नाना गेला . तो यावर्षी जाणारच होता . गेला .
त्याची माझी भेट फक्त एकदाच आणि तीही मल्हार पाटकर यांचे वडील म्हणून .
मल्हार शी फक्त दोन भेटी ! नंतर भेट नाही .
मग आता काय. आयुष्यात त्याला आणि किशोर कदम ला घेऊन एक फिल्म करायची होती. पण ते कधीच जमले नाही. त्याच्या दृष्टिकोनातून माझी लायकी नव्हती.
मग उरतो नाना पाटेकर नावाचा अभिनेता. बॉलीवूडमध्ये मोतीलाल बलराज सहानी असे एक स्कूल आहे ज्यात हिरो सहनायक खलनायक अशा सर्व भूमिका एक व्यक्ती फार यशस्वीरित्या करत असते . नाना पाटेकर या स्कूलमध्ये होता . पण तो या दोघांच्या पेक्षा वेगळा होता तो त्याच्या आवाजामुळे. इथे तो काहीसा राजकुमारच्या स्कूलशी निगडित होतो. पण नाना राजकुमार पेक्षा अधिक चांगला व्हिडिओ अभिनेता होता . राजकुमाराला फार फेशियल एक्स्प्रेशन नव्हत्या वरायटी नव्हती नानाचे तसे नव्हते तो याबाबतीत ग्रेट नसला तरी चांगला होता. त्यामुळे साहजिकच अतिशय अदूतपूर्व अशी डायलॉग डिलिव्हरी आणि चांगला व्हिडिओ अभिनय यांचे डेडली कॉम्बिनेशन नाना पाटेकर यांच्या निमित्ताने उभे राहिले. असे डेडली कॉम्बिनेशन पुन्हा उभी राहील का उभे राहील का हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण मुळातच आवाजाचा आत्ता पत्ता नसणे हे एक फार मोठे वैशिष्ट्य अलीकडच्या पिढीमध्ये दिसते . मुळात आवाज आला जो खर्ज लागतो तो हल्ली फार दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळेच कौन बनेगा करोडपती ला अमिताभ बच्चन लागतोच रिप्लेसमेंट मिळत नाही .
नाना पाटेकर नंतर त्याच्यासारखा प्रभावी ऑडिओ अभिनय असलेला अभिनेता आपणाला लाभलाच नाही ना मराठीत ना हिंदीत ! त्यामुळे नाना नंतर एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण होणे अटळ आहे . त्यांच्या आधी सुरेश उभे राहते उभे रहा ओबेराय होते पण तरीही त्यांचाही व्हिडिओ राजकुमारच्या इतकाच होता नाना पाटेकर याबाबतीत फार पुढे निघून गेला होता आणि म्हणूनच त्यांची उणीव जाणवतच राहणार . सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मला आत्ताच्या पिढीमध्ये असा कोणी दिसतच नाही की ज्याच्या डायलॉग डिलिव्हरीवर आपण फिदा व्हावे . आवाजावर मेहनत घेणे लोक जवळजवळ विसरून गेलेले दिसतात . अनेकांना तर आपण साऊंड इंजिनिअरिंग करून नंतर आवाज करून घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स आलेला आहे त्यातून मग आणखीनच दुर्लक्ष झालेले दिसते .
क्रांती करू पाहणारा पण ज्याला क्रांती जमणार नाही किंबहुना जी करायचा दम त्याच्यात नाही अशा माणसाचा पण प्रत्यक्षात पडद्यावर क्रांती करणारा नायक नाना पाटेकर यांनी सादर केला . हीच प्रतिमा पुढे नेत अनेक गोष्टी करता आल्या असत्या परंतु त्या केल्या गेल्या नाहीत . अभिताभ बच्चन ने जसे नंतर स्वतःला नृत्य मध्ये व्यवस्थित तयार केले आणि एक वेगळ्या प्रकारचा ग्रेसफुल प्रकार सादर केला तसे नानाला जमले नाही त्याबाबतीत तो कायम मराठीत राहिला त्याच्यानंतर कधीही ती ग्रेस येऊ शकली नाही . बच्चन साहेब याबाबतीत फार पुढे निघून गेले हेच खरे. त्यामुळेच आपण असे म्हणू शकतो की अमिताभ बच्चन क्रमांक एक असतील तर नाना पाटेकर क्रमांक दोनवर होते . प्रश्न असा होता की या क्रमांक दोन चा फायदा नाना पाटेकर यांना का उठवता आला नाही ?
आणि इथे प्रश्न स्वभावाचा येतो आणि बॉलीवूड मधल्या अँटी मराठी लॉबीचा सुद्धा ! मुंबईत बॉलीवूड असून सुद्धा मराठी पुरुषमाणूस सुपरस्टार होत नाही यामागे जो एक पुरुष सत्ताक वाद असतो तो आपणाला अनेकदा कळत नाही . काही झाले तरी मराठी स्त्रिया आमच्यावर फिदा होत राहत राहाव्यात त्यामुळे आम्ही मराठी मुली सुपरस्टार करू परंतु काही झाले तरी मराठी मुलगा मात्र सुपरस्टार होऊ देणार नाही अशी धारणा असणारे काही लोक बॉलिवूडमध्ये आज सुद्धा आहेत . याचा कळत नकळत नाना पाटेकर यांना तोटा झाला का असा प्रश्न नक्की निर्माण होतो . की मुळातच कमर्शियल हिरो होण्यासाठी पुरेशी मेहनत घेतली गेली नाही ?
हॉर्न ओके प्लीज ला जे काही झाले त्यावर माझा वैयक्तिक पातळीवर काडीचा सुद्धा विश्वास नाही. नाना पाटेकर यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता असे माझे स्पष्ट मत आहे पण अशा गोष्टींच्या मध्ये पुरावे ठोस लागतात . आणि निर्दोष पण सिद्ध करणे हे फार अवघड जाते. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मराठी माणसांनी याबाबतीत नाना पाटेकर यांना संघटितपणे पाठिंबा द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे. शेवटी अर्थातच सत्य बाहेर आलेच आणि ते निर्दोष सुटले आपल्याकडच्या काही हिंदुत्व विरोधी लोकांना अजूनही या गोष्टीतले त्यांचे निर्दोष असणे पटलेले दिसत नाही . याला मी आयडॉलॉजिकल हलकटपणा म्हणतो तो अजूनही अनेकांच्या ठाई असतो आणि आहे . या काळात नाना निर्दोष सुटेल असे मात्र मी ठामपणे सांगत होतो . त्या मागची कारणे आता सांगण्याची गरज मला वाटत नाही. याबाबतीत नाना पाटेकर यांनी एक सुचक विधान केले होते ते म्हणजे समोर जी आहे ती अपरिपक्व मुलगी आहे . या एका वाक्यात बऱ्याच गोष्टी आहेत .
बाकी त्यांचा अहंकार हा नेहमीच त्यांचा दुबळा मुद्दा राहिला . त्याला पुन्हा फटकळ पणाची झालर राहिली . मराठी माध्यमाने या गोष्टी आणखी मोठ्या केल्या . त्याचा पाटेकर यांना तोटा झाला फायदा झाला नाही. माझे स्वतःचे एक मत कायमच राहिलेले आहे ते म्हणजे मराठी माणूस पुढे चालला की त्याचे पाय खेचण्यामध्ये सर्वात आघाडीवर मराठी पत्रकार असतात . नाना पाटेकर यांच्या बाबतीत सुद्धा ते जाणवते.
नानांची अभिनय शैली नेमकी कशी होती हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण ती स्टॅनिस लॉवस्की स्कूल मधली होती का या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही माझ्या मते ती तशी नव्हती. नाना पाटेकर वास्तववादी भूमिका करायला बघत वास्तववादी मेथड ने करायला बघत मात्र त्याला स्टाईल द्यायला ते विसरत नव्हते . याबाबतीत एका अर्थाने ते अशोक कुमारच्या स्कूल मधले होते असे म्हणता येईल . मात्र त्यांची स्टाईल अशोक कुमार सारखी अंडरस्टाईल नव्हती तर ओवर स्टाइल होती . याला कारण कळत नकळत त्यांचा आवाज होता आणि त्या आवाजाची नैसर्गिक पट्टी होती. अशोक कुमार काय किंवा बडा सहाने काय यांची मुळात पट्टीच मध्यम होती . त्यामुळे त्यांना अंडरस्टाईल अभिनय करणे गरजेचे होते त्या उलट नानांचा आवाजच असा होता की ओवर स्टाइल आवश्यक होती . त्यामुळेच क्रांतीवीर चित्रपटातला नायक हा फक्त नाना पाटेकर सादर करू शकत होते . त्यांची स्वतःची एक डिलिव्हरीची स्टाईल बनली होती आणि ती अत्यंत प्रभावी होती. इंग्लिश मध्ये मात्र आशिष स्टाईल आपणाला जॅक निकोलसन यांच्या अभिनयामध्ये दिसते नाना पाटेकर बहुदा बहुदा त्यांच्यापासून प्रभावित झालेले होते पण त्यांनी कधीही ही गोष्ट एडमिट केलेली नाही.
एकंदरीत ज्याची खऱ्या अर्थाने पोकळी जाणवावी असा हा जबरदस्त अभिनेता होता याबद्दल शंका नसावी
त्यांना माझी आदरांजली
श्रीधर तिळवे नाईक