकड ढिली होत जाते गझलेबाबत माझे असे झाले आहे अर्थात काही लोक आयुष्यभर एकच फॉर्म मुख्य फॉर्म म्हणून वापरतात आणि अनुषंगिक फॉर्म अपवादात्मक वापरत राहतात अपवादात्मक वेळा असेही होते कि एखाद्या कविला एखादे वृत्त मुख्य फॉर्म वाटते म्हणजे मर्ढेकरांना ओवी अभंग हे फॉर्म आणि नंतर पादाकुलक हे वृत्त मुख्य वाटलेले दिसते

आम्ही ज्या कालखंडात लिहायला सुरवात केली त्या कालखंडात मुक्तछंद हाच फॉर्म मुख्य फॉर्म म्हणून प्रचलित झाला होता आणि जणू ह्याला टक्कर द्यायला म्हणून गझल अवतरली हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील संगीताचे व गीतसंस्कृतीचे ह्या काळात इतके अधःपतन झाले होते कि मध्यमजन व बहुजन संस्कृती ह्या काळात गझलेकडे वळली आणि त्या प्रभावाखाली आमच्यासारखे नवागतही ! हा कालखंड गुलाम अली जगजितसिंग मेहंदी हसन ह्यांनी गजबजून गेला होता आणि त्यांनी जनमानसाची चांगल्या गीतकारीची भूक भागवायला सुरवात केली होती अगदी कॉलेजमध्येही ह्या काळात बॉलीवूड म्युझिक इतकीच चर्चा गझलांच्या आलबम्सची असायची नवीन कुणाची कॅसेट आली कि उड्या पडायच्या नव्वदनंतर ए आर रेहमानने हा माहोल बदलला आणि लोक पुन्हा बॉलीवूड म्युझिककडे वळले आज अवस्था अशी आहे कि भारतात लोकसंगीतात व मध्यमजन संगीतात  एक कालखंड गझलेने व्यापला होता ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल इतके पबमय आपण झालो आहोत

साहजिकच ऐंशोत्तरी कालखंडातील अनेक कवी ह्या काळात गझल लिहिताना दिसतात अगदी दशकांच्या कवितील अशोक बागवे हा सुद्धा गझलेकडे वळलेला दिसतो साहजिकच ह्या काळावर सुरेश भटांचा ठसा उमटणे अटळ होते अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आमच्या कोल्हापूरच्या कवी ग्रुपमधील श्रीराम पचिंद्रे आणि नीता भिसे सुरेश भटांचे शिष्य झाले मी आणि राजकुमार यादव हिंदी कविता प्रचंड वाचत असल्याने आमच्यात भटांच्यापेक्षा नीरज , दुष्यन्तकुमार आणि प्रकाश पंडितांनी हिंदीत आणलेल्या उर्दू शायरांची चर्चा अधिक होती मला त्या काळातील माझ्या समकालीन लोकांच्यातील इलाही जमादार , म भा चव्हाण , प्रदीप निफाडकर ह्यांच्यातही थोडा रस होता तो नीता भिसेमुळे ! ती ह्यांच्यावर खूप पॉझिटिव्ह चर्चा करायची पुढे किशोर कदमच्या गझलाही मला जबरदस्त आवडायला लागल्या होत्या त्याला खाजगीत तू गझल सोडू नकोस हे मी कित्येकदा सांगितले आहे त्याने सातत्याने गझल लिहिली असती तर मराठीत सानेकर सौमित्र अशी जोडगळीच दिसली असती असो

आज जेव्हा ह्या कालखंडाकडे मी बघतो तेव्हा मला एकच प्रश्न पडतो तो म्हणजे आम्ही सर्वांनी ह्या १९८० ते १९८७ ह्या कालखंडाला आपल्या गझलेत न्याय दिला का ?माझे समकालीन गझलकार पुढील कालखंडातही गझल मुख्य फॉर्म म्हणून हाताळताना दिसतात पण त्यांच्या त्या त्या  कालखन्डातल्या गझला त्या त्या  कालखंडाला न्याय देतात काय ?

गझलेवर रोमँटिसिझम कायमच दबाव टाकून आहे अगदी सानेकरांसारखा गझलकारही ह्यातून सुटलेला दिसत नाही मग इतरांची तर गोष्टच सोडा त्यामुळे भावनाबंबाळपणा हे गझलेचे मुख्य भागधेय आहे कि काय असाही प्रश्न पडतो १९९० नंतर जिला आंबेडकरवादी गझल म्हणता येईल अशी गझल आली पण तिलाही भावनाबंबाळतेला छेद देता आलेला नाही असे दिसते मला स्वतःला बुद्धी भाव आणि कल्पना ह्या तिन्ही आयामांविषयी सारखेच अगत्य आहे नुसता भावनाबंबाळपणा जितका गझलेला घातक तितकाच नुसता बुद्धिबम्बाळपणा आणि कल्पनाबंबाळपणाही घातक ! मी स्वतः भावप्रधान , बुद्धिप्रधान आणि कल्पनाप्रधान असे तिन्ही प्रकारचे शेर लिहित होतो

उदाहरणार्थ ह्या सगळ्या कालखंडात अचानक भारतात व एकंदरच आशियात धर्माने कमबॅक केले पण आपण ह्या कालखंडात सेक्युलॅरिझमच्या आधुनिक चिपळ्या वाजवण्याखेरीज काय केले? वास्तविक पारंपरिक धर्माविरुद्ध थेट लढणं ह्या काळात आवश्यक होतं ही लढाई आपण लढलो का आपल्या डोळ्यादेखत भाजप मोठा होत गेला आपणापैकी किती जणांनी त्याची बाजू घेतली किंवा त्याला ठाम विरोध केला ? काळ रामाकडे आणि इस्लामिक राजवटीकडे सरकत असताना आपण विठ्ठलाच्या पायरीत नको तितके अडकून पडलो नाही काय ?मी माझ्या गझलांतून पारंपरिक धर्मांना कडक विरोध केला आहे आणि ठामपणे ईश्वर नाकारला आहे त्यामुळे मी हे म्हणू शकतो शाहबानो प्रकरणामुळे इस्लाम कट्टरतावाद समोरच अवतरत असताना आपण इस्लामला प्रश्नच विचारले नाहीत जे विचारणे गझलेतून सहज शक्य होते  माझ्या मराठी विशेषतः हिंदी गझलेतून मी असे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हे सांगतोय


उदाहरणार्थ
जग फाट्यावर मारता आले पाहिजे 
समाजाबाहेर वावरता आले पाहिजे 

ये फाडून पडदे म्हणू देत त्यांना

''पाहून पुरुष तुला बावरता आले पाहिजे ''  

किंवा 

ना दुःख आहे ना तुष्टी आहे 
मी नाही फक्त समष्टी आहे

ज्यांना गणपतीसारखे स्व विसर्जित करता आले

 ते सांगतात कि आज त्यांची संकष्टी आहे 

किंवा 

थोडे वेगळे थोडे चूकीचे अन बाकीचे रुटीन आहे 
इथे तिथे प्लेसलेले अवयव वेढणारी एकच स्कीन आहे 

कयामतदिवशी त्या अल्लाहशी माझी डेट जर फिक्स आहे 
कशास लांबड लांबवलेली आणि कोण मारते पीन आहे 

किंवा 

नही जाऊंगा हज  करने तेरे काबामें  मेरे दोस्त 
वहाँ के पत्थर मे खुदा है तो यहाँ के पत्थर मे खुदा नही है ?

उसके मर्जी के बगैर यहाँ पेड़ का पत्ता भी नही हिलता 
कुरानके पत्तेमे खुदा है तो आगमके किताबमे खुदा नहीं है ?

तू क्या समझेगा मेरी इबादत तू तो  मगन है ढकोसलो मे 
तेरी इबादत मे खुदा है और मेरी इबादत में खुदा नही है ?

मै नही पहनुँगा कोई बुरखा कोई हिजाब मेरी औरतको 
तेरी औरतमे खुदा है और मेरी औरतमे खुदा नहीं है ?

वो कोनसी है जगह जहाँमें जिस जगहमे खुदा नहीं है ?
तेरी हस्तीमे खुदा है मौजूद और मेरी वजूदमे खुदा नही है

तेरा पैगम्बर आखरी होगा मेरा पैगम्बर आखरी नही
तेरे कलके पैगम्बरमे खुदा है मेरे आजके पैगम्बरमे खुदा नही है ?


किंवा 
हर शख्स यहाँ अपनी शख्सीयत ढूँढ रहा है 
    अन्दरसे खोखला है  तो बाहर ढूँढ रहा है 

  जिन्दगी खुद यहाँ बिना मकसद चल रही है 
     इन्सानही उसके  चलनेका  मकसद ढूंढ रहा है 

 उसने कहाँ एक पेड़ भेजा उसने पूरा जंगल भेजा 
     तू फर्नीचरवाला है सरफेस ढूँढ़ रहा है 

 पयम्बरकी कोशीश थी  इन्सानियतको चेहरा मिले 
    और तू है कि मेरे हिजाबमे इस्लाम ढूँढ़ रहा है 

 मैं  सिर्फ खुदाकी  हूँ और किसीकी हूँ नही 
    तू क्यूँ शरीयतमें   मेरी इबादत ढूँढ़ रहा है 

. खुदा है थोड़ेही किसी किताबमें समां जायेगा  
   वो किताब के बाहर मुन्तजीर और तू किताबमे इंतजार कर रहा हैं

किंवा 
एका रावणवाद्याची गझल

मी उभा रावणाच्या बाजूने आहे 
रामायणात लिहिले जे  ते सर्व खोटे  आहे 

शूपर्णखा  खरोखरची प्रेमात होती 
प्रेम  कळणाऱ्यांनी  नाक कापले आहे 

रामाचा कोठे सीतेवरती विश्वास होता 
ती ढळणार नाही रावणाने  जाणले आहे 

हारले त्यांची सभ्यता वाईट होत जाते 
जे जिंकले आहे त्यांचे सर्व चांगले आहे 

तुम्ही जाळा  रावण लोकांच्या डोळ्यादेखत 
रामभक्तांनी नेहमीच लोकांस गंडवले आहे 

हारलो आहे तरी पुन्हा उभा राहीन मी 
जरी माझे अद्याप रक्त मेलेले  आहे 

वर्णण्यवस्था स्थिर करून राम मेला 
जे वर्णण्यवस्थेविरुध्द ते रामाविरुध्द ठाकले आहे 

 किंवा 

ये हिन्दू मुस्लिमोंके झगड़े मेरी समझमे नहीं आते 
ये दंगाफसाद और लफड़े मेरी समझमे नहीं आते 

तेरी किताब खुदाने पैदा की तो मेरी क्यां शैतानने की ?
किताबको लेकर हुए बखेड़े मेरी समझमे नहीं आते 

तू और मैं दंगा नही चाहते फिर दंगा चाहता हैं कौन 
तलवारके नोंकपे झमेले खड़े मेरी समझमे नहीं आते 

हम सब एकही खुदाके बन्दे हैं और  कुछ नहीं 
बाकी  दावे बड़े बड़े  मेरी समझमे नहीं आते 

किसने लिखा क्यूँ लिखा '' जाओ मजहबकेलिये मुफ्त मरो ''
एक किताबकेलिये जो हैं लड़े मेरी समझमे नहीं आते 

ईसाई ज्यु बौद्ध हिन्दू सब तो तुम्हारेलिये काफिर थे 
वे क्यूँ आगे गये  तुम पिछड़े मेरी समझमे नहीं आते 

किंवा 
खूबसूरतसा दिलासा देगा
वोभी आखिरमे धोखा देगा

किसके बहकावेमें फँसा तू
खुद उलझा वो क्या सुलझा देगा

उसे सचका पता नहीं
झूठोँका सिलसिला देगा

खुदाने तुझे क्या दिया
और ये फ़रिश्ताभी क्या देगा

जो अभी कुछ कर पाया हो
वो क्या क़यामतमें  सजा देगा
किंवा 
मैंने जो कुछभी कर्म किया उसका तुभी हिस्सेदार हैं 
या फिर तक़दीर तूने ना लिखी और मैं गुनाहगार हैं 

मुझे नहीं आना हैं तेरे आरपारके ढकोसलेमे 
तुंही अगर आर हैं तो तूही मेरा पार हैं 

या तो हर कोई प्रॉफेट हैं या कोईभी यहाँ प्रॉफेट नहीं 
तू बन्दोमे क्यूँ फर्क करेगा गर हर बन्दा तेरा व्यापार हैं 

 क्यूँ जाऊ किसी किताबके पास क्यूँ सुनु मैं किसी पंडितकी 
जहाँ जाऊ वहाँ तू गाईड आखिर तेरा सारा सँसार हैं 

मैं नहीं मानता कोई शरीयत मैं नही मानता कोई बादशाह 
जहाँ जाऊ वहाँ तेरा किंगडम जो भी हैं तेरा कारोबार हैं 

श्रीधऱने  तो ईश्वरके अलावा किसी चीजको माना नहीँ 
फिर कैसे वो काफिर हुआ  फिर कैसे वो गुनाहगार हैं 
किंवा 
 इंसानपे भरोसा करनेकेसीवा तेरे पास कोई चारा नहीं 
यकीन कर तू इस जमींपे कोई  अब रहता खुदा नहीं 

असो 

१९ व्या शतकात दाग अथवा गालिब जेवढे  क्रांतिकारक होते  तेवढेही आपण झालो नाही मग आपण गमज्या कशाच्या मारतोय ? सुफियानामुळे इस्लाम सौम्य होईल ही मध्ययुगीन आशाच आपण अडाणीपणाने गिरवत बसलो नाही काय ? कवींची एक सामाजिक जबाबदारी असते असे मी मानतो ती जबाबदारी कुणी लादलेली असत नाही तर त्याच्या संवेदनशीलतेची ती अपरिहार्य परिणीती असते आपण ही जबाबदारी निभावली काय ?

जातीवाद  हाही ह्या कालखंडात पोलिटिकल व्होटिंग बँकेच्या परिणामस्वरूपी अवतरला पुढे मंडल आयोगामुळे ह्या कालखंडानंतर तो मुख्य झाला ऎशोत्तर वा  नव्वोदत्तर गझलेत तो कितपत आला ? आपण फार भाबडे तर झालेलो नाही ना ? कि कवी म्हणून आपण साफ साफ च्यु आहोत ?

गझलेत कालखंडाचा विचारच होत नाहीये म्हणून मी माझे म्हणणे इथे मांडतोय गझलेची समीक्षा हीही अनेकदा रोमँटिसिझमपुढे दम तोडते हा माझा अनुभव आहे म्हणून हे लिहितो आहे बाकी ज्याची त्याची मर्जी ज्याची त्याची गझल !

श्रीधर तिळवे नाईक 











Thursday, August 16, 2018

अटलजी गेले हिंदुत्ववादाचा विवेक गेला कट्टरतेची सारासारबुद्धी गेली वैदिक संस्कृतीचा उदारमतवाद गेला यज्ञ संस्कृतीतील दुर्मिळ ऋजुता गेली

ते जिथे उभे होते ती जागा निंदेने भरलेली जागा होती ही सारी निंदा त्यांनी आयुष्यभर वैभवासारखी मिरवली तुम्ही चुकीच्या पार्टीत आहात असे लोक म्हणू लागल्यावर तुमचा चष्मा चुकीचा आहे हे सांगायला त्यांनी कमी केले नाही ते मवाळ पाण्यासारखे होते पण भली भली धरणं फोडायची ताकत त्यांच्यात होती आणि शेवटी त्यांनी काँग्रेसचे धरणही फोडले . हिंदुत्ववादावर त्यांची अविचल निष्ठा होती ह्या निष्ठेनेच शेवटी त्यांना पंतप्रधान पदापर्यंत पोहचवले ते उत्तम आणि शालीन वक्ते होते त्यांचे भाषणातील दीर्घ विराम त्यांच्या व्यक्तिमत्वातील ठहराव अधोरेखित करत होते हा माणूस अभिजात संस्कृतीला दरवळ पुरवतो ह्याची त्यांना पाहिले तरी खात्री पटत असे .

त्यांना माझी मनापासून आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 

Friday, August 3, 2018

विज्ञान आणि गझल


न्यू कॉलेज मध्ये जे काही लोक हिरो वाटत त्यातील एक स्टीफन हॉकिंग्ज ह्या गझला  त्या काळात लिहिल्या त्यामुळे त्याकाळातील त्याच्या सिद्धांताची पाठराखण ह्यात आहे पुढे १९९० नंतर त्याने त्याची काही मते बदलली त्यामुळे ह्या गझला कालबाह्य आहेत हे मान्य आहे पण लिहून ठेवल्या होत्या म्हणून प्रकाशित करतोय इतकेच त्यावेळी jane wild बरोबरचा त्याचा विवाह तुटला न्हवता उलट तो प्रेमाचा प्रतीक होता त्यामुळे चार नंबरचा शेर आहे
स्टिफन हॉकिंगका स्वगत

Physically unable physicsially most Able
पता नहीं कहाँसे आयी ह्यूमन ब्रेनमे यूनिवर्सल केबल

I always used to stand in front of black holes
 उसने क्यों निगला नहीं मेरा डाला हुआ टेबल

Theoretically try my best to theorize everything
मल्टीयुनिवर्सेसमे  बैठके चला पता नहीं कुछ भी सिंपल

 मैंने पाँवोंसे कुछ नहीं किया जो किया वो दिमाग से किया
Let me assure my romance never was once dull

Geometrically i assure there was that bigbang
फिजिक्सीअली पता चला बायोलॉजिकली क्या सूटेबल

I know I'm today scientific celebrity but
व्हॉट विल रिमेन मेरे पीछे एसेंशियल और एटरनल
=======================================================
बीग बॅगचा अथांग पसरलेला पसारा 
खाऊन टाकेल मला हा साराचा   सारा 

मी देवापुढे नाही ब्रह्मांडापुढे झुकतो 
ते नाचणारा मोर मी झडणारा पिसारा 

पूर्वी त्याला पाहून मला यायची भोवळ  
माझ्यापुढे आता जो फाटतोय टरारा 

कुठलाच प्रकाश मला नाही  दिपवत आता  
जो आज आहे तारा तो उद्याचा वारा 

दुर्बीण इथेच सोड तू आधी पाहून घे 

आरोग्य शिक्षण आणि  अन्न वस्त्र निवारा 

ह्यातील पहिल्या गझलमुळे  माझ्या मनात अनेक वादळे आहेत ती म्हणजे वैज्ञानिक सत्याच्या आधारे गझल लिहाव्यात कि नाही वैज्ञानिक सत्य कालबाह्य झाले म्हणजे त्यावरचे साहित्य वा काव्य कालबाह्य होते का  विशेषतः पहिल्या गझलेमुळे ?

ह्यातील तिसरी गझल ही वैज्ञानिक काळ्या सत्यातही पॉझिटिव्हिझम टिकवणारा भाव प्रकट करते म्हणून ती देतो 


काय झाले आयुष्य योगायोग नि  अपघात आहे 
त्याला सुंदर बनवणे माणसाच्या हातात आहे 

मान्य कि निरर्थकतेचा भोवरा वेटाळुन टाकतो 
सार्थ पण करण्याचा चॉईस  आपल्या हातात आहे 


कितीदा का निर्माण असेल झाले पूर्वी  ब्रह्माण्ड 
आत्ताचे हे ब्रह्माण्ड माझे हरकत काय मानण्यात आहे 

बुडबुडे कुणाच्या नाही येत खोलवर पोकळीतून 
पण मजा बुडबुड्यांचे फुटबॉल खेळवण्यात आहे 

कधीतरी कुठलेतरी कृष्णविवर गिळणारच 

पण माज ह्या  गिळण्याचे गणित मांडण्यात आहे 

मला वाटते स्टीफन हॉकिंगचाच न्हवे तर माणसाचाच हा जो कृष्णविवरांपुढे गणित घेऊन उभे राहण्याचा जो माज आहे त्यातच त्याचा गौरव आहे तुम्हाला काय वाटतं ?

श्रीधर तिळवे नाईक