माझ्या आयुष्यातील स्त्रियांनी नेहमीच त्यांच्यावर लिहिलेल्या कविता प्रकाशित करण्यासंदर्भात माझ्याकडून वचने मागितली आणि मी ती दिली आणि पाळलीही . उज्वला उर्फ उजू ह्याला अपवाद नाही . तिच्यावर थेटपणे लिहिलेल्या कविता तिच्या हयातीत मी प्रकाशित करणार नाही हे माझे वचन होते आणि ते मी पाळले ज्या कविता थेट तिच्यावर न्हवत्या त्या मात्र मी छापल्या ज्ञ बाबतही तिची चाळिशी होत नाही तोवर मी थेट कविता प्रकाशित करणार नाही असे वचन दिले होते ते मी पाळले . तिनेही हयातभर असेच वचन मागितले होते पण ते पाळायला मी ठाम नकार दिला होता आणि तडजोड चाळीशीवर झाली होती . भारतीय समाजाचा स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन बघता ही वचने सहज आणि स्वाभाविक होती . मी इथे उजूवरच्या कविता क्रोनोलॉजिकली देतोय कारण बहीण भावाची रिलेशनशिप कशी सुरु होत कुठवर कशी पोहचली हे स्पष्ट कळावे . हा नात्याचा उपसा गुंतागुंतीचा आहे आणि त्याकडे कसे पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . ह्या प्रश्नात डोकावण्याची माझी इच्छा नाही .
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment