कवितांचे वर्गीकरण करतांना सर्वात मोठा प्रॉब्लेम संक्रमणात्मक कालखंडातल्या कविता वर्गीकृत करताना येतो क . व्ही . २ हा काव्यसंग्रह चॅनेल सिरीज मध्ये टाकावा कि नेट सिरीजमध्ये टाकावा हा प्रश्न सुटता सुटत नाहीये हीच गोष्ट चॅनेल वर्ड्स बाबत ह्यातील काही कविता ह्या नंतरच्या कालखंडातल्या असल्याने त्या कुठे टाकाव्यात हा प्रश्न वारंवार येतोय आणखी एक गोष्ट साफ दिसतीये आयुष्य शिफ्ट झालंय तशी स्पष्टता अधिक आहे म्हणजे मुंबईत १९८९ साली दाखल झाल्यावर लिहलेल्या कविता स्पष्टपणे चॅनेल सिरीजमध्ये टाकता येतात हीच गोष्ट नेट सिरींजबाबत . चित्रपटसृष्टीत बॉलीवूडमध्ये २००९ - १० मध्ये फूलटाइमर म्हणून दाखल झाल्यावर लिहलेल्या कविता स्पष्टपणे नेट सिरीजमध्ये टाकता येतात नंतर अपघात झाल्यानंतर फूल टाइमर बेडरिडन झाल्यानंतर लिहिलेल्या कविता स्पष्टपणे निर्वाण सिरीजमध्ये टाकता येतात . पण जिथे संक्रमण आहे तिथे गोंधळ सुरु होतो . माझा जोशी कि कांबळे ह्या चित्रपटाचा दौर आणि सोशल नेट्वर्कसचा दौर एकच आहे आणि ह्या कालखंडातल्या कविता गोंधळ उडवतात . हा गोंधळ शेवटी थीमॅटीकतेचा आश्रय घेऊन सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे अपवादात्मक काहीवेळा अजिबोगरीब गोष्टीही घडलेल्या आहेत म्हणजे चॅनेल निर्वस्तु मधल्या निर्वस्तुवादी कविता ह्या १९८७ ते १९९३ ह्या कालखंडातल्या आहेत आणि त्यातील काही कविता सौष्ठव आणि नंतर अभिधात होत्या पण अरुण कोलटकरांच्या मृत्यूनंतर लिहलेली कविता चक्क निर्वस्तुवादी आहे हे ती लिहिल्यानंतर माझ्या लक्ष्यात आले आणि ती ह्याच संग्रहात ठेवावी लागली . असो . थोडक्यात वर्गीकरणाशी झगडतोय .
Monday, September 12, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment