Showing posts with label ग़ज़ल. Show all posts
Showing posts with label ग़ज़ल. Show all posts

Saturday, July 4, 2015

ग़ज़ल 

४ दे यार और 
दे यारा  और भी दे गम मुझे सहनेकेलिये 
काफी नहीं हैं लहू दिलका  गममे तेरे बहनेकेलिये १

दिल  वो मुकाम हैं जहाँ  हर कोई  भटका  अटका 
बादमें  मिलते हैं बहोत मकान रह्नेकेलिये २

बहोत कुछ गिराना होगा श्रीधर  मोहब्बतकेलिये 
सिर्फ दिमाग काफी नहीं तेरा ढहनेकेलिये ३ 

बहोत कुछ भेंज दिया ताकि वो इश्कको समझे 
लाशतक बची नहीं हैं उन्हें कुछ कहनेकेलिये ४ 

इश्क़ मेरा समझ न आया न आया ना सही 
जुनूनमें दिया डायमंड तेरे काम आया गह्नेकेलिये ५ 

Thursday, June 4, 2015

पुन्हा एकदा ग़ज़ल /श्रीधर तिळवे 

काल मी माझ्या काहीश्या अडगळीत पडलेल्या ४ मुक्त गझला मुद्दामच ब्लॉगर व फेसबुकवर टाकल्या . 

गझल हा माझा एक आवडीचा काव्य प्रकार आहे कारण तो माझ्या मनाच्या  फार जवळ आहे . ह्यामागचे कारण स्पष्ट आहे . माझ्या आयुष्यात वाचलेला पहिला काव्यसंग्रह हा दिवान ए गालिब होता . साहजिकच कवितेशी  माझे असलेले नाते हे गझलेपासून सुरु झाले होते . गालीबनंतर मीर जोश इक़्बाल साहीर जोनिस्सार अख्तर मजरूह विंदा करंदीकर असा फडशा पाडत मी काही काळ गझलेचा नादखुळा झालो . 

गझल जन्मली ती विश्वीय संवेदनशीलता पोटात घेवून ! मीर मध्ये त्याचे पडसाद आहेत पण भारतात तिचा जबराट अविष्कार दिसतो तो सृष्टीय संवेदनशीलतेत !  स्वच्छन्दवाद वास्तववाद  आणि परिवर्तनवाद  हे सृष्टीय संवेदनशीलतेचे तीन  महत्वाचे  आयाम !धर्माशी बांधल्या गेलेल्या मानवी भावभावनांना स्वछन्दवाद मुक्त करतो आणि भावनांची तीव्रता हा अपराध न मानता त्यांना उघड उघड मनमोकळेपणाने समाजाची कसलीही पर्वा न करता मांडतो . गझल ही ह्या भावनिक तीव्रतेची महाराणी आहे आणि गालिब हा तिचा बादशहा आहे . साहजिकच गालिब तुमची पाठ सोडत नाही . अकबराने पारंपारिक मुस्लीम धर्म धुडकावून ह्या स्वछन्दवादाची सुरवात केली . (खरा  रोमांटिक  ग्रेस दाखवतात तशी अनारकली नव्हती किंवा सलीम नव्हता तर खुद्द अकबर होता फिल्मी भाकड कथावर विश्वास ठेवल्याबद्दल आपण ग्रेस ह्यांना माफ करणेच योग्य कारण भावनेच्या भरात होण्याऱ्या चुका स्वछन्दवादात माफ करायच्या असतात  ) आणि त्यातून निर्माण झालेली शोकांतीकाही सोसली . गालिब हा गझलेतील  अकबर आहे . मराठीत तुकाराम हे इतके मोठे प्रकरण होऊन गेले कि त्यानंतर गालिब निर्माण होणे अशक्यच होते साहजिकच मराठीत स्वच्छ न्दवादी गझल माधव ज्युलियनाच्या रूपाने फक्त ओळखरुपात आली . ह्यानंतर मराठीत निर्माण व्हायला हवा होता असा एक कवी जो स्वच्छन्दवाद,  वास्तववाद आणि परिवर्तनवाद ह्या सर्वांचा एकत्रित सृष्टीय अविष्कार गझलेत करेल . पण मराठीत निर्माण झाला तो गझलेला थेट प्रतिसृष्टीत प्रवेश मिळवून देणारा कवी माधव ज्युलियनाचा शिष्य - विंदा करंदीकर . विंदानी मराठीला ''मुक्त गझल '' दिली . माझ्या १९८२ ते ८७ ह्या कालखंडात लिहलेल्या देकॅथलोन मधल्या  गझला ( मराठी ९२ व हिंदी  ८७ ) ह्या विंदांच्या मुक्त गझला पुढे न्हेण्याचा प्रयत्न होता (तो यशस्वी झाला कि नाही हे इतरांनी ठरवायचे आहे ) दुर्देवाने मराठीत प्रतीसृष्टीय गझलेच्या कुळाला फारसे अनुयायी लाभले नाहीत . ह्यामागचे कारण  होते  विन्दानंतर आलेली आणि सृष्टीयतेच्या अंगाने जाणारी देशीवादी मराठीवादी सुरेश भटांची देशी गझल . ह्या गझलेत  स्वच्छन्दवाद वास्तववाद  आणि परिवर्तनवाद  हे सृष्टीय संवेदनशीलतेचे तीन महत्वाचे  आयाम ओतप्रोत भरलेले होते . नेमाडेंनी जश्या वास्तव वादी कादम्बऱ्या लिहून मराठी कादंबरी मागे न्हेली तशीच सुरेश भटांनी देशीवादी गझल लिहून  मराठी गझल मागे न्हेली . वास्तविक भट ह्यांना मुक्त गझल पुढे  न्हेता आली असती पण त्यासाठी लागणारे व्हिजन त्यांच्याकडे न्हव्ते . हिंदीत मात्र विंदा निर्माण होण्याऐवजी गोपालदास नीरज निर्माण झाले ज्यांनी हिंदीला परिपूर्ण सृष्टीय गझल पुरवली त्यामुळे पुढे दुष्यंतकुमारच्या प्रतीसृष्टीय अस्तीत्ववादी गझलेला अवतरणे सहज शक्य  झाले . विंदांच्या मुक्त गझलेला पुढे न्हेणारा दुष्यंतकुमार ह्यांच्या तोडीचा अविष्कार न झाल्याने सुरेश भट हेच मराठी गझलेचे सर्वेसर्वा झाले आणि मराठी गझल काहीकाळ सृष्टीयतेत अडकून पडली . सुरेश भटांना विरोध करणारे आमच्यासारखे गझलकार हे कचऱ्याच्या टोपलीत गेले आम्ही एका अर्थाने विंदा स्कूल चे पापी होतो . अर्थात भटांचे हे वर्चस्व कायम स्वरुपात टिकणे शक्यच न्हवते . किशोर कदम , चंद्रशेखर सानेकर ह्या सारख्या समर्थ गझल कारांनी अस्तित्ववादाच्या जवळ जाणारी गझल लिहायला सुरवात केली आणि आता फेसबुकवर जी नवीन गझल अवतरतिये तिच्यावर प्रतीसृष्टीय अस्तित्ववादाचा प्रभाव आधिक आहे असे जाणवते . ही गझल भटांच्या प्रभावापासून काहीशी मुक्त आहे आणि हे चांगलेच आहे . तिच्यातली विविधताही लक्ष्यणीय आहे . 
१९८४ नंतर गझल हा माझा काही मुख्य अविष्कार राहिला नाही आणि मी पुढे चौथ्या नवतेपर्यंत पोहचलो . मात्र अधूनमधून गझल येत राहिली म्हणूनच  क. व्ही (पॉप्युलर प्रकाशन )ह्या काव्यसंग्रहाची सुरवात मी गझलेने केली . कारण गझलेने आता चीन्ह्सृष्टीय वळण घेणे आवश्यक आहे असे मला वाटत होते . ह्या चीन्ह्सृष्टीय गझलेची झलकही फेसबुकवर आढळते आहे . 
मराठीतल्या काही अडाणी कवीलेखकांना मी गझलेवर लिहले कि पोटशूळ उठतो . त्यांना हा मागासलेपणा वाटतो . वास्तविक समाजात काही तंत्रे व प्रकार हे इतके लवचिक असतात कि कुठल्याही काळात ती तंत्रे आणि प्रकार हे कालबाह्य होत नाहीत . गझल हा काव्यप्रकार हा असा लवचिक काव्यप्रकार आहे . बाकी शहाण्यांना अधिक  सांगणे न लगे आणि मूर्खांना कितीही सांगून काही फायदा नाही . 

श्रीधर तिळवे नाईक 


Wednesday, June 3, 2015

मुक्त गझला / डेकॅथलोन : एलसेट्रा ह्या अप्रकाशित काव्यसंग्रहामधून 

१ विवाहित प्रेमिकेसाठी मुक्त गझल /श्रीधर तिळवे 

हे प्रेम आहे कि व्यभिचार आहे
तुझे विवाहित असणे अत्याचार आहे १

त्वचा मांडून मांडून विकून संपून गेले
हे काळीज उरलेले चमत्कार आहे २

वॉश घेऊन घेऊन डोळे पॉश झाले
तुझे रडणे स्टाईल अश्रू शैलीदार आहे ३

माझी भटकंतीही तुझ्यात भरकटत गेली
मी दिशाहीन योगी तुला भ्रतार आहे ४

बिनधास्त होण्याचीही आता धास्ती वाटते
माझा कलंदरपणा तुझे हत्यार आहे ५

२ जगभर हिंडून 

जगभर हिंडून घरी परतावे 
अन घरात साऱ्या जग मांडावे १

मेंदू करू दे हजारो तुकडे 
काळजात सर्व कनेक्टेड व्हावे २

कितीकाळ फोनवर हाय अन हलो 
माणसाने कधीतरी भेटून बोलावे ३

झेरॉक्स असल्यासारखा नको वागू 
ओरीजनल आहेस ओरीजनल रहावे ४

सरडाच का व्हावे रंग अनुभवण्यास 
फुलपाखरू होऊन काम भागवावे ५

३ कोल्हापूरी 

सुरवातीला फक्त अडचण असते 
मग नेहमीचीच तणतण असते १

गर्भाशयापासून वनवे सुरु होतो 
मग कुठेही जा फक्त वणवण असते २

माझ्या अस्तित्वाची मी घंटा वाजवत नाही 
कवितेत मात्र माझी घणघण असते ३

हे खरे कि तुझा मला ताप चढत नाही 
तुझ्या अभावाची कधीकधी फणफण असते ४

मी कोल्हापुरी थोडा झणझणीत आहे 
काळजात गोडवा बोलण्यात झणझण असते ५

४ दे यार और 

दे यारा  और भी दे गम मुझे सहनेकेलिये 
काफी नहीं हैं लहू दिलका  गममे तेरे बहनेकेलिये १

दिल  वो मुकाम हैं जहाँ  हर कोई  भटका  अटका 
बादमें  मिलते हैं बहोत मकान रह्नेकेलिये २

बहोत कुछ गिराना होगा श्रीधर  मोहब्बतकेलिये 
सिर्फ दिमाग काफी नहीं तेरा ढहनेकेलिये ३ 

बहोत कुछ भेंज दिया ताकि वो इश्कको समझे 
लाशतक बची नहीं हैं उन्हें कुछ कहनेकेलिये ४ 

इश्क़ मेरा समझ न आया न आया ना सही 
जुनूनमें दिया डायमंड तेरे काम आया गह्नेकेलिये ५

श्रीधर तिळवे -नाईक 












ऑक्टोबर १९९०

अनेकांचे हेतू चांगले होते 
तुझेही 

वडिलांचे चलअचल हेतू चांगलेच होते 
पण तरीही माझा चंचल सत्यानाश 

क्लीनिकल समुद्राचे क्लिनसिकल कट इमोशन्सचे 
पॉईंट ब्लॅक इच्छांचे चोंदलेले नाक 
रॅपरमध्ये गुंडाळलेले स्वतःचे प्रेत खाण्याची सक्ती 
जस्ट अनदर संडे म्हणत कोल्हापुरी शिव्यांचे ऑम्लेट 

वाच पण कुणाच्या आसपास वावरत वाचन नको 
पुस्तकातले किरदार त्या माणसात दिसायला लागते 
गा पण पक्ष्यांना स्पर्धा देण्यासाठी नको 
भेट द्यायला येणाऱ्यांचे आवाज म्यूट नको करू 
राष्ट्रांच्या पवित्र स्थानी अन्गझायटी पेरणारे राजकारण नको 

आता अडवाणींना अडवायला कुठला घोडा आणू ?

तपश्चर्येचा हक्क नाकारणारे देव 
आणि इथे तुझ्या नास्तिक गालावरचे चार्वाकी दव 

देवांच्या पार्किंगची भांडणे देव सोडवू शकत नाहीत 
कारण ती मुळात देवांनी निर्माण केलेलीच नसतात 
माणसांना पार्किंग लागते 
माणसांच्या देवांना पार्किंग लागते 

तुला हवाय मुंबईला जाण्यापूर्वीचा एक कोल्हापुरी संभोग 
आणि ही रथयात्रा अशी आडवी येतीये मेंदूच्या हमरस्त्यावर 
समोर गर्दीतही स्पष्ट दिसणारी 
वडिलांना गाढवावर बसून दिलेली वचने 

पर्मनन्टमध्ये तत्कालची परेड 

शांततेचा फुगा दोन्ही बाजूनी फुटला 
आणि व्हायोलन्स दोघांनी पाटा फिरवत कुंटला 

विश्रामस्थानांचा अंत 
शांतताही दंगली घडल्यावर जाणवायला लागतात 
तोपर्यंत एक तणाव तरी असतो 
किंवा बनाव तरी असतो 

हजारॊपैकी किती लोक आपणासाठी मॅटर करतात 

आपली झेप आपल्या देहापर्यंत 
अनलिमिटेड झेपेची हौस आपण देवात पुरी करतो 

कृष्णाने काशी लुटली होती 
ह्याची मी आता आठवण करू द्यावी का ?

ह्या देशात दंतकथा वारत नाहीत 
पुन्हा पुन्हा जन्म घेतात 

किंवा त्यांना कुणीतरी जाणीवपूर्वक जिवंत ठेवतं 
कलेच्या बाटलीत कोंबून 

वेद वेदी वदंता वाद विवाद विवाद्य 
सगळं एकत्रच आहे 

अयोध्या घड्याळ पाहतीये 
तिला कळत नाहीये 
हे सम्पणार आहे 
कि पुन्हा सुरु होणार आहे 

कवी रामावर भावुक कविता लिहीतायत 

मानवतेची रँक धर्मापेक्षा अधिक होऊ शकत नाही 

पातळ शेवट भूमीचा जाडजूड कसा करावा ?
रेकॉर्ड केलेल्या सकाळीत मोर शूट झालेले नाहीत 

अख्खा देश रामायण झालाय माय डियर 

बरं झालं श्रीलंकेने आपलं नाव श्रीलंका ठेवलं 
भारतात लंका असती 
तर रावणदहनाला जाळली असती 
खांडववनासारखी 

बरंच काही डिकोड होतंय 
कदाचित अख्खा अनकॉन्शस डिकोड होतोय रथयात्रेत 

ह्या देशाला नेमकं काय हवंय डिकोड होतंय 

त्या युनिव्हर्सिट्या खरोखर हव्या आहेत का 

ज्ञानापेक्षा करमणूक महत्वाच्या वाटणाऱ्या युगात मी जन्म घेतलाय का ?

