Monday, October 10, 2016

प्रवीण दवणे कविता महाजनांच्या पासंगालाही पुरत नाहीत  

Monday, October 3, 2016

ओ पी नय्यर मेरे सबसे फेवरिट संगीतकार!  मैंने मराठीमें उनपे एक कविताभी लिखी थी जो मेरे कवितासंग्रह स्त्रीवाहिनीमे प्रकाशितभी हो चूँकी हैं |  ये भी सोचा था कि मरनेसे पहले लाइफमें कभी ना कभी उन्हें कुछ ना कुछ अर्पित करके ट्रिब्यूट दूंगा | मगर लाइफमे कभी ये नहीं सोचा था कि संगीतकार बनके ट्रिब्यूट दूंगा  | कल एक गाना एज अ ट्रिब्यूट रेकॉर्ड करने जा रहा हूँ | ओ पी जी आपकी यादमे आपकी प्रतिभाको एक कड़क सैल्यूट !

Saturday, October 1, 2016

मी यूद्धविरोधी आहे पण संरक्षणासाठी कधी कधी ते करावे लागते ह्याला पर्याय नसतो ही प्रतिकारवाई आवश्यक होती सैन्याचे अभिनंदन
***********************************************************************

तुम्ही अस्सल आहात त्यामुळे लिहीत रहाल . लघवी लागते तसं आहे हो हे. पर्याय रहातच नाही . मेंदूच्या चड्डीत किती काळ ओल करणार . शेवटी चड्डी काढून कागदावर वा  वेबपेजवर .
****************************************************************************


Tuesday, September 27, 2016

मोर्चा श्रीधर तिळवे 



एक सिंग्युलॅरिटीचा अवाढव्य भास
तलवारीसारखा रस्त्यावरून चालत

स्क्रिनवर युद्धसदृष्य शांतता पेश करत

वाहिन्यांची नाकं बंद झालेत
त्यांच्या नाकातून नाकाबंदीचे रक्त येतंय

अनपेक्षित नॉकॉउटने सर्व हैराण झालेत

हा लाव्हा कुणी तयार केला
ह्या ज्वालामुखीची बीजे  कुणी पेरली

शेतीला आग लागल्यानंतरही पेरणारे हात इतके जिवंत ?

ज्यांनी त्यांना देशोधडीला लावले त्यांना त्यांचे शांतपणे चालणेही
धमकी वाटू लागलीये

मागण्या चुकीच्या कि बरोबर हे ठरवता येत नाहीये

हा मोर्चा पोस्टमॉडर्न म्हणावा का मग ?

कि हा जागतिकीकरणामुळे हवालदिल झालेल्यांचा
पोस्टपोस्टमॉडर्न मोर्चा आहे ?

कि सतराव्या शतकानंतर नव्याने आलेली ही जाग आहे ?

हातात तलवारी नाहीत
पण प्रत्येकजण योद्धा आहे

ह्यांना जातीयवादी म्हणावे का मग ?

ही जात आहे कि जनता आहे ?

जंतूंना ठरवता येत नाहीये

एक जंगली अस्वस्थता आहे
जी रस्त्यारस्त्यावर माणुसकी लिहीत चाललीये
आणि माणसांना ह्या माणुसकीचे काय करायचे
ते कळत नाहीये

श्रीधर तिळवे नाईक 

मोर्चा २ श्रीधर तिळवे नाईक 
मोर्चा सिम्युलेट होतोय 
मोर्चा रिक्लोन होतोय 

मोर्चा इंटरनेटसारखा ग्राहक वाढवत चाललाय 

मोर्चा तत्सम होतोय तद्भव होतोय अपभ्रंश होतोय 

इट माइट बी गेम फ्रॉम बारामती 
मती मारली गेल्याने हा सातबारा रस्त्यावर आलाय 
हा महाराष्ट्राच्या पुरोगामी समाजकारणात प्रतिगामी हस्तक्षेप आहे 

मुलगी मेलीये आणि रडतीये स्वतःच्या प्रेतात 

हे सगळं तिच्यातून निघालंय ह्यावर तिचा  विश्वास बसत नाहीये 

ती अतोनात दुःखी आहे 

जखमा सुजलेत 
रक्त वळून खड झालंय 
आणि त्या खडीवरून मोर्चा चाललाय 

नराधम माहीत आहेत 
पण ती  मेल्याने ती त्यांचे काहीच करू शकत नाहीये 
ती प्रेतात बसून रडतीये 

हा मोर्चा तिचा शोक आहे का ?

तिने ऍट्रॉसिटी कायदा वाचलेला नाहीये 
तिला फेबु दलित माहीत नाहीत 
तिला फेबु मराठा माहीत नाहीत  

तिला खुंखारतेचा माइक्रोहार्ड माहित आहे 
निर्लज्ज पुरुषप्रधानतेचा टोकदार पाशवीपणा माहीत आहे 

हा मोर्चा त्या पुरुषप्रधानतेच्या दारी का जात नाहीये 
कि आपल्यासाठी चाललेला हा सविनय आक्रोश आहे ?

तिला प्रेतात बसूनही गुंतागुंत कळत नाहीये 

मोर्चे इतके गुंतागुंतीचे का होतायत 
कि नवा समाज नीट असेम्ब्ल न झाल्याचे हे लक्षण आहे ?
कि समाज कायमच चिरफाळी असतो ?

अट्रोसिटीची चायनीज वॉल शोक करतीये 
तिला आपण संरक्षक असल्याचा अभिमान होता 
त्याला छेद गेलाय 

ती विचार  करतीये 
परिवर्तन म्हणजे काय ?
कालच्या शोषितांना उद्याचे शोषक बनण्याची संधी ?

मुलीला भिंतीसमोर 
आणि भिंतीला मुलीसमोर उभं केलं गेलंय 
आणि भिंत आणि मुलगी 
एकमेकासमोर ठाकल्यासारख्या दिसतायत  

दोघीही शोक करतायत 
आणि आपले  अश्रू राजकीय होतील ह्या भयाने अवघडतायत 

बलात्कारात आरक्षण रीमिक्स होतंय 
आरक्षणात शेती रिमिक्स होतीये 
शेतीत पावसाळा रिमिक्स होतोय 
पावसाळ्यात समाजव्यवस्था रिमिक्स होतीये 
समाजव्यवस्थेत ब्रेकिंग न्यूज रिमिक्स होतीये 

आणि मोर्चा मिक्सर घुसळत घुसळत रिसिम्युलेट होतोय 

शासक वाट पाहतायत एका नव्या ब्रेकिंग न्यूजची 
माध्यमे वाट पाहतायत एका फ्रेश ब्रेकिंग न्यूजची 
जी मोर्चा नाहीशी करेल 
आणि फक्त रस्त्यापुरता उरवेल 

सर्वांनाच माहित आहे 
मोर्चा एक दिवस 
थकून घरी परतणार आहे 

श्रीधर तिळवे नाईक 


Monday, September 26, 2016

माझे डोळे फार लवकर उघडण्याचे कारण मी साठोत्तरी पिढी आमच्यापर्यंत पोहचण्याची वाट पाहिली नाही . चंद्रशेखर जहागीरदारांसारख्या लोकांच्याकडून मटेरियल मिळवले त्याने ताकदही कळाली आणि मग मर्यादाही लवकरच स्पष्ट झाल्या त्यामुळेच चौथ्या नव्तेचे बंड उभा करता आले . झिंग हवी . जी भाषा आणावीशी वाटते ती दुसरा कुणी आणेल म्हणून वाट पाहू नका . तुम्ही स्वतःच आणा .

मुख्य म्हणजे साठोत्तरी आणि नव्व्दोत्तरी दोघांनाही फाट्यावर मारा

गालिब तुकाराम आत्ता लिहताना रिलेव्हन्ट ही रोमँटिक कल्पना आहे . आदिवासी कलेकडे अथवा तुकारामाकडे मी आत्ता बघत असतो . हनुमानचालिसानेही आत्ताच्या लोकांना उतारा पडतोच पण ती अंधश्रद्धा आहे हे कळायला तुम्ही किमान रॅशनल असावे लागता . कालातीत आपल्या हातात नसते असतो तो आत्ताचा क्षण . तो पकडता आला पाहिजे आणि त्या पकडण्याचा मार्गातला सर्वात मोठा अडथळा गालिब तुकाराम साठोत्तरी आणि नव्व्दोत्तरी असतात . काहींना हे कळते काहींना आयुष्यभर लिहूनही कळत नाही 
 अनेक पीएचड्या धूळ खात पडलेत अनेक भाषिक मासिकांतून अनेक लेख आलेत . वस्तुस्थिती अशी आहे कि साहित्यिकांनी काहीही वाचलेले नसते . नुसती टिवटिव करण्यात सगळे मास्टर झालेत . प्रश्न उलटा आहे . साहित्यिक  कधी अकॅडेमिक पर्यंत पोहचणार आणि कधी ह्या पिएचडया प्रकाशित होणार ?

Friday, September 23, 2016

सन्त तुकारामांनी त्यांच्या अवघ्या वीस वर्षाच्या लेखकीय कारकिर्दीत ४००० अभंग लिहीले , म्हणजे साधारण दोन दिवसाला एक . आत्ताच्या काही तथाकथित अल्पप्रसववादी कवी व समीक्षकांनीं त्यांना केवळ ह्या एका मुद्द्यावरून मोडीत काढले असते. अल्पप्रसववाद्यांनो हा मूर्खपणा थांबवा  

Monday, September 12, 2016

कवितांचे वर्गीकरण करतांना सर्वात मोठा प्रॉब्लेम संक्रमणात्मक कालखंडातल्या कविता वर्गीकृत करताना येतो क .  व्ही . २ हा काव्यसंग्रह चॅनेल सिरीज मध्ये टाकावा कि नेट सिरीजमध्ये टाकावा हा प्रश्न सुटता सुटत नाहीये हीच गोष्ट चॅनेल वर्ड्स बाबत ह्यातील काही कविता ह्या नंतरच्या कालखंडातल्या असल्याने त्या कुठे टाकाव्यात हा प्रश्न वारंवार येतोय आणखी एक गोष्ट साफ दिसतीये आयुष्य शिफ्ट झालंय तशी स्पष्टता अधिक आहे म्हणजे मुंबईत १९८९ साली दाखल झाल्यावर लिहलेल्या कविता स्पष्टपणे चॅनेल सिरीजमध्ये टाकता येतात हीच गोष्ट नेट सिरींजबाबत . चित्रपटसृष्टीत बॉलीवूडमध्ये  २००९ - १० मध्ये फूलटाइमर म्हणून दाखल झाल्यावर लिहलेल्या कविता स्पष्टपणे नेट सिरीजमध्ये टाकता येतात नंतर अपघात झाल्यानंतर फूल टाइमर बेडरिडन झाल्यानंतर लिहिलेल्या कविता स्पष्टपणे निर्वाण सिरीजमध्ये टाकता येतात . पण जिथे संक्रमण आहे तिथे गोंधळ सुरु होतो . माझा जोशी कि कांबळे ह्या चित्रपटाचा दौर आणि सोशल नेट्वर्कसचा दौर एकच आहे आणि ह्या कालखंडातल्या कविता गोंधळ उडवतात . हा गोंधळ शेवटी थीमॅटीकतेचा आश्रय घेऊन सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे अपवादात्मक काहीवेळा अजिबोगरीब गोष्टीही घडलेल्या आहेत म्हणजे चॅनेल निर्वस्तु मधल्या निर्वस्तुवादी कविता ह्या १९८७ ते १९९३ ह्या कालखंडातल्या आहेत आणि त्यातील काही कविता सौष्ठव आणि नंतर अभिधात होत्या पण अरुण कोलटकरांच्या मृत्यूनंतर लिहलेली कविता चक्क निर्वस्तुवादी आहे हे ती लिहिल्यानंतर माझ्या लक्ष्यात आले आणि ती ह्याच संग्रहात ठेवावी लागली . असो . थोडक्यात वर्गीकरणाशी झगडतोय .


Saturday, September 10, 2016

प्रज्ञा , हा लेख १९९९ चा आहे आणि तो नंतर परममित्र मध्ये प्रकाशित झाला होता . भुजंगच्या मर्यादा पुढे अधिक स्पष्ट होत गेल्या आणि अरुणच्याही ! अरुण काळे  ढसाळांच्या संवेदनशीलतेने जागतिकीकरणाला सामोरा
जाणारा कवी आहे आणि ह्या गोष्टीने त्याला ताकद दिली आणि मर्यादाही ! असो . 

Friday, September 9, 2016

Wednesday, September 7, 2016

Sunday, July 31, 2016

माझी ह्या वर्षी  मुख्य कला संगीत व्हावी  हे तसे चमत्कारिक  आहे . हे वेड कितीकाळ   टिकते ते काळच ठरवेल . 

Thursday, March 3, 2016

मेरी जिन्दगीका चेहरा छीन लिया इस सिस्टिमने
मैंभी दिख रहा हूँ इस सिसटीमके मौत जैसा ।
श्रीधर तिळवे

Wednesday, February 24, 2016

मला माझी योग्यता नीट माहीत आहे . तुम्हाला माझी पात्रता ठरवता नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे .
श्रीधर तिळवे 
मी एखाद्या issue विषयी लिहित नाही ह्याचा अर्थ मी त्या issue विषयी संवेदनशील नाही  असा होत नाही
. त्याचा खरा अर्थ इतकाच असतो कि मला त्याविषयी स्पष्ट आणि स्वच्छ् आकलन झालेले नाही . अचूक आकलन हा फार नंतरचा प्रश्न आहे .
श्रीधर तिळवे 

Friday, February 12, 2016

माझ्या आयुष्यात मी काही गोष्टी निखळ मित्रप्रेमासाठी केल्या त्यातील एक म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या थिएटर ऑफ़ आर्ट्समध्ये हिंदीतुन दिलेली व्याख्याने ! मंगेश बन्सोड हा माझा जानी दोस्त इन चार्ज डायरेक्टर झाल्यावर करुया करुया म्हणून लाम्बलेले हे गाड शेवटी ८ फेब्रु ला मार्गी लागले . प्राध्यापक गिरीचा मला विलक्षण कंटाळा त्यामुळे आयुष्यात प्राध्यापक झालो नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी चक्क हा प्रकार एन्जॉय केला मजा आया प्ले एनालिसिस (४ )आणि अंडरस्टैंडिंग ऑफ़ थिएटर (३ )ह्या दोन संदर्भातील ही ७ व्याख्याने ! प्रत्येक  व्याख्यान दीड तासाचे पण विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे त्यातील काही अडीच तासापर्यंत गेली . श्रेय अर्थातच मंगेशच्या संघटनकौशल्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना . मंगेश काहीतरी नवे उभारू इच्छितोय  त्याला शुभेच्छा !
श्रीधर तिळवे 

Sunday, January 31, 2016

काही महनीय लोकांनी मला एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार आणि डेकॅथलॉन  सिरीजमधल्या कविता संग्रहरुपात आणण्याची सूचना केली आहे . त्यांच्या आस्थेबद्दल आभार . ह्या कविता जुन्या असल्याने ( १९८२ ते १९८७ )आणि त्या कालबाह्य झालेत अशी माझी धारणा असल्याने त्या काढाव्यात कि नाही ह्याची मला कायमच शंका वाटत असते . ह्या सर्व कविता देशीवादी नसल्या तरी निश्चितपणे देशी आणि पोटी आहेत . काहींना तर postmodern ह्या कॅटेगरीत सहज टाकता येईल . काही poststructuralism ह्या कॅटेगरीत सहज बसतील . मी स्वत : चौथ्या नवतेची संकल्पना मांडून ह्या प्रकारची कविता outdated झालीये अशी मांडणी करत आलोय . त्या पार्श्वभूमीवर ह्या कविता प्रकाशित कराव्यात  कि नाही हा प्रश्न मला कायमच पडत आलाय . तरीही मग ह्या कविता मी  नेटवर   का प्रकाशित / जालीत करतोय ? कारणे अनेक आहेत त्यातील तीन पुढीलप्रमाणे
१ लेखकाचे सर्वच लिखित प्रकाशित/ जालीत  झाले पाहिजे अशी माझी धारणा आहे त्यावरून त्याचा प्रवास कसा झाला ते कळते
२ ह्या कविता १९८२  ते १९८७  ह्या काळातील कोल्हापूर शहराचे आणि गावाचे  प्रोजेक्शन करतात असे मला वाटते .  आणि समाजशास्त्रीय पातळीवर हे महत्वाचे आहे
३ त्या काळातील श्रीधर तिळवेचेही हे प्रोजेक्शन आहे .

