Showing posts with label (क व्ही २ क व्ही २. Show all posts
Showing posts with label (क व्ही २ क व्ही २. Show all posts

Monday, December 14, 2015


७ मला काय ठाऊक ? श्रीधर तिळवे

कवी आर्कुटच्या फुटपाथवर झोपी गेलेत
कायमचे कि तात्पुरते
नारायण सुर्वेना ठाऊक

शक्तीपुंज माझी प्रेयसी मला रिप्लेस करून
अमेरिकेला गेलीये
नवा प्रियकर शक्तिमान कि  superman
दिलीप चित्रेंना ठाऊक

चांगदेव मिनीएचर्समधील सिंहावर आरूढ होऊन
माझ्या कवितेत ज्ञानेश्वरांचा   इमेलआयडी शोधतोय
मिळाला कि नाही
अरुण कोल्हटकरांना ठाऊक

ईश्वर वन नाईट stand साठी
अभिताभ बच्चनच्या बंगल्याबाहेर उभाय
कुणी भेटली कि नाही
वसंत डहाकेंना ठाऊक

गोलपीठा आख्खी मुंबई mallमध्ये शिल्गावतोय
शिलगली कि बिलगली
नामदेव ढसाळांना ठाऊक

श्रीधर तिळवे
आरश्यातला आरश्यात वारला बेवारशी
त्याने मनोहर ओकची परमिशन घेतली होती कि नाही
मनोहर ओकलाच ठाऊक


श्रीधर तिळवे 

Saturday, August 29, 2015

५१ वटवण श्रीधर तिळवे 

मी माझ्या आत्मचरित्राचे तुकडे मांडत चाललोय 
मात्र ते तुम्हाला जसे हवे आहेत तसे नाहीत 
जसे असायला हवे आहेत तसे आहेत 

तुम्हाला चिंता पडलीये त्यांच्या सत्य-असत्याची 
आणि मला चिंता 
ग्वाही देणाऱ्या काल्पनिक मनाला 
संपूर्ण कसे नाहीसे करता येईल ह्याची 

तुम्ही मला फ़ेकॉलजिचा मास्टर समजताय 
आणि माझा गुन्हा हाच 
कि मी कुणाचा शिष्य झालो नाही 

तुम्हाला पूज्य तुमचे इझम्स , धर्म , अजेंडे , त्यांचे प्रवर्तक 
आणि मला पूज्य म्हणजे शून्य कसे ते जाणायची उत्सुकता 

मी असा मूर्तीभंजक आहे 
ज्याने फक्त मूर्त्या नाही फोडल्या 
प्रेषित फोडले ईश्वर फोडले 
स्वतःच्या घरातील देव्हारे फोडले 

तुम्हाला हवा आहे तुमच्या वाकवळणाप्रमाणे सही करणारा कवी 
आणि मी अवघ्या जगाचा राजीनामा देवून 
मूळ सोर्स वटवत चाललोय . 

(क व्ही २ ह्या काव्यफायलीतून )

Thursday, May 21, 2015

समोर आपल्या नावाने /श्रीधर तिळवे 

क्रिमिनल अंतरावर उभय यश
आयडीयाlogy गुन्हेगारी चेहरा करून
समोर अंगठे धरून उभी
दु:स्वप्ने रचून रचून
शिणून गेलेले शतक

स्व:ताच रक्तही  बनावट असल्याचा
संशयकल्लोळ
अधूनमधून काळजाच्या फेक गल्लीत
चकाचक चेक वाटले गेले अर्थांचे
पण authenticity वटवायला गेलो
तर सही अत्तरासारखी उडून गेलेली

A T M unlock करून
कॅश घेऊन पळाला सिक्युरिटी गार्डनर

समोर आपल्या नावाने फक्त एक कागदी फूल
With Love
And With God's Grace


श्रीधर तिळवे -नाईक

Sunday, May 10, 2015

त्यांनाही माहित नाही / श्रीधर तिळवे 

२३
माझ्या जीन्सचे हे natural  कलेक्शन 
रिअल पव्हिलिअनचे फोटोस्टील वाजवतंय 
फुलांनी तोंड बंद केलेल्या म्युझिकल नोटस अवगत करत 