डिजिट करन्सी टाईप करतायत 

वैश्विक फ़ंडींग 

कन्स्ट्रक्शन किट्स हातात दिसत नाहीयेत कुणाच्या 

पोलिटिकल कारणांनी का असेना 
हा देश एका देवात प्रथमच सेटल होतोय 

प्रत्येकाचा पर्सनल राम विलीन होतोय 

विद्वानांनो ह्यापुढे रामाच्या जनभूमीवर वाद घालायचा नाही 
आम्ही सांगतो तीच जन्मभूमी 
काल्पनिक तर बिलकुल म्हणायचं नाही 
एका काल्पनिक देवासाठी एव्हढे खरेखुर्रे लोक जमा होतील ?

नेमक्या ह्याच दिवशी मी तुझ्या घरी 
आणि समोर टीव्हीची रहदारी 

ओनिडा ओनिडा ओनिडा 
तिढा तिढा तिढा 

मालक कोण आणि मत्सर कोणाचा 
प्रश्नच नाही राम माझा एका बाणाचा 

धुके जळालेले आहे 
पुरोगामीत्व पळालेले आहे 

त्याला नको शोधू 
शव जळालेले आहे 

जे शत्रूवत होते 
आपल्याकडे वळालेले आहे 

ही गर्दी पहा 
तिला झालेली सर्दी पहा 

भगवी त्वचा सर्वांची 
एकोप्याची वर्दी पहा 

कोण सुटले आहे 
सामील दर्दी पहा 

तुम्हाला दिसत नाहीये 
राम तुमच्या काळजात वसत नाहीये 

तुझी एल्बो पॅड्स 
डोळ्याचा अंतरावर 
वेच 

स्मितांची बाईक रेस 
ओठांवर 
खेच 

त्वचेविषयी काय 
आपल्याच देहाची गाय -नाही 
पेच 

श्वासाइतकी तू नैसर्गिक माझ्या 
उमलतेस मेमरीच्या गुलाबात ताज्या 

वडिलांना विसर 

ते रथयात्रेत गेलेत जरी गाठली साठी 
त्याचा एव्हढा त्रागा कशासाठी ?

हा तुझा माझा किंवा वडिलांचा प्रश्न नाही 
दंतकथा निवडायची का वास्तव हा प्रश्न आहे 

वास्तव नीट हाताळलं असतं 
तर दंतकथा अशी ताडमाड कशाला झाली असती ?

कायम अल्पसंख्यांक अल्पसंख्याक 
बहुसंख्याक अस्तित्वातच नाहीत 
किचनमध्ये काम करणाऱ्या बाईसारखे टेकन फॉर ग्रांटेड 
कधीतरी किचनमधली बाई 
हॉलमध्ये येऊन हक्क मागणारच 
आणि विषय भलताच काढणारच 

माझ्या तळव्याचा बूट अवेलेबल नाही 
म्हणून मी माझा पाय कापून छोटा करावा काय ?

मी तेच बोलणार 
जे मला योग्य वाटत 

केवळ तुझ्या कम्युनिस्ट कानांना योग्य वाटावं ते बोलण्यासाठी 
मी आलेलो नाही 
आणि हो हिंदुत्ववादी आहेस असा भंपक आरोप नको 

व्हर्जिन मुमेंट आहे प्रेमाची 
पकडूया का 

तुझी त्वचा म्हणजे अखंडित गरम सफेद बर्फ 
पेटवूया  का 

रथयात्रा सगळ्या दिशांनी पांगत असेल तर 
आपण एकमेकांच्या देहाचं वास्तव 
बनूया का 

मंदिर होईल होईल 
आपण देव तर होऊ शकतो 

माझं जग तुझं जग 
जुगुया का ?
जगूया का ?
श्रीधर तिळवे - नाईक
(
चॅनललव , सेक्स  एण्ड एलसेट्रा ह्या काव्यफाईलीतून)