ह्या शिवायचे सर्वात महत्वाचे पण वाङ्मयबाह्य कारण माझ्या वडिलांना " मी माझे सर्व क्रिएटिव काम प्रकाशित करेन  " असे मी दिलेले वचन !ते सांगावे कि न सांगावे ह्याबाबत कायमच मी संभ्रमात असायचो पण आता सर्वच फिटल्याने सांगतो आहे

 माझे स्वत :चे एक मत असेही आहे कि योग्यता ही अंगभूत असते पण पात्रता मात्र समाज ठरवतो . त्यामुळे  ह्या कविता चांगल्या आहेत कि वाईट हे मराठी संस्कृतीने आणि समाजाने ठरवायचे आहे . कवींनी आणि कलावंतांनी आपल्या योग्यतेची फिकीर करावी ती वाढवावी पात्रतेच्या सांस्कृतिक ठेकेदारांना शरण जाऊ नये वेळप्रसंगी फाट्यावर मारावे . पात्रतेची फिकीर मी आयुष्यात कधीच केली नाही योग्यता मात्र कायमच वाढवत राहण्याची फिकीर केली ह्याही कवितात ती आहेच .
श्रीधर तिळवे - नाईक  

Monday, January 18, 2016

माधुरी  पटवर्धन गेली !श्रीधर तिळवे नाईक

 माधुरी  पटवर्धन गेली !एका अत्यंत सॉफ्ट  नजाकतिचा अंत झाला . ती वाढली एका मध्यमवर्गीय संस्कारात आणि मी आझाद चौकाच्या शिव्याबाज मारामारीप्रविण वातावरणात  जन्मलेलो आणि वाढलेलो  ! त्यामुळे आमच्या पहिल्या भेटीत थोडा ताण होता पण हा ताण नंतर निवळला .  मी , भूषण गगराणी , सुनील मोदी आणि संगीता कुलकर्णी अशा आम्हा चौघांची कोल्हापूरकर  महाविद्यालयीन वक्त्यांविद्यार्थ्यांची एक गैंग होती . ह्या चौघांच्यात सर्वात वाईट वक्ता मी होतो पण कधीकधी मटका लागून मला पारितोषिक मिळायचे . ह्यात माधुरी उशिरा आली . अत्यंत शुद्ध मराठी बोलणे आणि किणकिणारा असा तिचा स्वर आणि अत्यंत सोज्वळ असा तिचा चेहरा कायम एवरग्रीन राहणार असा वाटायचा . तिचे डोळे अतिशय सुंदर आणि मातृळू होते . मी तिला एकदा म्हणालो होतो तू फार चांगली आई होणार . तिच्या  हालचालीत एक शालीन सोंदर्य होते .  ती फार सेन्सिटिव होती त्यामुळे माझ्या एका मित्राने तिच्याशी कमी बोल उगाच तुझा बेधडक दे धडक कार्यक्रम राबवू नकोस असा सल्ला दिल्याने मी तिच्याशी कमी आणि अंगात नसलेला आब राखून  बोलायचो . ती बुद्धिमान होती पण कारण नसताना तिला आपण आवश्यक तेवढे बुद्धिमान नाही आहोत असे वाटायचे . ती मनाने एकदम उमदी होती आणि त्या काळात उदासही . तिचे कसे होणार असा प्रश्न मला पडायचा आणि मग माझा शाळासोबती सचिन भानुशाली तिच्या आयुष्यात आला आणि सगळ्या काळज्या संपल्या . त्यानंतर तिच्याविषयीच्या फक्त बातम्या येत राहिल्या . मी कोल्हापुरात ह्या काळात पत्रा - साधना म्हणजे तापलेल्या पत्र्यावर शवासन घालून  प्राणायाम आणि ध्यान करणे सुरु केल्याने ह्या गॅंगपासून हळूहळू  दूर सरकत गेलो त्यात माधुरी सह सर्वच दूर गेले
आणि अचानक आता बातमी आली ती तिच्या जाण्याची ! तिचे हे आकस्मिक जाणे हेलावणारे आहे . तिच्या जाण्याने कोल्हापूरशी असलेला माझा एक  सॉफ्ट धागा कायमचा  निखळला .

श्रीधर तिळवे नाईक 

Sunday, January 17, 2016

चपराक : श्रीधर तिळवे नाईक 
मी चपराकचा एकही अंक वाचलेला नाही ही माझी मर्यादा प्रथम कबूल करतो . मात्र तरीही चपराकबाबत जे काही झाले ते निषेधार्ह आहे . एखाद्या अंकातील मते तुम्हाला मान्य नसतील तर त्याचा प्रतिवाद तुम्ही विचारांनीच केला पाहिजे अंक दादागिरीने उचलून न्हवे . त्यामुळे ह्या घटनेचा मी जाहीररीत्या तीव्र निषेध करतो आहे . 

Sunday, January 10, 2016