कृष्णवर्णीय त्रीमितीयता डिझाईनमधून प्रकट करतीये 
सूर्यातही अस्तित्वात असलेली वजनदार स्पेस 
क्लास्सिकल मिनीएचर्सही समकालीन होतायत 
फोटोशोप्पिकल टाटूइफेक्ट्समध्ये 

माझे पोर्ट्रेट माझ्यापासून सुरु होते 
पण माझ्यापाशी संपत नाही 
डीजीटूल्स त्याला वाढीव सोंदर्य पुरवून 
डीस्पोज करतायत प्रतिसेकंद साठच्या स्पीडने 

रोमांटिक स्वभावाची झाडे 
शुभ्र शंखातून सौष्ठव फुन्क्तायात 
मात्र ते त्यांच्या भावनांचे आत्मचरित्र असेलच असे नाही 

एक इन्स्टालेश्नर आपल्या आईला 
installation म्हणून सादर करतोय 

माझ्या कार्सची चाकं रस्त्यावरून कविता लिहित धावतायत 
माझ्या स्वीम्मिंग tank मध्ये माझी गर्लफ्रेंड प्रत्यक्ष पोहतीये 
कि पोहण्याचा अभिनय करतीये 
हे सांगणे कठीण आहे 

हवेने कंट्रोल केलेला माझा श्वास 
माझ्या फुफ्फुसाचे डीजीशिल्प बनवतोय 

एक सब्लाइम grand सौंदर्य 
डोळ्यातून विजा कडाडवत 
शांतीचे बनावट मूग गिळत गप्प बसतय 

मी ह्या जगण्यात आनंदी आहे कि दु;खी 
हे मला ठरवता येत नाहीये  

मी उत्सव साजरा करायला सर्वांनाच बोलवलय 
आणि प्रत्येकजण डिझायनर्स कपडे घालण्यासाठी 
शहरातल्या डिझायनर्सना कॉल करतोय 

त्यांनाही माहित नाही 
उत्सव साजरा करताना 
ते आनंदी असणार आहेत कि दु : खी ?

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही  २ ह्या  अप्रकाशित  कविता संग्रहातून )

Saturday, May 9, 2015

लाफ्टर /श्रीधर तिळवे 

२३
मनोरंजनाने जडत्व आलय प्रत्येकाला 
सोप ऑपराच्या वजनाने 
घर खाली येतय असं वाटतय 

कॉमेडी सर्कसचा फौंटन 
mismatch होतोय गंभीर टर्नवर 
तरीही 
सर्वांनाच हसायचं आहे दैवावर 

टीव्ही ठोकतोय लाफ्टर 
आणि पोर्टेबल हात 
रिमोटमधून पलायन करतायत 

श्रीधर तिळवे -नाईक
क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Friday, May 8, 2015

२१ नव्या संस्कृतीनिर्मिकाचे स्वगत /श्रीधर तिळवे
अज्ञानापेक्षा गुंतागुंतीचे ज्ञान कधीही बरे 

थेरीज तेरा वेळा वाचूनही कळत नाहीयेत 
मात्र चौदाव्या वेळी त्यांचा चेहरा मला ओळखीचा वाटतो 

management हीच बनत चाललीये रिस्क 
आणि तज्ञ पुरवतायत 
फ्रेश करणाऱ्या चहासारखे ज्ञानाचे कप 

मुर्खपणा धिप्पाड बनत चाललाय वशिल्याने भर्ती झालेल्या प्रोफेसर्सचा 
आणि भविष्य पाहणारा जेन्युइन मेंदू 
स्वताची चड्डी मर्यादेने ओली करतोय कि काय अशी शंका येतीये 

प्रोफेसर्स 
युद्ध करतायत बुद्ध मांडतायत 
प्रोफेसर्स 
पोर्नो पाहतायत एडस वाढवतायत आणि प्रबोधनही करतायत 
प्रोफेसर्स 
भयाचे बॉम्ब देहात बांधून घेतायत आणि शोधून नष्टही करतायत 
प्रोफेसर्स 
गोंधळ वाढवतायत गोंधळावर संशोधनही करतायत 

अंगावर ज्ञानाची उष्मता बांधतिये पलायनवादी भावनांच्या काट्यांचे घड्याळ 
आणि लोक घामट हातांनी उडवतायत मुमेटरी इमोशनल पतंग 

वैज्ञानिकांना SARS लाईटवेगाने किती टांगा फाक्तायत 
ते मोजायचे आहे 
आणि त्यांच्या कॉलेजला U G C ची ग्रांटच आलेली नाहीये 
त्यांना सरकारी ग्रांटचा वेगच मोजता येत नाहीये 

त्यांची आशा करतीये आयटम डान्स 
आणि त्यांच्या करुणेने बॉलीवूड डान्सचे क्लासेस अटेंड करायला सुरवात केलीये 

मी T V समोर  ब्रान्डसच्या धबधब्याखाली आंघोळ करतोय
गेस्ट लेक्चरर म्हणून परतल्यावर 
RATIONAL कन्झुमर बनण्याचा प्रयत्न करत 
ह्या उदास एकांतात एकटा 
कोसळलेल्या शिक्षणाचा मळ साफ करत उभा 

नव्या युगाचे वाढते गुरुत्व 
अवघ्या पृथ्वीच्या रिकाम्या जागा भरून काढत 
माझ्या खांध्यावर 
तिला नखाएवढ करत

 मी NONACADEMIC ALONE
गोळा  करतोय आत्मविश्वास 
MATTER च MATTER डार्कमध्ये ताणवत 
उर्जेचे APPLICATION जमवून आणत 

मी सब सिस्टिम्स ADD करतोय अहोरात्र 
इंटर्नल लिंक्सची डिलक्स जाळी खोलत 
सिम्पल नेटवर्क्सच्या ADDITIONAL नोडमधून स्वताचे मायनस पाय चालवत 


ट्रान्सफरमेशनचे औटोमेशन ग्रेटर गतीत जोपासता येईल का ?
ह्या मटेरियलची अमाउंट मला सह्याद्री मौउंण्ट्णवर मोजता येइल का ?

गुंतागुंत गाढ होतीये 
पेसमध्ये वाढ 
कनेक्टीविटी प्रगाढ होतीये 
स्कोप कोओपरेटीव 

BLOCKAGE वितळवणारे पाणी तळमळतय माझ्या गरम रक्तात 

माझ्या शरीराचे तापमान ठीक करू पाहतय कार्बन डाय ऑक्सोइड 
प्रोजेक्टचे अक्ष -पाडतायत नाणी -छापतायत नोटा 
मेंदूची सप्लाय चेन टवटवीत होत चाललीये चेकगणिक 
मी मार्केट विकत घेवून ओल्ड संस्कृती काढतोय लिलावाला 

मला खात्री आहे मी हातभार लावतोय 
एका नव्या संस्कृतीच्या निर्माणाला 
आणि मराठी माणूस मला वडापाव खायाला घालून 
पाठींबा देतोय 

मला हे महत्वाचे नाही कि तो काय देतोय
त्याने दिलेला वडापाव मराठी समीक्षेपेक्षा जेन्युईन आहे 
इतका दिलासा मला पुरेसा आहे 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही २ ह्या अप्रकाशित आगामी काव्यसन्ग्रहातून )



  






Thursday, May 7, 2015

अपेक्षा /श्रीधर तिळवे 

लोक अतिस्वतंत्र झाले कि 
वाद म्हणून भांडायला लागतात 

लोक अतिगुलाम झाले कि 
वाद म्हणून बंड उभारतात 

मी ना अतिस्वतंत्र ना अतिगुलाम

विविधतेचा मला सराव आहे 
आणि ते जे आहे 
त्याला ठाव आहे 

जे ठाऊक  ते घाऊक 
जे ठाऊक नाही ते किरकोळीला MALL काढून देत 

मला मेमरीचा एनसायक्लोपीडीया फ्री करायचा नाहीये 
फक्त कवितेसाठी अवेलेबल होणारे SOFT पेज 
निर्विकार कोरे असावे 
एवढीच अपेक्षा 
ह्या गुरुत्वमध्यात आहे 
श्रीधर तिळवे -नाईक 
(क  व्ही  २   ह्या  आगामी अप्रकाशित  काव्यसंग्रहातून )

Sunday, May 3, 2015

चिमणी /श्रीधर तिळवे 

१९
नाव म्हणजे मी न्हवे 
इतकं शहाणपणही दुर्मिळ होत चाललय 

आकलनाचे कण 
मेंदूपासून वेगळे होतायत 

शहाणपण माहितीचा भुसा भरून 
मँनिफ़ेस्टेशनवर लटकतय 

एक चिमणी रोज तयार होतीये 
शुभशकुन घेतल्यासारखी घरट बांधायला 

मोबॊइल वाजतोय 
आणि ती त्याच्यात मरून पडतीये 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही  ह्या  अप्रकाशित  कवितासंग्रहातून ) 

Friday, May 1, 2015

सेट /श्रीधर तिळवे
१९


प्रोप्स जांभया देतायत

शरीराच्या प्रत्येक modelled कॉर्नरवर
चान्स मोल्ड होतायत

कल्पनेचा त्याग केला तरी
fashion प्रोजेक्शन काल्पनिक

मी ramps चा मांजरात लिलाव करतोय

कुणीतरी कॅटवॉक करत येईलच येईल .

श्रीधर तिळवे -नाईक
(क. व्ही .  २ ह्या आगामी काव्यसंग्रहातून )

Thursday, April 30, 2015

खरखर /श्रीधर तिळवे 

१८

ग्राविटीज  डिसलोकेट करून 
आत्मविश्वास बलाढ्यतेत उडतोय 


चांगले आणि वाईट 
दोघेही नक्कलच करतायत ट्रेण्डसची 

मी मेमरीजही ट्रान्झीटरी  करतोय 

अर्थाशिवायही शब्द उडवता  येतो 
फक्त अभिनयात विश्वास हवा 

मिडीयात  माझी वर्णने आहेत 


ही फोटोवरील खरखर व्हिडीओत काय खाजवतीये ?

श्रीधर तिळवे -नाईक

क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Wednesday, April 29, 2015

साउन्ड / श्रीधर तिळवे 

१६

स्टूडीओत डिजिटल स्फोट होतायत 

कानांत लोट 
नग्न ध्वनी मेंदूपर्यंत सौम्यरस पीत हेलकांडतोय 

साउन्डची चित्रे अतिग्राफिकवादात माझा गळा  बुच्काळतायत 

माझा  टेरीरीस्ट  आवाज गातोय
आवाजातून गाणहीं  उगवतय 
मात्र त्याचा अर्थ लागत नाही 

निर्माता म्हणतोय 
गाण्यातून गाण्यात इनवेस्ट केलेला ''अर्थ ''प्राप्त व्हायला हवा 
आपली ''गुड अर्थ '' हलायला हवी 
बाकी अर्थ-बिर्थ निघाला निघाला 
नाही निघाला नाही निघाला 
आपणाला कुठ ऑस्करला जायचय ?

मी बहिरा होतोय 
मी ठार बहिरा होत गातोय  

साऊ न्ड रेकॉरडीस्ट म्हणतोय 
''हिट साहेब लय हिट 
पब्लिक डोक्यावर घेणार ''

श्रीधर तिळवे -नाईक 




 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Tuesday, April 28, 2015

फुले /श्रीधर तिळवे  

१४

फुलांचा सुवास ओळखता न आल्याने
माझ्या खोलीतील रिअल माळी फुलांत नाहीसे होतायत

इन्टरनेटवर सुवास नाही
आणि फुले अशी कचकचीत नवी कि …

मला कळत नाहीये ह्या नव्या फुलांचा
सामना कसा करावा ?

जगातले प्रत्येक फुल इन्टरनेटवर थोडेच आहे?

 फुले  माझ्या दारावर थापा न मारता
जमतायत
त्यांना त्यांच्याविषयी शास्त्रीय माहिती हवीये

केवळ सुवासाने माळी नाहीशी करणारी फुले
रिअल फुले
मला ओळखता येत नाहीयेत

माझ्या घराची बाग हादरलिये
अबोली लाल पडतीये
अनंत अंत शोधतोय
जास्वंदी ओसाड गावची महाराणी बनतीये

थेट घरात घुसणारी ही पहलीच   फुले
आख्खी नागेशी शांत आहे

फुले शंकराचा तिसरा डोळा असल्यासारखी
मला LAPTOP ला   थेट पाहतायत

बाग हादरलिये माळी नाहीशी झाल्याने
माझे घर जे फुलण्यासाठी फेमस होते
ह्या फुलांमुळे आपण बदनाम होणार म्हणून
भिंतीत येरझाऱ्या करतय

ओळख झाली कि सामना करता येईल म्हणून मीही
फुलांची आय़्डेण्टीटी शोधतोय
 फुले  माझ्या आसपास बसून नागडा स्क्रीन पाहतायत
फुलांना कधीपासून ओळखीचे कपडे अंगावर लागू लागले ?

सर्च इंजिन नन्नाचा पाढा वाचतय

LAPTOP वर  माझी बोट डिजिटल असल्यासारखी नाहीशी होतायत

त्यांचा  सुवास माझ्या रूममध्ये  भोजन करतोय

पुस्तके सीडीज डीविडीज फस्त होतायत

मी नाहीसा होतोय
आणि फुले कि -बोर्डाला रिप्लेस करत
सुवासनृत्य करतायत

श्रीधर तिळवे -नाईक 

Monday, April 27, 2015

१५ 

अस्तित्वावर निर्णय सोपवण्याचे दिवस  

श्रीधर तिळवे 
अस्तित्वावर निर्णय सोपवण्याचे दिवस 
संपत चाललेत 
अस्तित्व आहे फक्त  फुटबाल 
ज्याच्याशी मैदानात उतरलेले कुणीही खेळतय 


आता चोईस हा त्रास नाही 
चंगळ आहे 
प्रत्येकाच्या वाट्याला आलेली 

आता आत काय आहे विचारू नकोस 
जे काही असेल ते फक्त जाहिरात असेल 

बाहेर काय आहे ते स्पष्टच आहे 


सर्वच विक्रीला ठेवले गेले आहे 
आणि ग्राहक म्हणून तुला काही हक्कही दिले गेले आहेत 

फक्त तुला स्वःताला विकायचे आहे 
जेणेकरून तुला जे हवे आहे 
ते तू खरेदी करू शकशील 

हे डील आहे 
आणि ह्यातून मुक्तता नाही 


तेव्हा सर्वस्व पणाला लावून स्वः ताला विक 
 खरीदला गेला नाहीस तर 
पडून पडून एक्स्पायर होशील 


स्वः ताला न विकण्याचे स्वातन्त्र्य तुला आहे 


पण ह्या स्वातन्त्र्यात आणि मरण्यात 
काहीच फरक नाही 


मला आनंद आहे कि तू स्वातंत्र्य निवडलंस 


बघ 
बाजाराच्याबाहेर मरणाचा आनंद आहे 

आनंद !

श्रीधर तिळवे-नाईक 
क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Sunday, April 26, 2015

सफर  /श्रीधर तिळवे 
१३
परतताना चार्म उरलेला नाहीये

माउथवॉश केला तर दात मावळले
चमत्कार केला तर चेहऱ्यावरील जादू मावळली

ब्युटीपार्लरमध्ये थांबलो तर ग्रेस गेली
बोलायला गेलो तर तोंडात ब्रेकडाऊन

अक्सिसना अक्सेस मिळाला नाही
 रिलेशनशिपला सक्सेस

प्रेक्षक मावळले
रिसिव्हर मावळले
कम्युनिकेशन मावळले


उगवायचा प्रयत्न केला
तेव्हा कळाले
पेरलेलेच न्हवते काही

मग इन्फ़्लुएन्स न टाकता
मुकाट परतलो
नवा पासवर्ड टाकण्यासाठी

 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
१४
पेजर /श्रीधर तिळवे 
पेजर व्हायब्रटरतोय
मेसेज डोक्यात जातोय
पुन्हा पेजरमध्ये परततोय


तीन बटण तीन दिशा
अविरत पण भसाभसा
माझं प्रेत वाहतय

सर्व सखोल पेजरत पेजरत
उथळ होतय
श्रीधर तिळवे 

 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Friday, April 24, 2015

alice इन कॉम्पुटर  land / श्रीधर तिळवे 

१२

गुंतागुंतीचा करंट करंट 
मोटिवेशन डब करतोय उमलत्या एरियात 

सिम्बोइसिसला सतरा तोंन्ड इन्टरनेटीन्ग्ची  अन 
ट्रेण्डसच्या अठरापगड जाती च्यानेलमुडी 

alice इज इनसीक्युर इन हर कम्प्युटरland हो ना alice ?

मेसेज ड्रोपऑउट होतायत तुझ्या श्वासल डिझाईनमधून 

काळीजरक्षक गुप्ततॆ तून  अध्याप नरभक्षक वहात नाहीये 
पण कधीही वाहील 

चल जिवंतपणाची अडवायजरी  कमिटी  नेमू 
आणि ह्या ब्यांफलिंग ब्याटल्स लढायला प्रपोज करू 

माझा कोड्ब्रेक्रर हात इनफेमस झालाय म्हणून काय झालं ?
ह्या डीफिकल्ट टू ब्रेकमधून ब्रेकथ्रू मिळवून देईन 
तहहयात कंपनीला 

आत्ता ह्यातही तुला इनबिल्ट जेलचा चेहरा दिसत असेल 
तर माझ्या स्वातंत्र्याचा नाईलाज आहे 

जा पळण्याऱ्या जहाजासारखी 

मात्र एक लक्ष्यात ठेव 

पळण्याऱ्या जहाजाच्या गांडीला 
समुद्र ढुंकूनही पहात नाही 

जा तुझी एकुलती एक न्यूड  body 
लीड करत alice 
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )


Thursday, April 23, 2015

क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )


११

रिसेशन 

श्रीधर तिळवे 



miracle मागणारी कंपनी 

magic मागणारा बॉस 


गोस्सिप मागणारी मैत्रीण 

रिटर्न मागणारे शेअरहोल्डर्स 



अंधश्रद्धा निर्मुलन समिती 
इथेही अल्पमतात 


मी रीझाईन करून 
ही कविता लिहितोय . 

श्रीधर तिळवे नाईक 
१०

खादाड 

श्रीधर तिळवे 

झाडे सूर्यप्रकाश खाऊन गुजारा करतायत 
प्राणी झाडे खाऊन गुजारा करतायत  
नॉन्वेज प्राणी व्हेज प्राण्यांना खाऊन गुजारा करतायत 


लम्प स्वतःला स्पिन करून 
एकाच डिस्कमध्ये स्वतःला कोंबून 
महालम्प्च्या पोटात चाललेत 


महा लम्प आपला सारा सूर्य प्रकाश माळून 
एका अज्ञात पोटात चाललेत 
जे काळे कि गोरे हेही त्यांना माहित नाही 

प्रत्येकजण भक्ष्य आहे 
प्रत्येकजण शिकारी 


एक आहारसाखळी चालू आहे सर्वत्र 

अपघात होतात 
पण ते कुणाच्याच लक्ष्यात रहात नाहीत 

मी डायनोसर आठवणीत म्यान करून 
मेमरीबाजीत डिजिटलतोय 

ह्या डायनोसरमुळे मी कधीकाळी भूमिगत झालो होतो 
आणि आज त्यांना मी भूमीतून फ़ोस्सिलवत उभे करतो आहे 

माझ्या सूक्ष्म असण्याने त्यांच्यावर कधीकाळी मात केली होती 
हा विचारच मेंदूला हायबरनेट करतोय 

ते जिवंत असताना त्यांना त्यांच्या टिकण्याविषयी 
आत्मविश्वास वाटला असेल का ?
आणि जेव्हा ते नष्ट होत होते 
तेव्हा त्यांना ते नष्ट होत आहेत हे कळले असेल का ?

प्रकाश त्यांनीही खाल्ला असेल 
झाडे त्यांनीही खाल्ली असतील 
प्राणी त्यांनीही खाल्ले असतील 
पण मिटींऑर डोक्यावर आदळायला येत असतांना 
त्यांना त्याचा सुगावा तरी लागला असेल का ?

आहाराची साखळी डिस्टर्ब करायला हा कोण आगंतुक आला 
असे त्यांनी विचारले असेल का ?
कि त्यांनी त्याला खाण्याचा विचार केला असेल ?

कदाचित ते निर्बुद्ध म्हणूनच मेले असतील 
किंवा फक्त खादाड म्हणून 

खाली वाकून खाताना डोक्यावर काय पडते आहे 
ते थोडच दिसत ?

आपल्या डोक्यावर ग्लोबल वार्मिंग लटकते आहे 
आणि ये दिल मांगे मोर म्हणत 
डायनासरच्या फ़ॊसीलभवती बसून 
आपण कोक पितोच आहोत ना ?

श्रीधर तिळवे  

 ( 
क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Tuesday, April 21, 2015


 जतीन साठी केलेला उपदेश 



रॉक करण्याचे दिवस संपले
अमेरिकन डायमंड खऱ्या भावात विक

डोण्ट कनफ्युज
भाषा प्लास्टिक आहे
काहीही बनू शकते

निवड हीही सक्ती असू शकते
कधी कधी विंडो शॉपिन्गही कर

विजेचे लोड्शेडींग चालू असताना
इन्फरमेशनच्या मुबलकतेवर चर्चा नको

ईण्टींमेट हो इंटेन्स हो
पण डाव्या खिशात नेहमी कंडोम बाळग

ईश्वर तुझ्यामाझ्याप्रमाणेच  एकटा आहे
आस्तिकच बनणार असशील  तर
त्याला डिस्टर्ब न करता प्रार्थना कर

न - असण्याला घाबर आणि मृत्युनंतर काहीच परतत नाही
हे  ओळखून नात्यांना सांभाळ

राजकारणात पडणार असशील तर एक सांगतो
हा जागा न बदलणारा समाज आहे

श्रीधर तिळवे
 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Monday, April 20, 2015

क व्ही २/ श्रीधर तिळवे 

सगळ कोरसमध्ये चाललय 
सगळ कोरसमध्ये चाललय


सोलो गाणाऱ्याला च्युत्यापात धाडल जातय

गोतावळा stamrतोय आणि बक्षिसे मिळवतोय

स्वःताला सिलेक्ट करणारे
थेट स्पॅममध्ये जाताय्यत

सुजेला त्सुनामी समजा
आणि हजारो fans मिळवा


दरवाजे विंडोजची नोकरी करतायत
आणि विंडोज घरातल्या माणसांना हाताळतायत

कविता फक्त स्वप्नातच स्फुरतायत
वास्तवात फुरफुरतायत

अंतहीन जोडण्यांची फक्त वर्णने

मी कविता लिहणार होतो
तर हात जगायला अमेरिकेला चाललाय

श्रीधर तिळवे 

Saturday, April 18, 2015

क व्ही २/ श्रीधर तिळवे 
चेहरा 
श्रीधर तिळवे 
सिंग्युलर इफेक्टपासून मी हे पोस्टर बनवलय 

त्याच्या ब्याकग्राउंडवर पहाट walk घेतीये 
डाव्या कोपऱ्यात फस्ट लिस्ट आहे 
उजव्या हिट लिस्ट 


मधोमध माझ्या मेंदूपासून बनवलेला क्लोनल पाय आहे 
बुटावर त्याच्या शेजारी वूडबस्टर चा ठसा 


ज्यांना माझा चेहरा हवाय त्यांच्यासाठी दिलाय एक option 
तळटीपेत कॅपिटलात 


 W W W  .SHRIDHAR TILVE . COM 
वर क्लिक करा 
आणि फेसइफेक्ट मिळवा 

मला हे पोस्टर सर्वत्र लावायचे आहे 
आणि माझा चेहरा आहे कि 
अद्याप अवतरलेला नाही